*उत्तराखंडात आभाळ फाटले – एक गंभीर इशारा*
उत्तराखंडात एकीकडे अवेळी आलेल्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम आता सातत्याने दिसू लागले असूनही आपण अजूनही जागे झालेलो नाही. निसर्गाची अवहेलना केल्यास तो थेट शिक्षा करतो – याचे जिवंत उदाहरण उत्तराखंडमधील ताज्या दुर्घटनेत दिसले.
*धारलीतील विध्वंसक ढगफुटी:*
* गंगोत्रीपासून २० किमीवर धारली येथे ढगफुटी झाली; काही सेकंदांत सर्वकाही नष्ट.
* भागीरथी नदीने रौद्ररूप धारण करत अनेक घरे, मंदिरं, हॉटेल्स वाहून नेली.
* बालकंधार मंदिर आणि कल्पकेदार मंदिर उद्ध्वस्त.
* श्रावणमुळे असंख्य भाविक गंगोत्रीत; अनेक बेपत्ता, मृतांची नेमकी संख्या अद्याप अज्ञात.
* गंगोत्री ते उत्तरकाशी महामार्ग बंद, आर्मी बेस कॅम्पही नुकसानग्रस्त.
*निसर्गाचा संताप की मानवनिर्मित आपत्ती?*
* डोंगरांवर पावसाचे पाणी चिखल व दगडासह खाली येते – संपूर्ण वस्त्याच गिळंकृत होतात.
* प्रशासन हवामान खात्याचे इशारे गंभीरपणे घेत नाही, आणि खात्याचे अंदाजही अचूक नसतात.
* नद्यांच्या किनाऱ्यावर घरांची बांधकामं कोणाच्या परवानगीने झाली, हा मूलभूत प्रश्न.
* मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक शहरे नाल्यांवर, ओढ्यांवर आणि तलावांवर उभी राहिली आहेत.
*हिमालय – भुसभुशीत पर्वतरांगांवरचा धोका:*
* हिमालयातील अनेक डोंगर आतून पोकळ झाले आहेत – त्यामुळे भूस्खलनाची शक्यता जास्त.
* टिहरी व लोहरी नाग पाला येथे जलविद्युत प्रकल्पांनी पर्वतरचना कमकुवत केली.
* पर्यावरणाचा सल्ला धाब्यावर बसवून विकासकामे झाली.
*पर्यटनाचा बेजबाबदार स्फोट:*
* कावड यात्रा, डीजे, ट्रक ओव्हरलोड – पर्वतरस्त्यांवर अपघातास कारणीभूत.
* ट्रक चालकांना पर्वतरस्त्यांचा अनुभव नसल्याने वाहतूक धोकादायक.
* कचरा, ध्वनिप्रदूषणामुळे प्राणी व निसर्गसंतुलन बिघडले.
* झाडांची बेसुमार तोड, त्यामुळे पावसाचे पाणी व माती सावरणारे संरक्षक घटक हरवले.
*धारली आणि सुखी टॉप – मृत्यूचे थैमान:*
* धारली आणि सुखी टॉप पूर्णतः उद्ध्वस्त.
* ८००० फूट उंचीवरील गाव ढिगाऱ्याखाली दबले.
* वाहतूक ठप्प; मार्ग तात्पुरता सुरळीत करण्यासाठी किमान २० दिवस लागतील.
हिमालयातील प्रदेश हे पर्यटन स्थळांपेक्षा संवेदनशील निसर्गक्षेत्रे आहेत. झपाट्याने होणारी अतिक्रमण, बेजबाबदार विकास, अनियंत्रित पर्यटकसंख्या आणि पर्यावरणाच्या नियमांकडे दुर्लक्ष यामुळे अशा आपत्ती आता नेहमीच्या गोष्टी झाल्या आहेत.
ढगफुटी, भूस्खलन, पूर हे आता अपवाद राहिले नाहीत – तर ती निसर्गाची सूडाची कारवाई बनली आहे. आता तरी शासन, प्रशासन, पर्यटक, स्थानिक जनता – सगळ्यांनीच निसर्गाचा सन्मान करणे गरजेचे आहे. अन्यथा अशी “आभाळ फाटले " अवस्था सातत्याने अनुभवावी लागेल.
-- दयानंद नेने
7/8/25
Comments
Post a Comment