खोटारडे राहुल गांधीं
राहुल गांधी एक नंबर चे खोटारडे आहेत. आपण नेहरु-गांधी घराण्यात जन्मलो असल्यामुळे सत्ता ही आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि इतरांना दुषणे देणं हा आपला अधिकार आहे असा त्यांचा समज आणि माज आहे.
सार्वजनिक जीवनात काही संस्कार, शिष्टाचार आचारसंहिता आणि मर्यादा पाळायच्या असतात हे त्यांच्या गावी सुद्धा नाही.. विशेषतः कोणी दिवंगत व्यक्तीवर भाष्य करताना संयम राखायचा असतो. मात्र राहुल गांधींना ना शिष्टाचार ना मर्यादा.
काल त्यांनी एक अत्यंत घृणास्पद आणि धाधांत खोटी टिप्पणी केली — की माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी त्यांना फोन करून धमकी दिली की ‘कृषी कायद्यांना विरोध करू नकोस.’ ही बाब केवळ हास्यास्पदच नव्हे तर 1000% खोटी आहे.
याची वस्तुस्थिती पाहूया:
• अरुण जेटली यांचं निधन ऑगस्ट २०१९ मध्ये झालं.
• ते २०१८ पासूनच आजारी होते, त्यामुळे त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही उमेदवारी घेतली नव्हती.
• कृषी कायद्यांचे मसुदे जून २०२० मध्ये प्रथम मांडण्यात आले, नंतर मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ते सप्टेंबर २०२० मध्ये संसदेत मांडले गेले आणि संमत झाले.
मग २०१९ मध्ये निधन पावलेले अरुण जेटली २०२० मध्ये राहुल गांधींना कसे काय धमकी देऊ शकतात?
यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात —
1. राहुल गांधी हे पक्के खोटारडे आहेत.
2. दिवंगत व्यक्तींवर राजकीय स्वार्थासाठी खोटे आरोप करणे हा त्यांचा नीच स्वभाव आहे.
अरुण जेटली हे केवळ कायदेतज्ञ् नव्हे तर अतिशय उत्तम संसदपटू होते. विरोधकांशी ‘मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावेत’ असा त्यांचा स्थायी स्वभाव.. त्यांची विरोधकांशी संवाद साधण्याची राजकीय शालीनता आणि परिपक्वता प्रसिद्ध होती. त्यांनी कधीही कोणाला धमकी दिल्याची नोंद नाही.
म्हणून राहुल गांधींचा हा आरोप म्हणजे नालायकपणाचं आणि असंवेदनशीलतेचं प्रतीक आहे.
खरंतर देशाची आणि संसदची शान असलेली मंडळी आता राहुल गांधींच्या खोटेपणाच्या राजकारणाची शिकार होत आहेत — हे दुर्दैव आहे.
राहुल गांधी यांच्यासारख्या लोकांना देशाच्या राजकारणात एक क्षणही राहण्याची पात्रता नाही. अशा खोटारड्या आणि मृतां नेत्यांवर बेताल आरोप करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई आणि राजकीय आणि सामाजिक बहिष्कार घालणं ही काळाची गरज आहे.
खोटं बोलणं राहुल गांधींचा जन्मसिद्ध हक्क असावा, पण आपल्यात नसणाऱ्यांबद्दल बेताल बोलणं हा अधःपात आहे — आणि त्याचा निषेध केलाच पाहिजे!
-- दयानंद नेने
3/8/25
Comments
Post a Comment