#रोखठोक #ठाणेकर_म्हणतात_हमाम_में_सारे_नंगे
🧩 *महापालिका निवडणूक : ठाणेकरांना हवेत ५०% नवे चेहरे — गट बाजीला, फोडाफोडीला आणि आरोप-प्रत्यारोपांना जनता कंटाळली!*
• ठाण्याचे राजकारण अनेक वर्षांपासून तेच ते चेहरे, तीच ती समीकरणे आणि तेच ते नाटक पाहत आले आहे.
पक्ष फोडणे, पक्षांतरे, एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोप, गद्दारी-निष्ठा यांची अखंड चालणारी मालिका… ठाणेकरांना याचा आता तीव्र कंटाळा आलेला आहे.
लोकांचं थेट म्हणणं आता बस्स —
*“हमाम में सारे नंगे… आता हे सगळं पुरे!”*
🔹 * यंदा ठाणेकरांची ठाम मागणी — किमान अर्धे उमेदवार नवे असावेत*
शहराच्या वाढत्या समस्या, ताणलेली पायाभूत सुविधा, खालावलेली प्रशासनिक क्षमता आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे *काम न करणाऱ्यांचे कायमचे सत्ताकारण* — या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर लोकांचा आवाज एकच आहे:
✔ *५०% नवे चेहरे हवे*
✔ समाजकार्यातून आलेले, कामगिरी दाखवू शकणारे लोक हवे
✔ घराणेशाही, कायमचे नगरसेवक, निष्ठावंत - गद्दार बकवास हे सगळं नको
✔ खऱ्या अर्थाने शहराला दिशा देणारे उमेदवार हवेत
🔹 *जनता आता मुद्दे विचारते — पक्षांतरे नाही*
“कोण कुणाच्या गोटात गेला?”,
“कोण गद्दार? कोण निष्ठावंत?”,
“कोण कोणाच्या विरोधात?”
ही भाषा आता ठाणेकरांना बोअर झाली आहे.
*लोकांचे प्रश्न वेगळे आहेत:*
* माझ्या रस्त्यांवर खड्डे का?
* वाहतूक कधी सुरळीत होणार?
* शहरात पाणीपुरवठा कधी स्थिर होणार?
* पावसाळ्यात पूरस्थितीचं संकट का?
* अतिक्रमण, फेरीवाले, पार्किंग यावर निर्णय कोण घेणार?
*पक्षीय गदारोळ नको — कृती हवी!*
🔹 *ठाण्याची सर्वात मोठी समस्या – ट्रॅफिक!*
ठाण्याची सर्वात मोठी आणि सर्वात ज्वलंत समस्या – *ट्रॅफिक!*
• आज ठाणेकर घराबाहेर पडताना पहिला विचार करतात,
*“आज कुठे अडकेन? किती वेळ वाया जाईल?”*
शहराचा प्रत्येक मोठा रस्ता — ठाणे–मुलुंड कारिडोर, घोडबंदर रोड, मीरा–भायंदर कनेक्शन, कळवा–मुम्ब्रा बायपास — सर्वच सतत कोंडलेले.
कारमध्ये बसून १० मिनिटांचा रस्ता कधी ४५ मिनिटांचा होतो, ते कळतही नाही.
• *मेट्रो, उड्डाणपुलांचे अर्धवट प्रकल्प — जनतेला त्रास, प्रशासनाला घाई नाही*
जे प्रकल्प वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरू झाले, तेच पुढे अडथळा बनले.
अर्धवट उड्डाणपुलं, महिनोन् महिने वाढणाऱ्या डेडलाईन, न थांबणारा कामाचा संथ वेग —
लोकांना सरळ सरळ प्रश्न पडतो:
“ही कामं पूर्ण करायची की फक्त बोर्ड लावून दाखवायचं?”
*पार्किंगचा अभाव — रस्ते पार्किंगचे डेपो बनले*
ठाण्यातील प्रत्येक गल्लीत कार किंवा बाईक उभी असते.
रस्ते अरुंद, पार्किंगची पॉलिसी नाही, शॉपिंग हब, शाळा, व्यावसायिक इमारती — सर्व ठिकाणी *नो-सिस्टम, फक्त गोंधळ*.
लोकं विचारतात:
*“जेवढ्या गाड्या विकल्या जातात, तेवढ्या पार्किंगची व्यवस्था कोणी करणार?”*
*फक्त घोषणांनी ट्रॅफिक सुटत नाही — तांत्रिक, व्यावसायिक उपाय हवेत*
ठाण्याच्या ट्रॅफिकला फक्त राजकीय भाषणे, जाहीरात मोहीम किंवा फोटो-सेशनने फायदा नाही.
यासाठी लागतात तज्ज्ञ, शास्त्रशुद्ध योजना आणि दीर्घकालीन निर्णयक्षमता:
✔ *इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ITMS)* — कॅमेरे, सिग्नल समन्वय, रिअल-टाइम कंट्रोल
✔ *स्मार्ट सिग्नलिंग* — वाहतुकीनुसार बदलणारी सिग्नल टाइमिंग
✔ *मल्टी-लेव्हल पार्किंग हब्स* — प्रत्येक प्रभागात किमान ३–४
✔ *पब्लिक ट्रान्सपोर्टला प्राधान्य* — बसेस, शटल्स, ई-ऑटो रूट्स
✔ *वॉकवे आणि सायकल ट्रॅक* — छोट्या प्रवासासाठी पर्याय
✔ *भुयारी मार्ग आणि कनेक्टिव्हिटी सुधारणा*
✔ *प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कठोर मॉनिटरिंग*
*ठाणेकरांचा प्रश्न अजूनही तसाच आहे:*
• “हे सर्व करण्याची हिंमत, क्षमता आणि व्हिजन असणारं नेतृत्व नक्की कोणाकडे आहे?”
• शहराचा श्वास रोखून धरणारी ट्रॅफिक समस्या सोडवण्यासाठी घोषणाबाजी नव्हे,
*तांत्रिक कौशल्य, धाडसी निर्णय आणि सातत्यपूर्ण नेतृत्व* लागणार आहे — आणि आज ठाणेकर त्या शोधात आहेत.
🔹*शिवसेना (शिंदे गट) बद्दलचा भ्रमनिरास वाढत*
अनेक वर्षे शहरावर एकाधिकार असलेल्या या गटाविषयी लोकांमध्ये आता स्पष्ट नाराजी:
* अपेक्षेप्रमाणे काम नाही
* शहराचा कायापालट होईल अशी ज्यांनी आशा दिली, त्यांनी ती पूर्ण केली नाही
* मोठमोठ्या घोषणांपेक्षा प्रत्यक्ष काम कमी
*जनता विचारते: सत्ता मिळाली, यंत्रणा मिळाली… पण शहर तरी किती बदलले?*
🔹*भाजपाकडे मतदार आहेत — पण स्थानिक नेतृत्वाकडे व्हिजनची कमतरता*
भाजपाची मतदारसंख्या भक्कम आहे, यात शंका नाही.
पण ठाण्यातील सर्वात मोठा प्रश्न असा की —
*“धमक असलेलं, ठोस व्हिजन असलेलं, शहरासाठी काम करणारे नेतृत्व कुठे आहे?”*
* पक्षाला वोट द्यायला मतदार आहेत पण नेतृत्व च नाही - तेच एक एकटे संजय केळकर..
* पालिकेमध्ये तांत्रिक जाण असणारे नेते नाहीत
* प्रशासनाला खऱ्या अर्थाने धक्का देणारे नेते दिसत नाही
मतदारांचा झुकाव असला तरी उत्साह नाही — कारण विश्वास बसत नाही की बदल घडवतील.
🔹 *काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी — अस्तित्व टिकवण्याची लढाई*
या पक्षांचे ठाण्यातील राजकारण सध्या *फक्त अस्तित्वाच्या संघर्षात* अडकले आहे.
* संघटना कमकुवत
* कार्यकर्त्यांची तूट
* स्थानिक नेतृत्वाचे अभाव
* पक्षांतर्गत गोंधळ
लोकांचे म्हणणे स्पष्ट:
*“हे दोन्ही पक्ष स्वतःला वाचवू शकत नाहीत… शहर काय वाचवणार?”*
🔹*मनसेबद्दल घोर निराशा — ज्या पक्षाबद्दल अपेक्षा होत्या, त्यांनी काहीच केले नाही*
मनसेची भाषा, भूमिका आणि स्टाईल ठाण्याला एकेकाळी आवडली होती.
पण कालांतराने:
* संघटन निष्क्रिय
* नेतृत्वांत एकसंधता नाही
* नगरसेवकांच्या कामगिरीबद्दल असंतोष
* लोकांमध्ये ‘उदासीनता’ भावना
परिणामी *घोर निराशा*.
🔹 तळटीप : यंदाची महापालिका निवडणूक — ठाणेकरांनी घेतलेला ‘मूड टर्न’
यंदा जनता एकाच गोष्टीकडे पाहते आहे:
“जुन्या चेहऱ्यांना कंटाळलो… आता काम करणारे नवे चेहरे द्या!”
जनतेचा स्पष्ट संदेश:
* निष्ठा–गद्दारीचं नाटक नको
* पक्ष फोडाफोडीचे ड्रामे नको
* आरोप-प्रत्यारोपचं गरमागरम राजकारण नको
* *विकास हवा — आणि तोही खरा!*
ठाण्याची निवडणूक यावेळी पक्षांची नाही,
“चेहऱ्यांची” निवडणूक होणार आहे.
ज्याच्याकडे व्हिजन, क्षमता आणि परिणाम देण्याची ताकद असेल –
जनता त्यालाच संधी देणार आहे.
-- © दयानंद नेने

Comments
Post a Comment