Leadership...

समाजामध्ये LEADERSHIP दोन प्रकारच्या असतात.
१) Image Base Leadership
२) Knowledge Base Leadership
Image base leadership ही आपल्याला सर्वच ठिकाणी बघायला मिळते. अशा leadership कडं गाडी असते, बंगला असतो आणि चमच्यांचा लवाजमा असतो. असे leader पांढरे शुभ्र कपडे घालतात, डोळ्यावर गॉगल लावतात आणि पांढ-या शुभ्र गाडीतून फिरतात. त्यांच्यामागे मग त्यांचे चमचे, दलाल हुजरेगिरी करतात. अशी leadership समाजात पैशाच्या जोरावर image तयार करतात. परंतू ही Image केवळ एका कुरकु-याच्या पाकीटासारखी असते. ज्यात 90% हवा असते. अशा लिडरशीप पासून समाजाचे कधीही पोट भरत नाही. ते समाजाला कोणतेच हक्क अधिकार मिळवून देऊ शकत नाही कारण त्यांचं स्वत:चंच पोट भरलेलं नसतं ते इतरांचं काय भरणार अन् उपाशीपोटी दुस-यांसाठी काय लढणार..! 
Knowledge Base Leadership आपण बघतोच की ही कुठलाही दिखावा करत नाही. समाजात मान-सन्मान मिळावा म्हणून कामंही करत नाही. त्याचं उद्दिष्ट केवळ आणि केवळ आपल्या समाजाच्या हितासाठी कार्यरत राहणे, त्यांच्या हक्काप्रती जागृक राहून त्यांना ते मिळवून देणे, समाजात प्रबोधनात्मक चळवळ निर्माण करणे असे असते. अशी लिडरशीप आपण आपल्या महापुरूषांमध्येच बघू शकतो.
म्हणून  समाजातील बुद्धीजीवी वर्गाने या दोन लिडरशीप ओळखून आपल्या महापुरूषांना अभिप्रेत असलेले स्वातंञ्य, समता, न्याय, बंधुता यावर आधारीत राष्ट्र निर्माण करण्यास योगदान द्यावे हीच अपेक्षा...!!

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034