राज ठाकरेंच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ...
सन्माननीय राजसाहेब,
आपण दि. २४ एप्रिल रोजी भांडुप येथे अवतरणार आहात असे वर्तमानपत्रात वाचले . सध्या आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांना प्रश्न विचारण्याचा चंग बांधला आहे.
आपल्या प्रत्येक सभेत आपण काही प्रश्न उपस्थित करता आणि उत्तर मिळाले नाही अशी गरळ पुढच्या सभेत ओकता .
त्यामुळेच भांडुप येथे येण्या अगोदर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे देत आहे.
१) मल्ल्याला भारतात परत आणायची तयारी पुर्ण झाली आहे. त्याची संपत्ती तर अगोदरच जप्त झाली आहे.
२) राममंदिर चा मामला सर्वोच्च न्यायालयात शेवटच्या टप्प्यात आहे. निकाल लवकर लागावा असे अपेक्षित आहे.
३) आपल्या देशाची अर्थव्यवस्था गेल्या ५ वर्षात जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली , तसेच तेल उत्पादक देशात आपल्या देशाचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.
४) नरेंद्र मोदींनी १५ लाखांच आश्वासन एकदाही दिले नव्हते . विरोधकांनी अफवा पसरवली.
५) मल्या, निरव मोदी , मेहुल चोक्सीची संपत्ती जप्त, पीटर मुखर्जी तुरुंगात, पिता पुत्र चिदंबरम , राहुल गांधी, सोनिया गांधी, रॉबर्ट वड्रा जामीनावर, कमलनाथ कुटुंबाचे ३०० करोड जप्त, मायावती आणि अखिलेश यांची चौकशी सुरु.
६) दाऊद मरणाला टेकला आहे आणि अस्वस्थ आहे.
७) मल्ल्याचा लंडनमध्ये जामीन नामंजूर. भारतात आणण्याची तयारी. निरव मोदी ला अटक झाली असून तो सध्या तुरुंगात आहे .
८) ६५ वर्षात गंगा दूषित आहे म्हणून एकदाही गंगेत स्नान न केलेले नेहरू - गांधी कुटुंब २०१९ ला गंगेत आंघोळ करुन आले.
९) स्त्रीया बालकांवर अत्याचार अतिशय दुर्दैवी आहेत. स्थानिक पातळीवर सुरक्षा दल कमी पडत असले तरी गेल्या ५ वर्षात स्थिती पुर्वीपेक्षा सुधारली आहे.
१०) २०१४ आणि २०१९ च्या काळात तुमच्या आजूबाजूच्या शहरात किती फरक झाला आहे पाहिला? मेट्रो, मोनो ची कामे जोरात सुरु आहेत.
११) बुलेट ट्रेनचा प्रकल्प २००९ चा आहे. बुलेट ट्रेनपेक्षा जास्त प्राधान्य सध्याच्या ट्रेन सुधारण्यासाठी द्यायला पाहिजेत ह्यासाठी गुजरात आणि पालघरचे भुमीपुत्र आग्रही आहेत.
१२) ५ वर्षात काश्मीर आसाम पंजाब सोडून बाकी देशात कुठेही दहशतवादी हल्ले नाहीत. या तीन राज्यात झालेल्या हल्ल्यांना आपल्या लष्कराने सडेतोड उत्तर दिले होते , देत आहेत.
१३) सध्याचा महागाई दर ४%, २०१४ च्या आधी १०% होता.
१४) पेट्रोल ५ वर्षात २ रुपये वाढलय. २००४ ते २०१४ ४० रुपये वाढलेल.
१५) गेल्या ५ वर्षात शेतकऱ्यांकडून आतापर्यंत सर्वात जास्त दराने सर्वात जास्त खरेदी, तीसुद्धा उघड, रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात.
१६) काश्मिरी पंडित पुनर्वसन प्रक्रिया सुरु होण्यासाठी विरोधक राज्यसभेत विरोध करत होते.
१७) स्टार्टअप इंडिया : ४५०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्टार्टअप.
१८) मेक इन इंडिया : औषधे कंपन्या , रेल्वे कोच, शस्त्र उत्पादन, विमान जहाज निर्मितीत अनेक पटीने वाढ.
१९) स्किल इंडिया : माहिती तंत्रज्ञान, व्यावसायिक तंत्रज्ञान शिक्षित तरुणांच्या संख्येत वाढ. तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रात नोंदणी केली होती?
२०) संपूर्ण कॅशलेस नसले तरी, लेस - कमी कॅश आहे. वीज बील, वीमा, टॅक्स एका क्लिकवर आले. बॅंक आणि बिल भरायच्या रांगा कमी झाल्या.
२१) अच्छे दिन म्हणजे , स्वस्त वीमा, औषध उपचार, गरीबांना आरक्षण, घरात वीज पाणी गॅस. घरासाठी अनूदान. बॉम्बस्फोट गोळीबार नाहीत.
२२) चीनला भारताविरुद्ध जगात समर्थन नाही. डोकलाममध्ये माघार.
२३) डॉलर तुलनेत स्थिर आणि महत्वाचे म्हणजे रुपया आंतरराष्ट्रीय व्यापार चलन झाले.
२४) कन्हैया किंवा इतर तुकडे तुकडे गॅंग तुरुंगात जाण्यासाठी तुम्ही काय केले आहे? तो तुरुंगात जाऊ नये म्हणून वकिल कोण बनले आहे?
२५) बाबासाहेबांचे भव्य स्मारक आणि मराठा आरक्षण ६५ वर्षात का झाले नाही? गेल्या ५ वर्षात मुंबईत बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्याच्या च्या कामाची सुरुवात जागा निवडून सर्व नियम पुर्ण करुन झाली आहे. मराठाच नव्हे तर सरकारने उच्चं वर्णीय आर्थिक दुर्बलांसाठी आरक्षण तरतूद नियमानुसार केली आहे.
राज साहेब, चौकीदार २० तास काम करत आहे, म्हणून २००४-२०१४ मध्ये बँकांनी केलेले अंधाधुंद कर्जवाटप ५ वर्षात वसूल झाले. गेल्या ५ वर्षात देशात एकही भ्रष्टाचार घोटाळा नाही. महत्वाच्या शहरात हल्ले दंगली नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतासोबत व्यापार करायला अनेक देश उत्सुक. महागाई दर निम्मा, दरडोई उत्पन्न जवळपास दुप्पट. अमेरीकेची प्रगती अशीच झाली.
हीं सर्व माहिती थोडे शोधल्यास उपलब्ध आहे. बरीचशी माहिती न्यायालयातल्या निकालात उपलब्ध आहे.
मल्ल्या नीरव चोक्सी गांधी वड्रा चिदंबरम कुटुंब चौकशीत किंवा जामीनावर आहेत आणि कधीही तुरुंगात जाऊ शकतात.
२०१३-२०१४ मध्ये मनमोहनसिंग चिदंबरम आणि ॲंथनी ह्यांनी सरकारकडे पैसे नसल्याची कबुली दिली होती. आज २०१९ मध्ये हेच लोक ३० कोटी लोकांना दरवर्षी ७२००० द्याच्या घोषणा करतायत . म्हणजे चौकीदाराने ५ वर्षे देशाचा पैसा वाचवला आहे आणि वाढवला आहे.
राज साहेब, आपल्या राज्यातली लोक सुस्वभावी, मार्दव आणि गरीब असतील पण मूर्ख नक्कीच नाहीत कि तुमच्यासारख्या नेत्यांनी भडकवायचे आणि ते दिशाभूल होतील.
Comments
Post a Comment