*शिक्षणाचा बोजवारा*

 *शिक्षणाचा बोजवारा*


• एक भाजपा कार्यकर्ता म्हणून लोकांपुढे आपण पक्षाची बाजू व्यवस्थित मांडत असतोच 

• प्रसंगी तोंडघशी पडतो तरी मुग गिळून गप्प बसतो 

• माझंच उदाहरण सांगतो - तीन महिन्यांपूर्वी जेव्हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा मध्ये सूचित केल्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार ने पाहिलेपासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकवण्याचा निर्णय जाहीर केला व तिसरी भाषा हिंदी अनिवार्य असेल असे घोषित केले तेव्हा राज्यात एकाच वादळ निर्माण झाले.

• त्यावेळेस राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा सखोल अभ्यास केला असल्याने - मी त्यावर 2021 मध्ये पुस्तकं लिहिले होते - मी लेखाद्वारे आणि व्हिडिओ द्वारे या हिंदी विषयाबाबत सविस्तर माहिती लोकांना दिली होती.

• त्यावर मी ट्रोल सुद्धा झालो होतो. तसेच अनेकांनी मला या विषयाची सखोल माहिती दिल्याबद्दल कौतुक ही केले. 

खेद एका गोष्टीचा होता की त्यामध्ये भाजपा चे कोणी नेते नव्हते.

• वर कहर म्हणजे माझ्या व्हिडिओ नंतर तिसऱ्याच दिवशी सरकार ने धोरण बदलले आणि हिंदीची अनिवार्यता रद्द केली.

• तेव्हा अक्षरशः आपण फसवले गेलो अशी भावना मनात आली होती.


• भाजपा आपली पार्टी आहे त्यामुळे तिच्या ध्येय धोरणांवर व्यक्त होणे हा माझा हक्क आहे असे मी मानतो.

• त्यात काही मत पार्टी लाईन विरोधात असली तर ती सकारात्मक टीका म्हणून पाहिली जावी ही अपेक्षा. पण असे होत नाही कारण आमच्या टिकेला योग्य प्रतिउत्तर देण्याची कुवत अनेकदा नसते - मग सुरु होते वैयक्तिक टीका आणि चारित्र्य हनन.. जे चुकीचे आहे.

असो.


• आता मी आपल्या शिक्षण क्षेत्राबद्दल माझे मत व्यक्त करीत आहे.


• माझ्या मते देशातील शिक्षणाचा आयचा घो झाला आहे .. 

• दहावीच्या मुलांना पण पाचवी ची गणित किंवा विज्ञान, इंग्रजी येत नाही.

 

• शिक्षणात ( आणि समाज सुधारणेत ) देशात एके काळी अव्वल असलेला महाराष्ट्र वेगाने पाठी पडत चालला आहे. 


• नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत पास होणाऱ्या मुलांत महाराष्ट्राची टक्केवारी देशात शेवटून दुसरी ( फक्त ४०.८ % ) आहे. त्याचवेळी हरियाणा सारखी मठ्ठ समजली जाणारी राज्ये आपल्या दीड पट टक्केवारीत पोहोचली. 


• मुलांच्या आणि तरुणांच्या डोक्यात धार्मिक वेडेपणा आणि खुळचट राष्ट्रवाद घुसवत बसले की असे होते.  त्यांचे मदरसे आणि मोहरम चे ताबूत तर त्याला उत्तर म्हणून आपले वेदशाळा, कुंभमेळे, यात्रा, गणपती , रामनवमी आणि पाडव्याच्या मिरवणुका. सर्व दिखाऊ आणि बेगडी. 


• जगात पुढे जायचं असेल तर शास्त्राची , विज्ञान शिक्षणाची किंमत समजली पाहिजे आणि त्याची कास धरली पाहिजे. 

• वीर सावरकर म्हणाले युरोपने बायबल बाजूला ठेवले आणि युरोपची प्रगती झाली. इवल्याशा ब्रिटन ने अख्ख्या जगावर राज्य फक्त विज्ञानाच्या जोरावर केलं आणि इंग्रजी जागतिक भाषा बनवून टाकली. 

• आज भारतात ( आणि बऱ्याचशा जगात )  इंग्रजी शिवाय पुढे जाता येणार नाही अशी परिस्थिती आहे. 


• लहान मुलांना तसे विषय ( विज्ञान, पर्यावरण ,नागरिक शास्त्र , वाहतूक , स्वच्छता,  समाजशास्त्र) शिकवले पाहिजेत ज्याने देशाचे उत्तम नागरिक लहान वयात  घडू शकतात. 


• त्याऐवजी लहान मुलांच्या बोडक्यावर तीन तीन भाषांचा भडिमार करून त्यांच्या बुद्धीची माती करण्याचं काम चालू आहे. 


• काही मुस्लिम राष्ट्र वगळता अख्खं जग ( त्यातही विशेषतः चीन ) शिक्षणात भारताच्या पन्नास वर्ष पुढे गेल आहे आणि इथे भारतीय देशात ( वास्तविक भारत हा मनाने ते संघराज्यच आहे.) जबरदस्तीने भाषा डोक्यात कोंबल्या जात आहेत. 


• चौथी पर्यंत मातृभाषा ( भाषावार प्रांत रचने मुळे त्या त्या राज्याची राज्यभाष ) आणि इंग्रजी एवढ पुरेस आहे. पुढे हायस्कूल मध्ये विद्यार्थी त्याला आवडेल तर अजून एखादी भाषा ( जी त्याला पटेल, आवडेल, पुढे रोजगार देऊ शकेल ती ) शिकायला हरकत नाही. त्याच स्वातंत्र्य त्याला हवं. जी तो बाहेरून ही शिकू शकतो. अथवा सरकार मदत करू शकते. सध्या ऑनलाइन मुळे फारच सहज. 


• या एका बाबतीत नेहरू आणि मोदी सारखे आहेत . नेहरु ही राष्ट्रभाषेच्या नावाखाली  हिंदीची जबरदस्ती करून संघराज्याची गळचेपी करत होते आणि मोदी सुद्धा तसेच. 

• नेहरूंना दाक्षिणात्य द्रविड लोकांनी धडा शिकवला आणि पुढे इंदिरा गांधींनी त्यातून धडा घेतला. आताही द्रविड आपली भाषा, संस्कृती ठाम धरून आहेत. मग ते भाजपचे असोत अथवा इतर पक्षांचे. 


• महाराष्ट्र मात्र तेव्हा ही स का पाटील आणि बिन कण्याच्या काँग्रेसी नेत्यांमुळे हिंदीची जबरदस्ती सहन करत राहिला आणि आता ही फडणवीस, शिंदे यांच्या सारख्या नेत्यांमुळे करतोय ..


थोडक्यात अख्खं जग ( बरेचसे मुस्लिम देश सुद्धा ) भविष्या कडे वाटचाल करत असताना भारत आणि त्यातही महाराष्ट्र इतिहासाकडे वाटचाल करत आहे.


एक व्यथित भाजपेयी 🙏🙏

Comments