मृत अर्थव्यवस्था" की मृत विचारधारा? – ट्रम्प आणि राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध

 *"मृत अर्थव्यवस्था" की मृत विचारधारा? – ट्रम्प आणि राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध*


• अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची अर्थव्यवस्था "मृत" असल्याचा दावा केला. 

हे विधान केवळ अतिशयोक्तिपूर्णच नाही, तर तथ्यांपासून पूर्णपणे दूर आहे. 

• पण त्याहून गंभीर बाब म्हणजे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी या वक्तव्याचा सोशल मीडियावर दुजोरा देत, जणू काही भारताची अधोगती सिद्ध होत असल्याचा आनंदच व्यक्त केला.

• भारत आज जागतिक स्तरावर सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात ७.८% दराने जीडीपी वाढली आहे. देशाने युकेला मागे टाकून पाचवे स्थान पटकावले आहे. उत्पादन, स्टार्टअप्स, डिजिटल सेवा आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि प्रगती सुरू आहे. अशा वेळी भारताच्या अर्थव्यवस्थेला "मृत" म्हणणे म्हणजे देशाच्या जनतेचा, उद्योजकांचा आणि श्रमिकांचा अपमान आहे.

• राहुल गांधींनी ही टीका देशातील समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी केली असती तरी समजले असते की त्याला काही अर्थ असता. पण त्यांनी ट्रम्प च्या वक्तव्यावर आनंद व्यक्त करत केवळ अदानीचा राग आलापला.

• एखाद्या परदेशी नेत्याच्या अर्धवट आणि राजकीय हेतूंनी प्रेरित विधानाचा उद्धार करत स्वतः च्या सरकारवर टीका करणे, हे केवळ पोकळ राजकारण आहे. अशा वर्तनामुळे राहुल गांधी देशाचे प्रतिनिधित्व करतायत की देशाच्या शत्रुंचे प्रॉक्सी, हेच कळेनासं झालं आहे.

• आजच्या जागतिक अर्थकारणात भारत एक आशावादी आणि स्थिर पर्याय म्हणून पाहिला जातो. अमेरिका, जपान, युरोपसारख्या देशांमध्ये.मंदीचा धोका असताना भारतात उत्पादन, सेवा आणि निर्यात क्षेत्र स्थिर राहिले आहे. ग्रामीण आणि शहरी बाजारात मागणी टिकून आहे. अर्थात, बेरोजगारी, महागाई आणि असमानता या समस्या आहेतच, पण त्या कोणत्याही अर्थव्यवस्थेत असतातच — त्यावर काम केले पाहिजे, पण अर्थव्यवस्थेचं "अंत्यसंस्कार" करणं हे अतिरेकी आहे.

• ट्रम्प यांच्या असंवेदनशील वक्तव्यावर आपण टीका करायला हवी होती, उलट राहुल गांधी यांनी त्याचे स्वागत करत स्वतःचा राजकीय अजेंडा पुढे रेटला. ही केवळ असंवेदनशीलता नाही, तर जबाबदारीपासून पळवाट आहे.

• भारताची आर्थिक वाटचाल अपूर्ण आहे, पण ती निश्चितपणे "मृत" नाही. काही राजकीय विचारसरणी मात्र वास्तवापासून तुटून गेलेल्या, मृत आणि दृष्टीहीन झालेल्या आहेत.

- दयानंद नेने

     1/8/25

Comments