आज GR जळणाऱ्या सर्वांना उद्देशून ही पोस्ट

 आज GR जळणाऱ्या सर्वांना उद्देशून ही पोस्ट

अरे लोकहो,

• कसले तुम्ही जनतेचे नेते?

• कसले तुम्ही जनतेचे हितचिंतक?

• कसले तुमच्यासारखे फडतूस लोकं लहान मुलांचे भविष्य घडवणार?

• स्वतः खासदार, आमदार आहात आणि सरकारी GR जाळता? Govt is a continuous process - हे तुम्हाला माहीत नाही?


• बरं, हा GR तुम्ही स्वीकारलेल्या समितीच्या अहवाला वरच होता ना? 

• तुमचं म्हणणं की आम्ही समितीचा अहवाल फक्त स्वीकारला होता पण त्यावर GR काढला नव्हता हे म्हणजे भूतपूर्व अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लीन्टन ने आपली सफाई देताना जे सांगितलं की मी मोनिका लेविंसकी बरोबर इतर सर्व केलं पण सेक्स च्या परिभाषेत बसणारी शेवटची गोष्ट केली नाही - अशा पद्धतीचे तुमची सफाई आहे.


तुम्ही तो GR वाचला तरी का?


त्यात शुद्ध मराठीत लिहिले आहे. 

• मराठी अनिवार्य आहे. 

• हिंदी ही तिसरी भाषा आहे. 

• पुढे हे ही लिहिले आहे की तिसरा पर्याय म्हणून हिंदी भाषा कोणाला नको असल्यास आणि अन्य भारतीय भाषा तिसरा पर्याय म्हणून हवी असल्यास त्या विषयासाठी किमान २० विद्यार्थी असणे अनिवार्य आहे. • म्हणजेच हिंदीची कुठेही सक्ती नाहीये. 

• हिंदीची सक्ती नाहीये. सक्ती नाहीये. आजिबात नाहिये. हे एकदम क्लिअर आहे - इंग्रजी शब्द आदू बाळासाठी!


• लोकहो, आज तुम्ही स्वतः ला एक्स्पोज केलेत. किती स्वकेंद्रित आहात ते दाखवले.

• तुम्ही तुमच्याच सहकारी पक्षांना धोका दिलात.


• हिंदी सक्तीला विरोध आणि मराठी भाषेच्या अस्मितेसाठी पाच जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. 

• या मोर्चामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे दोघेही ठाकरे बंधू सहभागी होणार आहेत. जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे,


• असे असताना आज मध्येच स्वतः एकट्याचा GR जाळणे कार्यक्रम करण्याचे प्रयोजन काय? 

• स्वतः चे शायनिंग करण्यासाठी का विषयाचे सर्व क्रेडिट आधीच लमपास करण्यासाठी?


असो. तुमच्यात सगळ्यांना एकत्र करण्याची वृत्ती नाही. तुमच्यात ती कुवत ही नाही.

बापाच्या पैशावर आणि पुण्याईवर गेली 12 वर्षे निघाली. पण येणाऱ्या महापालिका निवडणुकीत तुमचं विसर्जन मुंबई ची जनता करेल.


दयानंद नेने 

29/6/2025

Comments