जैन समाजाचे कबुतरप्रेम – किती हिताचे, किती हानिकारक?

 *जैन समाजाचे कबुतरप्रेम – किती हिताचे, किती हानिकारक?*


जैन धर्म *अहिंसा, जीवदया आणि सहिष्णुता* यांचे प्रतीक मानले जाते. अनेक जैन बांधव पक्ष्यांना दाणा घालण्याच्या उपक्रमात सक्रीय असतात. कबुतरांसाठी विशेष *‘पिंजरापोळ ’* किंवा *दाणा-पाणी केंद्रे* उभारली जातात. यामागील हेतू निःसंशयपणे पुण्यसंचय आणि जीवमात्रांप्रती दयाभाव ठेवण्याचा असतो. 

पण प्रश्न असा आहे की हे कबुतरप्रेम *शहरासाठी, आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी किती हितकारक आहे, आणि किती हानिकारक?*


*कबुतरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या:*


1. **विष्ठेचा उपद्रव**:

   कबुतरांची विष्ठा सर्वत्र पडते — इमारतींच्या बाल्कनी, गच्च्या, शिड्या, मंदिरे, वसाहती यावर ही विष्ठा साचते.

   ➤ यामुळे इमारतींचे सौंदर्य हरवतेच, पण त्याहून गंभीर म्हणजे *आरोग्याला धोका निर्माण होतो.*


2. *आरोग्याला गंभीर धोका – ‘पिजन लंग’*:

   कबुतरांच्या विष्ठेतून *Cryptococcus, Histoplasma आणि Chlamydia* सारख्या जीवाणूंचा प्रसार होतो.

   ➤ *‘पिजन लंग’* हा आजार विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि दम्याचे रुग्ण यांच्यात आढळतो.

   ➤ त्यात फुफ्फुसात इन्फेक्शन होऊन *श्वासोच्छवासाच्या गंभीर तक्रारी* निर्माण होतात.


3. **जनजीवनात अडथळा**:

   शेकडोन्च्या संख्येने कबुतरे एका ठिकाणी जमा झाली, की ती लोकांच्या राहण्या जागीही धुमाकूळ घालतात. कपडे खराब करणे, अन्नधान्यावर विष्ठा पडणे, हा नेहमीचा अनुभव होतो.


4. **शहराच्या पर्यावरणावर ताण**:

   कबुतरांची कृत्रिमपणे वाढती संख्या *नैसर्गिक अन्नसाखळी बिघडवते*. इतर पक्ष्यांना बाजूला सारून कबुतरांचे वर्चस्व निर्माण होते.


*कबुतरप्रेम : अंधश्रद्धा कि धर्मभावना?*


* जैन धर्मामध्ये सर्व जीवांचे रक्षण करण्याची शिकवण आहे, पण *अतिरेक* हा कुठल्याही चांगल्या संकल्पनेचा बिघाड करू शकतो.

* फक्त पुण्य मिळवायचं म्हणून शेकडो कबुतरांना दाणा घालणं, त्यांचं कृत्रिम संगोपन करणं — ही *निसर्गनियमांची पायमल्ली* ठरते.


*जैन समाजाची जबाबदारी*


* जैन समाज भारतातील सर्वांत साक्षर, आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या प्रगत समुदायांपैकी एक आहे.

* त्यांनी आरोग्याची आणि पर्यावरणाची हानी करणाऱ्या *या कृतींकडे डोळसपणे बघण्याची गरज* आहे.

* कबुतरांना दाणा घालण्याऐवजी, *नैसर्गिक जैवविविधतेला पोषक उपक्रम* हाती घेणे अधिक श्रेयस्कर ठरेल.

* *पिंजरापोळ ची जागा कबुतर अभयारण्याने नाही, तर सर्व पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवास वृद्धिंगत करणाऱ्या उपक्रमांनी घ्यावी.*


कबुतरप्रेमाची भावना कितीही चांगली असली तरी, त्याच्या वाईट परिणामांचा विचार प्रथम केला पाहिजे. 


*अहिंसेचा अतिरेकही गंभीर ठरू शकतो — जर तो अंधश्रद्धेच्या, आणि अंधश्रद्धाळू पुण्याच्या नावे चालला असेल तर.*


🌱 *समाजहित आणि पर्यावरणरक्षण यांच्यात समतोल राखणं हेच खरे जैन तत्वज्ञान आहे - हे विसरता कामा नये!*


-- दयानंद नेने

    8/8/25

Comments