"कर्ज माफी सिद्ध करा" - उद्धव ठाकरे ह्यांचे सरकारला आव्हान. "आधी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करा" - एका मराठी माणसाचे उद्धव ठाकरेंना आव्हान.
"कर्ज माफी सिद्ध करा" - उद्धव ठाकरे ह्यांचे सरकारला आव्हान.
*बाळासाहेबांनी संजय गांधीला ऐकवलं होतं - "नेतृत्व मातृत्वाच्या जोरावर मिळत नाही. ते कर्तृत्वाच्या जोरावर मिळवावे लागते"*
*काय दुर्दैव; आज बाळासाहेबांच्या चिरंजीवांना तेच सांगायची पाळी आली आहे.*
कर्तृत्व दाखवता येत नसेल तर निदान केजरीवाल कडून बोध घेऊन गप्प तरी बसा, कशाला स्वतःचे माकड करून घेता!
८ नोव्हेंबर २०१६ नंतर सतत गरळ ओकण्याचे काम चालू आहे. जमत नसेल तर द्या सोडचिट्ठी आणि उतरा मैदानात. दाखवा कर्तृत्व.
*मराठी माणूस, मराठी माणूस' चा ढोल बडवून मराठी माणसाला एक उपहासाचा विषय बनवला. मराठी उद्योजकाची कल्पना व परिसीमा वडापावची गाडी व झुणका भाकर केंद्राच्या पलिकडे गेली नाही. ती पण बंद झाली*
*काही उभारण्याचं काम कधी केलंच नाही. फक्त 'खळ खट्याक' आवाज केला. २५ वर्षे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असून साधे खड्डे कधी बुजवता आले नाहीत का गटारं साफ ठेवता आली नाहीत*
साधं मुंबई शहराच्या डेव्हलपमेंटचं व्हिजन नाही. आणि आंतरराष्ट्रीय व्हिजन वर वक्तव्य करून केंद्र सरकारवर पोरकट टीका करत सुटतात. कशाला राहुल गांधींच्या पंक्तीत जाऊन बसता?
पेंग्विन पर्यन्त ठीक होतं. पण 'ब्ल्यू व्हेल' गेम खेळु नका.
*जागे व्हा. 'पिता के नाम पे एक वोट दे दे रे बाबा' चे दिवस कधीच निघून गेले.*
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प. मोदींची खोटारडे पंतप्रधान म्हणून संभावना केली आहे. ठीक आहे लोकशाहीत प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य आहे. *राज साहेब याच न्यायाने* *खालील 2 प्रश्नांची* *खरी उत्तरे द्या*
1) तुम्ही मराठी तरुणांसाठी शिव उद्योग सेना काढली होती. मायकल जॅक्सन व लता मंगेशकर यांचे संगीताचे मोठे कार्यक्रम करून *शिव उद्योग सेनेसाठी पैसे जमवले होतेत.* त्या पैशाचे पुढे काय झाले?किती मराठी तरुणांना त्यातून रोजगार मिळाले?
2) नरेंद्र मोदीजी केवळ निवडणूक प्रतिज्ञापत्र भरतानाच नव्हे तर दरवर्षी आपली संपत्ती जाहीर करतात.
*ठाकरे बंधूनी कधी काही व्यवसाय केल्याचे ऐकिवात नाही शिवाय ते आमदार खासदार असे कोणते पदही घेत नसल्याने त्यांना वेतन भत्ते असे कोणते लाभही मिळालेले नाहीत. *मग एवढे प्लॅटस, फार्म हाऊस, आलिशान गाड्यांचे ताफे यांच्याकडे कुठून आले*
*घरात 4-5 महागडे कुत्रे व घरी व फार्म हाऊस वर 20-25 नोकर मंडळी ठेवायला याना कसे परवडते.*
तेंव्हा राज साहेब एकदा *तुमच्याकडे व तुमच्या कुटुंबीयांकडे किती कोटींची संपत्ती आहे?* व ती *कुठून आली?* हे एकदा जाहीर करा मग मोदींवर टीका कर खरे सांगा, देश नक्की कुणी विकला??*
मोदींना सत्तेत येऊन फक्त 3 वर्षे झाली. अपेक्षा मात्र ३० वर सत्ता राबविल्या सारख्या. ५५वर्ष एका घराण्यात सत्ता होती. गरीबांचे, दलितांचे, अल्पसंख्याकांचे, बहुसंख्याक सोडून, सगळयांचे कैवारी म्हणवणाऱ्या नेहरूवादी, समाजवादी, कम्युनिस्ट, सरडेवादी बारामतीकर यांनी सत्ता स्वकीयांकरता राबवली व देश विकायला काढला होता २०१३- १४ पर्यंत. जर नोटाबंदी झाली नसती तर येत्या एक दोन.वर्षांत भारताचा व्हेनेझुएला झाला असता. अर्थतज्ज्ञ गुरूमूर्ती यांचा एक २५ मनिटाचा डोळे उघडणारा व्हीडियो नेटवर आहे तो बघावा. भारतीय अर्थव्यवस्थेला लागलेला कँन्सर कळतो. खरोखरच देश विकायला काढावा अशी परिस्थिती झाली होती.
देश स्वतंत्र झाला तेव्हा एक रुपयाचे कर्ज डोक्यावर नव्हते, आज ७० वर्षानंतर देशात जन्माला येणार प्रत्येक मूल हे ५३००० चे कर्ज घेऊन येते, *देश कोणी विकला??*
७० वर्षात १२८ करोड पैकी केवळ ०४ करोड नागरिक हे करपात्र उत्पन्नाच्या लायकीचे झाले. मात्र नेत्यांच्या नावाने लाखो एकरची जमीन झाली. *देश कोणी विकला??*
तीन वेळा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान असलेल्या व्यक्तीच्या घरातील एकही नातेवाईक मलाई खाणार्या पदावर नाही. आणि दुसरीकडे जावयाचा देशातील मोठ्या मोठ्या व्यवसायात भागीदारी आणि जमीन जुमला आहे. *देश कोणी विकला??*
शेजारी देशांपेक्षा जास्त कुशल मनुष्यबळ आणि होतकरू नागरिक शास्त्रज्ञ देशाकडे असताना संरक्षणाची सारी सामुग्री आयात करण्यात देशाचा पैसा खर्च केला. आजच्या प्रसंगात युद्ध झाले तर दारुगोळ्यासाठी दुसर्या देशावर अवलंबून राहावे लागेल जो देणे तो नाकारू शकतो. या देशात उत्पादन करून संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनणे टाळले आणि आर्थिक गैरव्यवहार करून या क्षेत्रात भ्रश्टाचार करून सुरक्षा दावणीला बांधली. *देश कोणी विकला??*
आपल्या सोबत स्वतंत्र झालेल्या इतर देशांत शेतीवर वेगवेगळे प्रयोग होत असताना आपल्याकडे पैसा संशोधनावर खर्च न करता फक्त कर्ज घेऊन अनुदान देण्यावर खर्च केला. केवळ मतांच्या बेगमीसाठी शेतकऱ्याला स्वावलंबी होऊ न देता *देश कोणी विकला?*
इंग्रजानी बांधलेल्या रेल्वे मार्गिका अद्ययावत न करता, लोकांना त्याच १५० वर्षे जुन्या मार्गावर प्रवास करायला लावला. जागतिक बँकेकडून अब्जो रुपये रेल्वे सुधारण्याकरिता घेऊन प्रत्यक्षात मात्र अत्यंत थोडे काम करून बाकीचा पैसा घशात घातला. *देश नक्की कोणी विकला??*
आज सामान्य नागरिक अगदी स्वतःचे हक्काचे काम पण लाच न देता करू शकत नाही. स्वतः:च्या फायद्यासाठी भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम करणाऱ्या मंत्र्यानी संपूर्ण यंत्रणा पोखरून काढली. आणि आता सत्ता गेल्यावर त्याच अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन सरकारी कामात खोडा घालण्याचा, गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करून प्रामाणिकपणे काम करू पाहणाऱ्या लोकांच्या बदनामीचा खेळ मांडणारे नेते. विचार करून सांगा *देश नक्की कुणी विकला???*
स्वतः:च्या खाजगी उत्पन्नातून महिला विकासासाठी २१ लाख रुपये देणारा नेता एका बाजूला, आणि लहानपणापासून स्वतः:चे वाढदिवस देखील विमानात साजरा करणारा, स्वतः:ला गरिबांचा युवराज म्हणवणारा एका बाजूला. *देश नक्की कोणी विकला??*
आज जर देश १,०२,००,००,००,००० डॉलर रकमेचा जागतिक बँकेचा कर्जदार आहे (इतर देशांचे कर्ज यात धरलेले नाही) तर कुणामुळे??
*खरे सांगा, देश नक्की कुणी विकला??*
Comments
Post a Comment