*राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर खोटे आरोप: जनतेच्या मनात संभ्रम आणि सनसनाटी निर्माण करण्याचा डाव*
• काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा *खोट्या आरोपांच्या राजकारण करण्याचा खेळ* अवलंबला आहे.
• लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी सर्वात आधी **EVM मशिन्सबाबत संशयाचे वातावरण** तयार करण्याचा प्रयत्न केला आणि आता ते *"वोटर चोरी"* चा नवा नारा घेऊन जनतेची दिशाभूल करत आहेत.
*EVM वर संशय – न्यायालयात अपयश मिळाल्यावरही थांबले नाहीत*
• काँग्रेसने आणि काही इतर विरोधी पक्षांनी *EVM म्हणजे धांदलीचे मशीन* असा प्रचार मोठ्या प्रमाणावर केला. मात्र *सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत हा दावा फेटाळला*, तसेच देशातील निवडणूक आयोगाने वारंवार सांगितले की EVM पूर्णपणे सुरक्षित, पारदर्शक आणि छेडछाड रहित आहेत. अनेक वेळा व्हीव्हीपॅट आणि रँडम चेकिंगच्या माध्यमातून याची खातरजमा देखील झाली आहे.
• मात्र राहुल गांधींनी याला कधीच मान्य केले नाही. त्यांना सत्यापेक्षा *सनसनाटी आणि अफवा पिकावण्यात अधिक रस आहे* आहे, असेच त्यांच्या वर्तनावरून दिसून येते.
*"वोटर चोरी" म्हणजे काय?*
• सध्या राहुल गांधी एक नवीन संकल्पना घेऊन आले आहेत – *वोटर चोरी*. त्यांचा दावा आहे की *सरकार आणि निवडणूक आयोग संगनमताने विरोधकांचे मतदार यादीतून नावं हटवत आहेत* किंवा *मते दुसऱ्याच्या खात्यात जात आहेत*. मात्र आजवर त्यांनी *कोणतेही ठोस पुरावे* सादर केलेले नाहीत. ना त्यांच्याकडे याची आकडेवारी आहे, ना एखाद्या मतदाराच्या तक्रारीचे पुरावे.
• हा फक्त एक राजकीय स्टंट आहे. लोकांच्या मनात निवडणूक प्रक्रियेबाबत अविश्वास निर्माण करून लोकशाहीच्या मुळांवर घाला घालण्याचा हा प्रयत्न आहे.
*निवडणूक आयोगाच्या प्रतिमेला दूषित करण्याचा कट*
• भारताच्या निवडणूक आयोगाची प्रतिमा *जगभरात एक विश्वासार्ह आणि निष्पक्ष संस्थेच्या रूपात ओळखली जाते.* अनेक राष्ट्रे भारताकडून निवडणूक व्यवस्थापन शिकतात. पण राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाचे नेते वारंवार *बेबंद आरोप करून या संस्थेची विश्वासार्हतेला धक्का लावण्याचा प्रयत्न करत आहेत*.
• हे केवळ निवडणुकीत अपयश झाकण्यासाठी किंवा पराभवाचे खापर दुसऱ्यावर फोडण्यासाठीच नव्हे, तर *जनतेच्या मनात भ्रम आणि अस्थिरता पसरवण्याचे धोकादायक राजकारण* आहे.
• राहुल गांधींनी सध्याच्या राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक मुद्यांवर काही ठोस कार्यक्रम देण्याऐवजी *अफवांची, शंका-कुशंका पेरण्याची रणनीती अवलंबली आहे*. हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. खोट्या आरोपांच्या या मालिकेने त्यांनी स्वतःच्या नेतृत्वावर व राजकारणाबद्दल गांभीर्य गमावलं आहे.
*भारतीय जनतेने अनेकदा हे खोटं राजकारण नाकारले आहे आणि भविष्यतही नाकारेल*
-- दयानंद नेने
8/8/25
Comments
Post a Comment