उगा आमच्या देवाभाऊ ला नावं ठेवू नका काय?
सध्या काय फॅशन झालीये - जो उठतो तो आमच्या देवाभाऊ ला नावं ठेवतोया..
आणि किती ते प्रश्न - अहो देवाभाऊ सोबत ते एकनाथराव आणि अजितदादा हायेत ना - मग त्यांना का नाही विचारत?
सारखं आपले:
छगन चे काय.....
अशोक चे काय....
हसन चे काय....
कृपाच काय....
बबन चे काय....
अजित चे काय....
धरणाचं काय.....
तेलगी चे काय....
महाराष्ट्र सदनच काय....
आदर्श चे काय....
भोसरी भूखंडाचे काय...
सामान्य जनतेच्या अपेक्षांचे काय...
हे जरा जास्तच झालंय नाही का राव..
मग माझी सटकली - म्हटले एकदाच काय ते सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन टाकूया.. घ्या:
उगाच आमच्या देवाभाऊंना प्रश्नांनी भंडावू नका. त्यांची खूप इच्छा आहे पण,
• छगन ला बेल मिळालाय एका केस मध्ये,
• अशोक च्या मागे ED आहे आणि आदर्श केस अजून न्याय प्रविष्ट आहे,
• हसन ची केस अजून तपास सुरु आहे,
• कृपा विरुद्ध डायरेक्ट पुरावे उपलब्ध होत नाहीयेत,
• बबनची केस सुद्धा न्याय प्रविष्ट आहे,
• अजित ला दोन केसेस मध्ये क्लीन चीट मिळाली आहे,
• महाराष्ट्र सदन मधून भुजबळ यांना टेक्निकल ग्राऊंड वर निर्दोष सोडण्यात आले आहे,
• तेलगी मृत झालाय आणि छगन विरुद्ध ठोस पुरावेच नव्हते
• भोसरी भूखंड मॅटर मध्ये तपास सुरु आहे -
आणि सर्वात महत्वाचे,
• आपले संविधान सांगते की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये..
देवाभाऊ कायद्याने चालणारा माणूस आहे... 🤔
• आणि हे सगळं चाललंय ते सामान्य माणसाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच ना..
• काय आहे- असं म्हणतात की राजकारणात एक चांगले काम करण्यासाठी चार वाईट कामांकडे दुर्लक्ष करावे लागते.. आणि देवाभाऊ किती चांगली कामे करीत आहेत... मग त्या प्रपोर्शन ने दुर्लक्ष करावे लागत असेल 😂
🤔🤔
दयानंद नेने
22/6/25
Comments
Post a Comment