ठाकरे पुराण - 1* "राज ठाकरे - उद्धव ठाकरे युती झाली तरी का टिकणार नाही?"

 *ठाकरे पुराण - 1*


"राज ठाकरे - उद्धव ठाकरे युती झाली तरी का टिकणार नाही?"


- दयानंद नेने 


महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे घराण्याचे एक महत्त्वाचे स्थान आहे.

1966 मध्ये मराठी माणसासाठी म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीला मुंबई मध्ये बस्तान बसल्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेबांनी भाजप शी युती केली आणि बघता बघता शिवसेना महाराष्ट्रात पसरली.


2004 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पश्चायत शिवसेनेत नेतृत्वाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांना दिली.

तेव्हा प्रथम नारायण राणे आणि नंतर राज ठाकरे सेनेतून बाहेर पडले.


राज ठाकरे यांनी वेगळी ‘मनसे’ स्थापन करून स्वतंत्र राजकीय प्रवास सुरू केला. 

सुरुवात तर राज ठाकरे यांनी दणक्यात केली होती. 2009 मध्ये निवडणूक पदार्पणात त्यांचे 13 आमदार निवडून आले. मुंबई महानगर पालिकेत 28 नगरसेवक, नाशिक मध्ये महापौर व सत्ता, पुण्यात 30 नगरसेवक - राजच्या सभाना भरभरून गर्दी - महाराष्ट्राच्या पटलावर मनसे हा उभारता सितारा होता.


पण राज ने लोकांचा भ्रमनिरास केला. त्यांच्या राजकारणात सातत्य नव्हते. त्यांना विचारल्याशिवाय नेत्यांना बोलायची परवानगी नव्हती. त्यांच्या कोणत्या विषयावर भूमिका ठाम नव्हत्या - एक मराठी विषय सोडून. कधी मोदी यांना पाठिंबा तर कधी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत फ्लर्टींग करत मोदी शाह यांना टोकाचा विरोध. 


घरात बसून त्यांची ग्राऊंड शी नाळ तुटली आणि मनसे ची लोकप्रियता झापाट्याने कमी झाली.


दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपले तळ्यात मळ्यात करत राजकारण सुरु ठेवले. त्यांचेसूद्धा वैयक्तिक महत्वाकांक्षेसमोर पार्टी गेली तेल लावत ही वृत्ती. त्यामुळे ते भले मुख्यमंत्री झाले पण त्यांच्या डोळ्या देखत शिवसेना दुभंगली.


गेल्या काही वर्षांत विविध घडामोडींमुळे दोघां भावांच्या युतीची शक्यता अनेकदा चर्चेत आली; मात्र प्रत्यक्षात ती युती होऊ शकलेली नाही. यामागे केवळ राजकीय मतभेद नाहीत, तर एकमेकांशी ‘खूपच’ जुळणाऱ्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे ती युती अजूनच अशक्य वाटते.


1. दोघांचे व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव – “एकाच नाण्याच्या दोन बाजू”


• राज आणि उद्धव दोघेही बाळासाहेबांच्या वारसाचे दावेदार. स्वभावाने दोघेही एककल्ली, आत्ममग्न आणि वर्चस्वप्रिय. त्यांना “मी केंद्रस्थानी” असं हवं असतं. सहकार्य करण्याची वृत्ती दोघांकडे मर्यादित. अशा स्वभावाच्या दोन नेत्यांची युती म्हणजे स्फोटक मिश्रण!


2. दोघांचीही भूमिका “मुख्य नेता” मीच – पण "सिंहासन मात्र एकच!"


• राज ठाकरेंनी मनसे स्थापन करून ‘स्वतंत्र बाळासाहेब’ होण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे उद्धव यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून सिंहासन अडवून धरले. जर युती झालीच, तर कुणाला वर आणि कुणाला खालचं स्थान द्यायचं? हीच सर्वात मोठी पेचप्रसंगाची ठिणगी ठरणार.


3. एकाच मतदार गटावर डोळा – "मराठी अस्मिता आणि मुंबई"


• दोघांचीही ताकद मुंबई, ठाणे, नाशिक या शहरी मराठी मतदारांमध्ये आहे. जर युती झाली, तर दोघांचा मतदार एकच असल्यामुळे तिकीट वाटप, प्रचाराच्या वेळेस मतांचा “इन-हाउस” संघर्ष अनिवार्य ठरतो. त्यामुळे युती म्हणजे एकमेकांची जागा खाण्याचा खेळ ठरेल.


4. भाषण शैली आणि नेतृत्व शैली – अहम भ्रम:स्मि असा अवतार


• दोघेही आक्रमक भाषण शैलीचे पुरस्करते. परंतु उद्धव यांची नेतृत्व शैली थोडी सूचक आणि मवाळ आहे, तर राज ठाकरेंची शैली सरळ आणि बिनधास्त आहे. त्यामुळे प्रचारात किंवा सभांमध्ये यांची तार जुळणार नाही


5. कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा – “आपले आणि त्यांचे”


• मनसे आणि शिवसेना उबाठा चे कार्यकर्ते एकाच परिसरात काम करतात. ते पूर्वी एकत्र होते म्हणूनच त्यांच्यात तुलना होते. जर युती झाली, तर स्थानिक पातळीवर वर्चस्वासाठी संघर्ष सुरू होईल त्यामुळे कार्यकर्तेच एकमेकांचे शत्रू बनतील.


6. दोघांनाही 'क्लिष्ट' सल्लागारांचा विळखा


• उद्धव ठाकरे यांच्याभोवती एक विशिष्ट मंडळींचा गट आहे, तर राज ठाकरे यांच्याभोवती काही प्रोफेशनल आणि ब्राह्मण / बुद्धिजीवी सल्लागारांचा प्रभाव आहे. हे गट एकमेकांशी सामंजस्य ठेवू शकणार नाहीत आणि मतभेद निर्माण होतील.


7. जाहीरनामा आणि मुद्द्यांतील फरक – "एक नवा हिटलर, एक नवा गांधी?"


• राज यांचा अजेंडा जास्त आक्रमक महाराष्ट्रवादी, हिंदुत्ववादी आणि स्पष्टवक्तेपणाकडे झुकलेला आहे. उद्धव यांचा अजेंडा आता काँग्रेस-एनसीपीप्रणीत सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता, आणि मवाळ धोरणांकडे झुकलेला आहे. त्यामुळे धोरणात्मक फंडामध्येच सुसंगती नाही.


8. 'क्लास' विरुद्ध 'मास' ची मानसिकता


• राज ठाकरेंना वैयक्तिक 'एलिट' वर्गाचे आकर्षण आहे – आर्टिस्ट, शहरी उच्चवर्ग, तरुण प्रोफेशनल्स यांचा ओढा. पण त्यांचे मनसैनिक बरेचदा एकदम टपोरी. तर उद्धव यांचे जास्त लक्ष - बोलण्यासाठी का होईना - पारंपरिक शिवसैनिक, गरीब मराठी माणूस, झोपडपट्टीतील जनता यांच्याकडे. ही मानसिकताच विरोधात आहे.


9. 'बाळासाहेब कोणाचे?' या प्रश्नावर स्पर्धा


• आजही दोघांचे सोशल मीडियावरील, भाषणांमधील आणि पक्षकार्यातील केंद्र 'बाळासाहेब' आहेत. कोण अधिक "खरा वारसदार" हे पटवण्याचा संघर्षच त्यांच्या युतीचा व्हायच्या आधीच अंत ठरतो.


10. “कोण कोणाला गिळणार?”


• जर एकत्र आले, तर कोणत्याही परिस्थितीत एक पक्ष दुसऱ्यावर हावी होणार. हीच शक्यता असह्य आहे. त्यामुळे दोघेही एकत्र आले तरी युती टिकणार नाही. कारण त्यांची वाढ एकत्र आणि एका वेलावर होऊ शकत नाही.


💥 राज आणि उद्धव ठाकरे यांची युती फक्त फोटो, बैठकी आणि निवडणुकीपूर्वीची चर्चा या मर्यादेतच शक्य आहे. प्रत्यक्षात ती शक्य नाही, कारण ते दोघेच खूप सारखे आहेत – स्वभावाने, मतांमध्ये, मतदारांमध्ये आणि महत्वाकांक्षांमध्ये.

एकाच सिंहासनावर दोन सिंह राहू शकत नाहीत, आणि दोघेही स्वतःला 'सिंह' समजतात – हीच युतीची सर्वात मोठी अडचण आहे.


- दयानंद नेने 

   3/7/25

Comments