हेमंत करकरे यांना फक्त २६/११ हल्ल्यात मृत्यू आला म्हणून हुतात्मा म्हणायचं का?

 *हेमंत करकरे यांना फक्त २६/११ हल्ल्यात मृत्यू आला म्हणून हुतात्मा म्हणायचं का?*


• हो, ते त्या हल्ल्यात मारले गेले, त्यामुळे त्यांना हुतात्मा म्हणणे तांत्रिकदृष्ट्या योग्यच आहे. ते शस्त्रासकट ड्युटीवर होते आणि देशाच्या संरक्षणाच्या कर्तव्यातच त्यांचा जीव गेला.


• पण त्यांचा कार्यकाळ आणि भूमिका यावर काही प्रश्न उपस्थित होतात. 

• त्यांच्या तपासपद्धती, विशेषतः कथित हिंदू दहशतवादा च्या खोटया प्रकरणात, वादग्रस्त होत्या. काहीजणांचा आरोप आहे की त्यांनी काँग्रेस च्या राजकीय दबावाखाली काम करताना काही निर्दोष व्यक्तींवर अन्याय केला. त्यांच्या कुटुंबीयांची विशेषतः पत्नीची काही विधानं त्यावेळी हिंदू विचारधारेविरोधात असल्याचं भासत होती.


• यामुळे अनेकांना वाटते की करकरे यांनी सत्याच्या बाजूने भूमिका घेतली नाही, आणि काँग्रेससारख्या पक्षाच्या हातातील एक साधन म्हणूनच ते काम करत राहिले. त्यांनी केलेल्या कथित अत्याचारांविषयी कधीच खंत व्यक्त केली नाही.


• त्यांच्या शौर्याबाबतही काही प्रश्न उपस्थित होतात – तीन वरिष्ठ अधिकारी एकाच ठिकाणी एकाच वाहनात कसे होते? का कोण जाणे, पण हे सुरक्षाव्यवस्थेतील नियोजनाचा दोष मानला जातो. 

• करकरे आणि इतर यांना प्रतिकार करण्याची संधी मिळाली की नाही, हे माहित नाही. मात्र, त्या दिवशी जे अनेक निष्पाप भारतीय – बहुतांश हिंदू – मारले गेले, त्यांना आपण हुतात्मा मानतो, कारण त्यांनी कोणताही गुन्हा न करता केवळ देशात राहत असताना आपला जीव गमावला.


• हेमंत करकरे यांचा मृत्यू दु:खदच होता, पण जर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या त्रुटींचा स्वीकार केला असता आणि शेवटपर्यंत खऱ्या अर्थाने देशहितासाठी लढत राहिले असते, तर त्यांच्या बलिदानाला अधिक व्यापक आणि निर्विवाद मान्यता मिळाली असती.


-- दयानंद नेने

   1/7/25

Comments