92 वर्षांचा प्रवास आहे संघाचा !
92 वर्षांचा प्रवास आहे संघाचा !
किती स्वयंसेवकांनी अथक प्रयत्न केले, कित्येकांनी संसारावर पाणी सोडले, कित्येकांची जीवने संपली,संपवली गेली...
अपेक्षेप्रमाणे सर्व समाज जीवनाला व्यापून टाकणे हेही आज साध्य झाले असल्याचे दिसते आहे...
सुरुवातीची कितीतरी वर्षे एका विशिष्ट विचारसरणीकडून उपेक्षा,अस्पृश्यता वाट्याला आली..
पण, मार्गावर दुर्दम्य विश्वास होता आणि त्यावर निराश न होता पावले चालत राहिली...
दोन प्रचारक पंतप्रधान,आता राष्ट्रपती आणि लवकरच उपराष्ट्रपती संघ विचारांचे असणार आहेत....हे साध्य नव्हतेच कधी पण हे निदर्शक आहे कि समाजाला आता संघविचार समजला आहे...
'परम वैभवम ने तुमे तत् स्वराष्ट्रम ' हेच अंतिम साध्य आहे..
जयतु । जयतु ।।
Comments
Post a Comment