_छ. शिवाजी महाराजांना पुरोगामी ठरवण्याचे षड्यंत्र !_

*काँग्रेसी नेत्यांना छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही !*
ज्या काँग्रेसी विचारसरणीच्या राजकारण्यांनी भारतावर ७० वर्षे राज्य केले, त्यांनी पाठ्यपुस्तकांतून मोगलांचाच इतिहास मांडून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच दडपण्याचे कार्य केले.
आज ते स्वतःला शिवरायांचा पुळका आल्याचे दाखवत असून छत्रपती शिवाजी महाराज पुरोगामी असल्याचे सिद्ध करण्याचे षड्यंत्र रचत आहेत.
याच राजकारण्यांनी एन्सीईआर्टीच्या (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या) पाठ्यपुस्तकात क्रूर अन् अत्याचारी मोगलांचा इतिहास ६० पाने,तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ चार ओळी (तोही छायाचित्रांशिवाय) प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे त्यांना छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याचासुद्धा नैतिक अधिकार नाही.
सध्या महाराष्ट्रात स्वयंघोषीत जातीयवादी इतिहास-लेखकांचे पीक आले असून श्रीमंत कोकाटे हे त्यापैकी एक आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमात श्री. पवार यांनी असे वक्तव्य केल्याचे नवल नाही.
छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानविरोधी होते की नव्हते, हा प्रश्न नसून अफलजखान, शाहिस्तेखान आणि औरंगजेब हे मात्र हिंदूविरोधी होते हे स्पष्टच आहे.
औरंगजेबाने काशी आणि मथुरा येथील हिंदूंची मंदिरे पाडल्याचा इतिहास सर्वश्रुत आहे. तोच प्रकार अफजलखानाने महाराष्ट्रावर चालून येतांना केला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता असलेल्या श्री तुळजाभवानीच्या, तसेच पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरावर त्याने आक्रमण केले होते; हे मात्र पवार आणि पुरोगामी इतिहासकार पद्धतशीरपणे दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘पोटात एक,ओठात एक आणि प्रत्यक्षात कृती तिसरीच’, अशी ज्यांची ओळख आहे, त्या शरद पवार यांना महाराष्ट्रातील जनता चांगलीच ओळखते.
१९९३ साली मुंबईत दाऊदने ११ हिंदूबहुल क्षेत्रात बाँबस्फोट केले असतांना याच पवारांनी मुस्लिमबहुल भागातही बाँबस्फोट झाल्याचे महाराष्ट्रातील जनतेला खोटे सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास राहिलेला नाही; म्हणूनच या ‘जाणत्या राजा’ला जनतेने आता घरी बसवलेले आहे, हे त्यांनी जातीय विधाने करतांना विसरता कामा नये.

*आपला नम्र,*
*श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता,*
हिंदु जनजागृती समिती, (संपर्क क्र.: 99879 66666)

Comments
Post a Comment