पॉवरफुल ट्रान्सफॉर्मेशन - अफगाणिस्तान

 *पॉवरफुल ट्रान्सफॉर्मेशन*-




डिसेंबर १९९९मध्ये एअर इंडियाचं आयसी- ८१४ हे विमान अतिरेक्यांनी हायजॅक करून दिल्ली अमृतसर लाहोर करत कंदहार विमानतळावर उतरवलं होतं. त्यावेळी कंदहार विमानतळ तालिबान्यांच्या ताब्यात होता. भारतीय सैन्याने काही कारवाई करू नये यास्तव तालिबान्यांनी विमानतळावर आयसी- ८१४ ला घेराव घालत प्रवाश्यांच्या जीवाच्या बदल्यात मौलाना मसूद अझरसकट इतर अतिरेक्यांची सुटका करून घेतली होती.

अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यावर काहीच दिवसांत तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानावर पुन्हा एकदा ताबा मिळवला आहे. काल परवा काबूलचा कब्जा तालिबानने घेतल्यावर सर्वच देशांनी आपापल्या नागरिकांची सुटका करत मायदेशी नेण्यासाठी विमानांची सोय केली. काल सकाळी भारताचं एआय २४३ हे विमान भारतीय आणि काही अफगाणी नागरिकांना दिल्लीत आणण्यासाठी काबूलच्या हवाईहद्दीत घिरट्या घालत होतं. मात्र एमिरेट्स ह्या जातभाईंच्या विमान कंपनीला प्राधान्य न देता तिथल्या एटीसीने एअर इंडियाला विमानतळावर उतरू दिलं. त्यानंतर एआय २३४ साग्रसंगीत इंधन वगैरे भरत १२९ नागरिकांना दिल्लीत घेऊन आलं. मागच्या आठवड्यात हाच पराक्रम एअर इंडियाने मझार ए शरीफ शहराच्या विमानतळावरून केला होता.

१९९९ साली तालिबान्यांनी दादागिरी करत आयसी ८१४ ला गराडा घालणे इथपासून काल भारत सरकारने दादागिरी करत आपल्या नागरिकांना सोडवून आणणे हे पॉवर ट्रान्सफॉर्मेशन एक भारतीय म्हणून माझ्यासाठी प्रचंड सुखद आहे. हीच ताकद अभिनंदन वर्धमानच्या वेळी दिसली होती आणि आखातातून भारतीय व इतर देशांच्या नागरिकांची सुटका करतानाही दिसली होती.

बायडेन सरकारने अफगाणिस्तानातून सैन्य परत बोलवायची घोषणा करायच्या आधीच भारत सरकारने 'व्हॉट इफ' सिनारीओवर काम करत रणनीती बनवली असेलच. अफगाणिस्तानात काहीही होवो, भारताचा इंटरेस्ट राखला जाईल, हे धोरण राबवण्यासाठी भारत सरकारचे प्रतिनिधी, परराष्ट्र सचिव आणि  महत्वाचं म्हणजे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर गेले काही महिने पायाला भिंगरी लावल्यासारखे जगभर फिरताहेत. त्यामुळे भारताचं हित राखलं जाईल, ह्याबद्दलची शाश्वती हा अस्थायी आत्मविश्वास नसून ती सत्यस्थिती असेल ह्यात शंका नाही आणि एअर इंडियाच्या विमानाला काबुलमध्ये उतरण्याची परवानगी मिळणं हे त्या पॉवर ट्रान्सफॉर्मेशनचं द्योतक आहे.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034