*मनुवादी आरोपांचं राजकारण आणि सत्य परिस्थिती*
- दयानंद नेने
"मनुवाद" हा शब्द गेल्या काही दशकांपासून सामाजिक न्यायाच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. परंतु आजच्या राजकीय भाषेत याचा वापर सामाजिक भेद मिटवण्यासाठी नाही, तर विशिष्ट राजकीय समीकरण तयार करण्यासाठी केला जातो.
या लेखात आपण पाहूया की "मनुवाद" या संकल्पनेचा वापर – विशेषतः डाव्या, बहुजन व तथाकथित पुरोगामी राजकीय पक्षांकडून – सामाजिक ध्रुवीकरणासाठी कसा केला जातो आणि त्याचे खरे राजकीय उद्दिष्ट काय आहे:
💥 "मनुवाद" ही कल्पना नेमकी काय आहे?
"मनुवाद" म्हणजे *मनुस्मृतीवर आधारित वर्णाश्रमी समाजव्यवस्थेचे समर्थन करणारी विचारसरणी*.
मनुस्मृतीत काही भेदभावपूर्ण नियम होते हे मान्य करावे लागेल. पण आज भारताचे संविधान हे सर्व नागरिकांना समान मानते आणि तेच अधिकृत आहे.
म्हणजेच, "मनुवाद" ही आज कायद्यात किंवा धोरणांत अस्तित्वात नसलेली एक मानसिक किंवा प्रतीकात्मक संकल्पना आहे. पण राजकारणात ती जिवंत ठेवली गेली आहे.
🎯 "मनुवाद" हा राजकीय शस्त्र म्हणून कसा वापरला जातो?
1. बहुजन, डावे, फुरोगामी पक्षांचा अजेंडा:
• बहुजन नेतृत्व असलेले पक्ष, "मनुवाद" या शब्दाचा उपयोग करून *ब्राह्मण/सवर्णांवर टीका करतात*.
• यामुळे *बहुजन-ओबीसी-दलित* वर्गात अशी भावना निर्माण होते – "आपणच वंचित आहोत, म्हणून आपल्यावर सवर्ण अत्याचार करीत आहेत"*.
• कोणत्याही प्रशासनातील सवर्णाचा निर्णय, योजना किंवा टीका "मनुवादी मानसिकता" ठरवून समाजात दुफळी निर्माण केली जाते.
2. बुद्ध, शाहू, फुले, आंबेडकर यांचा वापर ‘हथियार’ म्हणून:
• ह्या थोर नेत्यांचे विचार सामाजिक परिवर्तनासाठी होते, पण आज त्यांचा वापर *हिंदू परंपरेविरोधी मानसिकता पसरवण्यासाठी* होतो.
• हे नेते "हिंदू धर्म संपवा" असं म्हणाले होते का? – कधीच नाही. पण अपप्रचार करण्यासाठी त्यांचा वापर *हिंदूविरोध* आणि *ब्राह्मणद्वेष* भडकवण्यासाठी होतो.
3. "मनुवादी" ठरवून वैचारिक विरोधकांना बदनाम करणे:
• आरक्षणविषयी मतभेद? → "तू मनुवादी आहेस!"
• संस्कृती आणि परंपरा जपायचं म्हणतो? → "मनुवादाचा प्रचारक आहेस!"
• हा संवाद नाही, हा 'दुसऱ्याला नामोहरम' करण्याचा डाव आहे.
🔥 ‘मनुवाद’ आणि मतांच्या राजकारणाचे समीकरण
• दलित मतदार - "मनुवादाने तुम्हाला शोषले" असे सांगून जोडले जातात
• सवर्ण मतदार - त्यांच्या मनात 'गिल्ट' (guilt) निर्माण करून संयमित ठेवले जातात
• बहुजन - ओबीसी - "ब्राह्मणराज्य" ही टॅगलाइन देऊन भावनिक आवाहन केली जाते
• मुस्लिम, ख्रिश्चन - हिंदू धर्मात भेदभाव असल्याचे दाखवून हिंदू तुमचे शत्रू आहेत असा नरेटिव्ह दिला जातो.
💥 मनुवादी आरोपांचं राजकारण आणि सत्य परिस्थिती
• काँग्रेस, राष्ट्रवादी व समाजवादी पक्ष भाजपाला "मनुवादी" ठरवून टीकेचं एक ठरलेलं शस्त्र वापरतात. यामागचा उद्देश म्हणजे दलित, ओबीसी, आदिवासी व मुस्लिम मतदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करून भाजपासोबत असलेल्या हिंदुत्व विचारधारे विरोधात मतांचं ध्रुवीकरण करणे.
🌀 भाजप खरंच मनुवादी आहे का?
• भाजपा ने कधीही मनुस्मृतीचं समर्थन अधिकृतरित्या केलेलं नाही. उलट अटल बिहारी वाजपेयींपासून नरेंद्र मोदींपर्यंतच्या नेतृत्वाने बहुजन, ओबीसी, दलित या घटकांना प्रतिनिधित्व दिलं आहे.
• नरेंद्र मोदी स्वतः ओबीसी समाजातून आहेत. रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदी नेमणे, द्रौपदी मुर्मू यांना आदिवासी महिला राष्ट्रपती बनवणे ही उदाहरणं सांगतात की भाजपा जातीभेदावर नाही, तर *समावेशक हिंदुत्व* वर विश्वास ठेवते.
*मनुवादाची भीती – एक राजकीय भानगड
मनुवाद हा एक राजकीय भुताटकीचा विषय बनला आहे. काँग्रेस, समाजवादी, डावे पक्ष आणि काही स्वयंघोषित पुरोगामी नेते "मनुवाद" या संकल्पनेचा वापर करून दलित, मागासवर्गीय आणि सामान्य मतदारांना सतत भीती दाखवत राहतात. जणू काही आजही देशात मनुस्मृतीचे राज्य आहे आणि ब्राह्मणांनी समाजावर वर्चस्व गाजवले आहे.
पण सत्य वेगळे आहे.
आज भारतीय संविधान सर्वांना समान अधिकार देतो. जातीभेद, अस्पृश्यता, भेदभाव हे कायद्याने गुन्हे ठरवले गेले आहेत. आरक्षण, विशेष सवलती, विविध योजना यांद्वारे मागास वर्गांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. अशा परिस्थितीतही विरोधी पक्ष *मनुवादी सत्ताधाऱ्यांचा धोका* म्हणून जनतेसमोर एक आभासी भिती निर्माण करतात.
खरं पाहिलं तर, स्वतः काँग्रेसनेच दीर्घ काळ सत्तेत राहून जातीय समीकरणांचा खेळ खेळला. ओबीसींना, दलितांना फक्त मतपेटीचे साधन मानले गेले. समाजाला खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी प्रयत्न झालेच नाहीत.
आज मनुस्मृती कुणी वाचत नाही, ना ती कुणी मानतो. ती कालबाह्य झाली आहे. तरीसुद्धा काही नेते मनुवाद, ब्राह्मणवाद, शोषण असे शब्द वापरून मतपेट्यांचे राजकारण करतात.
लोकांनीही आता डोळस व्हायला हवे. प्रत्येकवेळी एकाच जुनाट गोष्टीची भीती दाखवून कोण तुम्हाला मूर्ख बनवतंय हे ओळखायला हवं. विकास, शिक्षण, रोजगार, सुरक्षितता हे प्रश्न महत्त्वाचे आहेत – मनुवाद नाही.
लेखकाची टीप : भूतकाळातील एका पुस्तकावर आधारित भीती दाखवून आजच्या समस्यांपासून लक्ष हटवणं हीच विरोधकांची खरी युक्ती आहे.
जनता यापुढे अशा राजकीय अफवांना बळी न पडता विचारपूर्वक निर्णय घेईल, हीच अपेक्षा.
- दयानंद नेने
2/7/25
Comments
Post a Comment