*#जातीयवादी_महाराष्ट्र - #काँग्रेस_राष्ट्रवादीचे_उद्योग*
💥*“शिव - शाहू–फुले–आंबेडकरांच्या नावाने जातीय राजकारणाचा नव्याने रंगवलेला चेहरा”*
•;महाराष्ट्रातील राजकारणात *आदर्शांची माती करून सत्तेची बीजे पेरण्याचा* प्रयोग आता धोक्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे.
समाजसुधारणेच्या आणि स्वराज्याच्या नावाखाली जनतेला भावनिकतेच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न पुन्हा नव्या स्वरूपात दिसू लागला आहे.
• *शाहू–फुले–आंबेडकर–शिवाजी महाराज* ही चार तेजस्वी नावे — जी सामाजिक न्याय, शिक्षण, समता आणि हिंदवी स्वराज्याची प्रतीकं आहेत — आज राजकारणात केवळ *मतांचे गणित जुळवण्यासाठीचे घोषवाक्य* बनली आहेत.
🔹 *‘पुरोगामी महाराष्ट्र’ – संकल्पनेचा उगम आणि विकृती*
• *पुरोगामी महाराष्ट्र* ही संकल्पना मूळतः *सामाजिक सुधारणा, शिक्षण आणि समतेवर आधारलेली होती.*
महाराष्ट्रातील समाजवादी, कम्युनिस्ट, शेतकरी–कामगार चळवळींनी १९५०च्या दशकात हा शब्द वापरायला सुरुवात केली.
या वाक्प्रचाराचा पहिला ठोस वापर प्रबोधनकार ठाकरे, साने गुरुजी आणि समाजवादी पक्षाच्या लिखाणात दिसतो.
• त्या काळात “पुरोगामी महाराष्ट्र” म्हणजे — *ज्या महाराष्ट्रात जात, धर्म, वर्गभेद नष्ट करून समतेवर आधारित समाज उभा राहील*, असा होता.
म्हणजेच तो विचार *राजकीय नव्हे, तर समाजसुधारणेचा* होता.
• मात्र, १९९९ नंतर काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडी ने हा वाक्प्रचार ‘हायजॅक’ केला.
त्यांनी “आम्हीच पुरोगामी महाराष्ट्राचे वारसदार” असा गाजावाजा सुरू केला, आणि पुढे “शाहू–फुले–आंबेडकर” हेच पुरोगामी विचारांचे मूर्तिमंत रूप असल्याचा राजकीय प्रचार सुरु झाला.
त्यामुळे या संकल्पनेचे मूळ तत्त्व — *समानता आणि सामाजिक न्यायाचा व्यापक दृष्टीकोन* — हळूहळू *जातीय मतांच्या हिशोबात रूपांतरित* झाले.
🔹 *१९९५ – परिवर्तनाचा टप्पा*
• १९९५ हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक निर्णायक वळण ठरले.
पहिल्यांदा *शिवसेना–भाजप सरकार* सत्तेत आले, तर केंद्रातही भाजप-प्रणीत NDA सरकार स्थापन झाले.
या नव्या राजकारणाने *सर्वधर्मसमभाव* या काँग्रेसवादी भाषेऐवजी *हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि सांस्कृतिक आत्मगौरव* या मूल्यांना प्राधान्य दिले.
बाळासाहेब ठाकरे यांनी त्या सरकार ला *शिवशाही सरकार* असे नाव दिले आणि यापुढे "श्रींच्या इच्छेनुसार" राज्य चालेल असे घोषित केले.
या बदलत्या वातावरणात काँग्रेस आणि नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी नवे “भावनिक सूत्र” शोधावे लागले.
🔹 *१९९९ – जातीय समीकरणांचा उदय*
• १९९९ मध्ये *काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडी* सत्तेत परतली.
याच काळात त्यांनी युती सरकारच्या शिवशाही संकल्पनेला छेद देण्यासाठी *जातीय राजकारणाचे बी पेरले.*
दलित, ओबीसी आणि मुस्लीम मतदारांमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी त्यांनी *“शाहू–फुले–आंबेडकर”* या त्रिकुटाचा राजकीय वापर सुरू केला.
• या घोषणेमागे सुधारणा नव्हती, तर *हिंदुत्ववादी एकात्मतेचा प्रभाव कमी करणे आणि समाजात विभागणी करणे* हा हेतू स्पष्ट दिसत होता.
“सामाजिक न्याय” या आवरणाखाली मतांचे तुकडे करण्याचे धोरण या काळात आकाराला आले.
🔹 *2024 – आता ‘शिव’ जोडला गेला*
• आता या खेळात आणखी एक नवे पान जोडले गेले आहे — *शिव* - शिवाजीतला.
• 2024 मध्ये काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडीने “शाहू–फुले–आंबेडकर” या त्रिकुटात *छत्रपती शिवाजी महाराजांचा समावेश* करून महाराजांना भाजपा- शिवसेनेपासून चोरण्याचा उद्योग सुरु केला.
• त्यांनी नवा खोटा प्रचार केला की शिवाजी महाराज एक प्रकारे सेक्युलर होते - त्यांच्या सैन्यात 70% मुसलमान होते आणि त्यांनी हिंदवी स्वराज्य नव्हे तर रयतेचे राज्य स्थापित केले होते.
• किती खोटे आणि हास्यास्पद!
• हिंदवी स्वराज्याचा गौरव वाढवण्यासाठी नव्हे, तर *दलित, मुस्लीम आणि ओबीसी मतदारांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करून मतांचे नवीन समीकरण रचण्यासाठी* हा प्रयोग केला जात आहे.
इतिहासाचा चुकीचा संदर्भ देऊन सत्तेचे राजकारण रंगवले जात आहे.
🔹 *हेतू स्पष्ट — विभाजनाची पेरणी*
• या सर्व हालचालींचा एकच गाभा दिसतो —
*जातीय सलोखा उद्ध्वस्त करून राजकीय फायद्यासाठी समाजात तुकडे करणे.*
शाहू, फुले, आंबेडकर आणि शिवाजी ही नावे जनमानसातील आदराचे प्रतीक आहेत,
पण आज ती फक्त *मतपत्रिकेवरील हिशोबाची साधने* बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
🔹*सीधी बात*
• एका विचारसरणीचा मुकाबला विचारांनीच करता येतो — जातीयतेने नाही.
• पण महाराष्ट्रात काही राजकीय शक्तींनी विचारांचा मुकाबला *विभाजनाच्या शस्त्राने* करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
आज *शिव–शाहू–फुले–आंबेडकर* ही नावे समाजसुधारणेचे नव्हे, तर *राजकीय तुकड्यांचे प्रतीक* बनली आहेत —
आणि म्हणूनच, *पुरोगामी महाराष्ट्राच्या मूळ संकल्पनेचा पुनर्जन्म* गरजेचा आहे.
-- © दयानंद नेने
Comments
Post a Comment