संजय उवाच ...मंदिर वही बनाएंगे पर तारीख नहीं बताएंगे वगैरे वल्गना

संजय उवाच ..
म्हणे सायबांनी मुलाखत दिली - सत्य कथन केले
म्हणे त्याने महाराष्ट्र ढवळून निघाला..
म्हणे महाराष्ट्रात 'अजब' सरकार येणार ..
म्हणे हिन्दू १९९२ चे उपकार विसरले..?
म्हणे सरकार वर टीका करणे व सत्तेत असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ..
म्हणे राम मंदिर कधी बांधणार ..?
म्हणे म्हणे म्हणे...
अहो महाराष्ट्र ढवळून निघालाय त्यामुळे या प्रत्येक 'म्हणे' कडे आपण पाहणार आहोत..
मात्र आज सुरुवात राम मंदिर ने करुया :
सायबांना राम मंदिराची खूप घाई झाली आहे ...
मंदिर वही बनाएंगे पर तारीख नहीं बताएंगे वगैरे वल्गना..एकच सांगतो : ज्याला दूर दृष्टि असते त्याला द्रष्टा म्हणतात.
पण ज्यांना स्वतःच्या घरा बाजूला उभा राहणारा बेकायदा बेहरामपाडा दिसला नाहीं ते दूर च्या अयोध्या च्या गोष्टी करतात ?
संजय जी तुम्ही सायबांची दृष्टि - जसा कुरुक्षेत्रातला संजय धृतराष्ट्राचा होता, आजचे तुम्ही ..
कृपया आपली दृष्टि तपासून घ्या - इतिहास नीट बघा .


मी द्रष्ट्याचे उदाहरण एवढ्यासाठी दिले की बाबरी ढाचा जमीन दोस्त करणार्या त्या कार्यकर्त्यांनी भविष्य तेव्हाच ताडले होते आणि म्हणून त्या दिवशीच - १९९३ मध्येच अटक होण्या आधी त्यांनी एक अस्थायी राम मंदिर तेथे तेव्हाच उभारले आहे.
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा हे मान्य केले आहे .
तेव्हा सायबाला सांगा की मंदिर बांधून झाले आहे - आता त्याला केवळ भव्य रुप देणे आहे ..

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034