ऋणम कृत्वा ध्रुतम पिबेत उर्फ राजकारण नव्हे गजकरण

 *ऋणम कृत्वा ध्रुतम पिबेत उर्फ राजकारण नव्हे गजकरण*



• एकीकडे आम्ही महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवू अशी गर्जना करणे आणि त्याच वेळेस लाडकी बहीण योजना राबवणे , रेशनवर फुकट अन्नधान्य वाटप करणे आणि 300 युनिट वीज फुकट देऊ अश्या घोषणा करणे... 


हा सैद्धांतिक व्यभिचार आहे. 


• अर्थशास्त्राचा पहिला नियम आहे एकाच गोष्टीसाठी ज्यावेळी तुम्ही दोन वेगवेगळ्या किमती निर्धारित करता त्यावेळी तुम्ही भ्रष्टाचाराचा मार्ग प्रशस्त करत असता... 


• लाडकी बहीण योजनेचेच उदाहरणं घ्या. महाराष्ट्र राज्यावर कर्जाचा डोंगर असताना ही पैसे वाटप योजना आणली. 


• सरकारी कर्मचारी असणार्‍या बायका , ज्यांच्या घरातील 100 टन उस कारखान्याला जातो आहे अश्या बायका, ज्या सुखवस्तू घरातल्या, घरी गाडी, AC, फ्रिज, टीव्ही आहेत अशा बायका सुद्धा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म्स भरत  होत्या. 


• तत्कालीन आणि आजचे सुद्धा अर्थमंत्री असणारे अजित पवार जाहीरपणाने असे करू नका सांगत होते. 


• तरी अर्ज दाखल झाले , सरकारला निवडणूक जिंकण्याची घाई झाली असल्याने तपासणी न करता निधी वाटप केले 


• आणि आता तपासणी करून संख्या कमी केली जाते आहे. 

• अपेक्षेप्रमाणे तिजोरीत खडखडात आहे. कर्ज काढून उत्सव साजरे करण्याचा प्रकार. 🤦‍♂️


• याचा अर्थ महाराष्ट्राचे सामाजिक चारित्र्य आणि नेत्यांचे चारित्र्य हे समान पातळीवर आले आहे. 


• ऋणम कृत्वा घृतम पिबेत वृत्तीने सरकार काम करत आहे. 


• आज एकही योजना 2-5-10-20 कोटींची घोषित होतच नाही.. सगळ्या योजना 500-1000 कोटींच्या वरच्याच असतात. सगळे जण निव्वळ हवेत आहेत. 


• जमिनीवर काय करता येईल याचा कोणीही विचार करत नाही. 


• आज लोकलने प्रवास करणे म्हणजे जिवावर खेळणे झाले आहे!


• मग उपाय काय तर जरा थांबा सगळ्या लोकल एसी करून टाकतो , सगळ्या लोकलना दरवाजे लावतो... 


• पण असे म्हणत नाहीत की कोरोंना काळात सगळीकडे हायब्रिड वर्किंग सुरू झाली होती तिचा वापर करून शक्य तितक्या लोकांना घरून काम करता येईल - Work from Home - अशी सुविधा विचारात घेतो.. कंपन्या आणि सरकारी खात्यांशी चर्चा करतो.. यामुळे आज तातडीने 10 ते 15 % गर्दी नियंत्रणात येऊ शकते. पण या दृष्टीने विचार सुद्धा करावा वाटत नाही हे किती खेदजनक आहे. 


बिलकुल नाही...


• मोठी स्वप्ने विकून लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे सुरू आहेत... 


सगळी शहर सारखीच - मुंबई लोकल प्रवास, मुंबई बेस्ट ने प्रवास, पुणे - हिंजवडी, पिंपरी चिंचवड -  हिंजवडी , रांजणगाव ते पुणे... कुठचाही प्रवास म्हणजे नरक यातना अशीच अवस्था आहे.. 


• स्वप्न काय दाखवली जात आहेत ??? 


तीन मजली उड्डाणपूल बनवणार - मोठे बोगदे बनवणार - सर्वीकडे मेट्रो धावणार..

सगळे उद्या परवा घडणार..


• परंतु "आज" शहरातील रस्त्यावरील सगळी अतिक्रमणे काढणे , रस्ता शक्य तितका रुंद करणे, खड्डेमुक्त करणे , गर्दीच्या वेळेत मोठ्या ट्रक्स ना परवानगी नाकारणे, प्रत्येक चौकात वाहातूक पोलिस दिवसभर कार्यरत ठेवणे... 


यापैकी कशाचा विचार सुद्धा होत नाही... 


• आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था कोसळण्याच्या पातळीवर आल्या आहेत आणि सरकार अक्षरशः स्वप्ने विकून लोकांना चुत्या बनवत आहे.  

मग ते कोणत्याही पक्षाचे सरकार असो. सगळे कोळसेच.


• यांच्यात आणि मुल्ला मौलवी मध्ये फरक नाही.. पंक्चर काढणार्‍या अब्दुलला तो सुद्धा 72 हुरचे आकर्षण दाखवून काहीही करायला प्रेरित करतो.. 


• इथे पण असाच स्वप्ने विकणे उद्योग सुरू आहे. उद्याच्या उज्वल भविष्यासाठी आज थोडा त्रास सहन करा - गेली 70 वर्षे जनता त्रासच सहन करत आहे.


• आजच्या समस्या सोडवण्यासाठी एक सोलुशन आणायचे. पण ते अमलात आणता आणता समस्या आणखीन जटील झालेली असते. ट्रॅफिक चे उदाहरणं घ्या - मेट्रो चे उदाहरण घ्या - फ्लाय ओव्हर बांधायचे उदाहरण घ्या - अतिक्रमण हटावण्याचे घ्या.. सगळीकडे बोजवारा.


• 1995 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी SRA योजना आणली. 1995 पर्यंत अस्तित्वात असलेल्या सर्व झोपडपट्टी वासियांना मोफत घरे देऊन मुंबई  झोपडपट्टी मुक्त करू असे ठरले.


• पण योजना राजकारणात रखडली. झोपडपट्टी हटलीच नाही मात्र मोफत घरे देण्याची लिमिट 1995 पासून आज 2020 वर आली आहे 😡


• मुंबई मेट्रो 1998 पासून रखडत चालली होती. त्याला गती देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले पण मध्ये 2.5 वर्षे त्यात उद्धव ठाकरे नावाची माशी शिंकली होती.

आता पुन्हा काम जोरात सुरु आहे पण पूर्वीचा जोम दिसत नाही.


• 1998 साली नितीन गडकरी यांनी केवळ दीड वर्षात मुंबईत 55 फ्लाय ओव्हर बांधून प्रगतीचा नवा उष:काल होणार असे भासवले होते पण पुढे काळरात्र च आली. 


• राजकारण नव्हे गजकरण आज सर्व राजकीय पक्षांमध्ये भिनले आहे.

• भाजपा कडून खूप आशा होत्या. पण बुडत्याचा पाय खोलात अशी अवस्था होत चालली आहे.

• 1989 साली प्रमोद महाजन यांनी एका विशिष्ट हेतूने शिवसेने सोबत युती केली होती.

• 2014 मध्ये भाजपा ने स्वबळावर 123 जागा जिंकल्या तेव्हा प्रमोद महाजन यांचा हेतू सफल झाला -होणार असे वाटले होते.

• पण 2019 मध्ये महाराष्ट्रात आपल्या शीर्ष नेतृत्वाने का कच खाल्ली हे अनाकलनीय आहे.

• आणि त्यानंतर तर बुडत्याचा पाय खोलातच चाललाय. 2014 मध्ये जे आपण स्वतःच्या हिम्मतीवर धावायला सुरु केले होते - आज दुर्दैवाने चालायला सुद्धा आपल्याला दोन कुबड्या लागतं आहेत.


• यात चुतिया बनतोय, भरडला जातोय बिचारा कार्यकर्ता. त्याला सर्व नेते गृहीत धरतात - त्याची फरफट करतात.


• भाजपा मधील सहकार्यांना माझे फटकळ लिहिणे आवडणार नाही पण कोणीतरी राजाला वेळीच सांगितलं पाहिजे की - महाराज, आपण नागडे आहात!


- दयानंद नेने

Comments