*ठाणे मेट्रोचा दिखावा – निवडणूक स्टंटच!*
ठाणेकरांनो, काल तुम्ही पाहिलेली मेट्रोची सजलेली गाडी म्हणजे कोणतंही *उद्घाटन नव्हतं*. ते केवळ *तांत्रिक परीक्षण (technical trial)* होतं. पण याचा बागुलबुवा करून, जणू उद्या मेट्रो सुरू होणार आहे, असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे.
*कामाचा वेग – कासवाचाही लाजवेल!*
ठाण्यात मेट्रोचं काम कित्येक वर्षांपासून सुरू आहे, पण गती इतकी संथ की कासवलाही लाज वाटावी. अनेक स्टेशनं अजूनही बांधकामाच्या अवस्थेत आहेत, ट्रॅक बसवणी चालू आहे, तर काही ठिकाणी काम सुरू करण्याचीही वाट बघत आहे. या गतीने काम पूर्ण होण्यासाठी किमान *2027 च्या अखेरपर्यंत* तरी वाट पाहावी लागणार आहे.
*निवडणुकीसाठी शो-बाजी*
कालच्या कार्यक्रमाचा मुख्य हेतू एकच – *महापालिका निवडणुकीच्या आधी ठाणेकरांना झोपेत ठेवणे*. सजवलेली गाडी, फुले, रिबिनी, फोटोग्राफर, हिरवे झेंडे दाखवणे, प्रचारबाजी... पण प्रत्यक्षात प्रवासी वाहतूक सुरू करण्याची तारीख कुठे आहे? ठाणेकरांना खोटी आश्वासनं देऊन फक्त निवडणुकीचा फायदा घ्यायचा, एवढाच या सगळ्या सोहळ्याचा उद्देश होता.
*ठाणेकरांची सहनशक्ती संपते आहे*
दररोजची कोंडी, तासन्तास वाहतुकीत होणारा वेळेचा अपव्यय, अपूर्ण कामामुळे धुळीत चालावं लागतंय – हे सगळं ठाणेकरच सहन करत आहेत. मेट्रोच्या नावाखाली त्याग करणाऱ्या ठाणेकरांना खरी मेट्रो सेवा मिळायला अजून किमान दोन वर्ष तरी वाट पाहावी लागणार आहे.
मेट्रो प्रकल्प हा ठाण्यासाठी जीवनरेषा ठरणार आहे. पण निवडणुकीचा फायदा मिळवण्यासाठी "उद्घाटन झालं" अशी *धोका-धडीची शोबाजी* करणं म्हणजे ठाणेकरांच्या विश्वासाशी प्रतारणा होय. राजकारण्यांनी गाजावाजा थांबवून, प्रत्यक्षात काम पूर्ण करून मेट्रो लवकरात लवकर सुरू करावी, एवढीच ठाणेकरांची मागणी आहे.
-- *दयानंद नेने*
*लेखक: व्हिजन ठाणे 2035*
*23/9/35*
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

Comments
Post a Comment