स्टॅन स्वामी चे सत्य
काल स्टॅन स्वामी(?) चं निधन झालं, ते पण आजारपणात आणि हॉस्पिटलमध्ये आणि इकडे आपल्याकडे अनेकांनी गळे काढायला सुरुवात केली.
As if कोणी महात्माच मारला गेलाय.
स्वप्ना कुलकर्णी यांचा छान लेख
#UrbanNaxals #BreakingIndia
आपल्यापैकी किती जणांनी फिलीपीनी ख्रिश्चन धर्म प्रसारक, Sam Lourdu Samy यांचे नाव ऐकले आहे किंवा माहिती आहे?
हा 82 वर्षांचा "म्हातारा"(हा शब्द मी जाणूनबूजून वापरला आहे) रांची, झारखंड येथे अनेकानेक वर्षं रहात आहे. इतक्या वर्षांनंतर या म्हाताऱ्याचं नाव Samy मधून Swamy कधी झालं हेच लोकांना समजलं नाही!!
Sam Lourdu Samy, या फिलीपीनी ख्रिश्चन धर्मप्रसारक, याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. या महत्वाच्या आरोपा बरोबरच देशद्रोह, दहशतवाद पसरवणे, माओवादी आणि नक्षली चळवळीत सक्रिय सहभाग असणे असे आरोप आहेत.
आता प्रश्न हा पडतोय की कोणीतरी विदेशी धर्मप्रसारक आपल्या देशातील शासनाने घालुन दिलेल्या चौकटीत लुडबुड का करतोय? या धर्मप्रसारकाला जनतेतून निवडून आलेल्या पंतप्रधानांना का मारायचं आहे? अशा राजद्रोहात्मक गोष्टींना उद्युक्त करणारी कुठली शक्ती त्याच्या मागे आहे?
पण अर्थातच कोण हा प्रश्न विचारण्याआधी का, कशासाठी हे प्रश्न मनात येणं तितकंच संयुक्तिक आहे!! का म्हणून एखाद्या विदेशी व्यक्तीला पंतप्रधान मोदी यांची हत्या करावी असं वाटायला लागलं??
झारखंडमधील भाजप सरकार आणि केंद्र सरकारने मध्यंतरी Investors' Meet घेतली होती. या वेळेस गुंतवणूकदारांनी झारखंडमध्ये जवळपास तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. 209 करार आत्तापर्यंत झाले आहेत आणि त्यामुळे हजारो लोकांना रोजगार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
जितके जास्त रोजगार आणि रोजगाराच्या संधी तितकी गरीबी आणि उपासमारी कमी होण्यास मदत होणार...हेच प्रयत्न देशभरातून केले(काही राज्यांत चालू झाले आहेत) तर आपला देश नक्कीच विकसित होऊ शकतो. असे झाले तर आपल्याला कोणावरही अवलंबून रहावे लागणार नाही. आपले परावलंबित्व कमी झाले तर तोटा कोणाला होईल?
1)परदेशी धर्मप्रसारक मंडळं
2)कम्युनिस्ट
तसं पाहिला गेलं तर, ही परदेशी धर्मप्रसारक मंडळं आणि कम्युनिस्ट दोघंही आपल्या देशात आणि बाहेर ही वेगवेगळ्या स्वरूपात दिसतात. पर्यावरणवादी, मानवाधिकार आयोग, स्त्री मुक्ती संघटना, उदारमतवादी अर्थातच लिबरल, प्राणीमित्र संघटना (पेटा), इत्यादी... या असल्या संघटना अनेकानेक वर्षं आपल्या लोकांना फसवत आहेत आणि फसवत ही राहतील!!!
आपल्या देशातील गरीब आदिवासींचा आणि त्यांच्या गरीबीचा तसेच अज्ञानाचा फायदा या संघटना आणि त्यांचे प्रमुख तसेच वरीष्ठ अधिकारी घेत आहेत. त्यात या आदिवासींचे धर्मांतरण करणे फारच सोपे जात होते.
1970 मध्ये Samy त्याकाळी बिहारमध्ये स्थित असलेल्या चैबासा या आदिवासी बहुल भागात मिशनरी म्हणून काम करत होता. त्याच्या लक्षात आले की आदिवासी जरी गरीब असले तरी त्यांचे धर्मांतरण करणे सोपे नाही!! मग त्याने एक शक्कल लढवली!! त्याने या आदिवासींना भ्रष्ट राज्य सरकार विरोधात भडकविण्यास सुरवात केली. या भडकविण्यामुळे, आदिवासींच्या नकळत त्याने एका निराळ्याच संघटनेला जन्म दिला, नक्षली!!
ख्रिश्चन धर्मप्रसारकाने एकदा का सरकार विरोधात व्यवस्थित भडकवले की या आदिवासींनी सरकारी व्यवस्थे विरोधात कारवाया केल्या आणि या कारवाया करताना पोलिसांनी अटक केली, पकडले, नाव कायमचे पोलिस स्टेशनला लागले तर या आदिवासींकडे या मिशनरी संघटनेकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसायचा!! संघटनेकडून पैसा, वकील इत्यादीची हमी मिळायची!! हीच वेळ निवडून आदिवासींना धर्मांतरीत केले जायचे. कोणे एके काळचे गरीब पण धर्माला जागणारे आदिवासी असे धर्मांतरीत होऊ लागले!! नक्षली बनू लागले!!
इंदिरा जयसिंग, सुधा भारद्वाज किंवा प्रशांत भूषण यांच्या सारख्या नामांकित वकीलांची फौज या आदिवासींसाठी लढायला, त्यांना सोडवायला कायम तयार असते. मग आता प्रश्न पडतो की लाखो रुपये फी घेणारे हे वकील या आदिवासींसाठी फुकट लढत असतील का? तर याचं उत्तर आहे "नाही." अनेकानेक परदेशी स्वयंसेवी संस्था(NGO) हे पैसे खर्च करतात आणि या आदिवासींना वाचवतात, सोडवतात!! आता मोदी सरकारने काय केलं तर या परदेशी पैशांवर चालणाऱ्या NGO वर बंदी आणली!! आता साधारण चार वर्षांनंतर या NGO ना पैशांअभावी झळ सोसावी लागत आहे.
या परदेशी पैशांवर पोसलेले NGO बंद म्हणजे धर्मांतरणासाठी लागणारा पैसा, वेगवेगळ्या सरकारी योजनांना विरोध करण्यासाठी लागणारा निधी आटला!! कुठलेही सरकारी विकासाचे काम काढले की मानवतावादी, पर्यावरणवादी काम थांबविण्यासाठी हजर, वर्षानुवर्षे खटले न्यायालयात प्रलंबित, सरकारी पैसा अक्षरशः वाया जायचा!! आणि NGO ना काही फरक पडायचा नाही कारण ही कामं थांबविण्यासाठीच त्यांना परदेशातून पैशांचं पाठबळ मिळायचं!!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परदेशी निधीवर चाललेल्या NGO वर बंदी तरी आणली किंवा त्यांना मिळणाऱ्या पैशांचा हिशोब द्यायला सांगितले. आता शेपटावरच पाय पडला, निधी येणं थंड झालं.... मग मोदींनी जायलाच हवं आणि ते पण कायमचं, नुसतं राजकारणातून हद्दपार नाही बरं का!!
1996 मध्ये या परदेशी ख्रिश्चन धर्मप्रसारक Samy ने Jharkhand Organisation Against Radiation (JOAR ) ची स्थापना केली. कशाला? तर केंद्र सरकार च्या अखत्यारीत येणाऱ्या Uranium Corporation Of India Ltd. (UCIL), जडुगुडा येथील युरेनियम समृद्ध खाणींमधून युरेनियम न काढण्यासाठी!! ही आपल्या देशातील त्यावेळची एकमेव युरेनियम समृद्ध खाण पूर्व बिहारमध्ये येते. युरेनियम का नाही खणायचं/खणून काढायचं तर ते पर्यावरणाचे नुकसान करते, पर्यावरणाला घातक आहे म्हणून!! याचा सोप्पा पण तेव्हा डोक्यात न शिरलेला अर्थ म्हणजे तुम्ही (भारत देश) युरेनियमसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं आणि त्यांच्याकडे युरेनियमसाठी भीक मागावी!! जाता-जाता, परदेशी पैशांवर पोसलेल्या अजून एका NGO/Church च्या देशविघातक उद्योगामुळे चेन्नईचा सुप्रसिद्ध तांब्याचा कारखाना(Sterlite Industries) कसा बंद पाडण्यात आला आणि त्यासाठी कुठले डावपेच खेळले गेले, हे विसरून चालणार नाही. (हा पण एका वेगळ्या पोस्टचा विषय होऊ शकतो)
आदिवासींना त्यांच्यावर झालेल्या पोलिस केसमधून सोडवण्यासाठी आणि कर्जफेड करण्यासाठी या परदेशी ख्रिश्चन धर्मप्रसारकावर अवलंबून रहावं लागायचं. त्यांना कळत नव्हतं की या पोलिस केस, कारवाई मागे ही हाच ख्रिश्चन धर्मप्रसारक आहे आणि आपल्यावर होणारी ही एक जबरदस्तीच आहे!! अशाचप्रकारे आपल्या देशाकडे चांगल्या प्रतीचे युरेनियम आहे पण त्यापेक्षाही कनिष्ठ दर्जाच्या परदेशीय युरेनियमसाठी आपण जास्त पैसा मोजत होतो!! कारण का तर युरेनियम काढायला आणलेली बंदी!!
नक्षली बिरेन घुरिया ला अटक झाली तेव्हा या ख्रिश्चन धर्मप्रसारकाचा वरील प्रकरणातील हात सगळ्यांसमोर आला. बिरेन घुरियाला पुराव्यांअभावी सोडून दिले गेले पण खरं कारण परदेशी NGO आणि धर्मप्रसारक मंडळींनी ओतलेला पैसा हेच खरे कारण होते!! लक्षात घ्या की बिरेन घुरिया तर्फे Samy ने वकीलांच्या फीचे पैसे दिले होते.
अजून खोलात गेल्यावर समजतं की झारखंडच्या खुंटी, सिमडेगा, सेराईकेला, घुमला वगैरे जिल्ह्यांत "पाथालगढी चळवळ" सुरू आहे त्यात या ख्रिश्चन मिशनरीचा आणि त्याचा NGO, Bagaicha चा हात आहे.
"पाथालगढी चळवळ" हा एका मोठ्या पोस्टचा विषय आहे पण वाचकांच्या सोयीसाठी थोडक्यात माहिती देत आहे. वर उल्लेख केलेल्या जिल्ह्यांतील आदिवासींनी आपली ग्रामपंचायत (ग्रामसभा) हीच सार्वभौमत्व असणार आणि कुठल्याही भारतीय सरकारची (केंद्र आणि राज्य) आपल्यावर सत्ता नसणार!! परदेशी लोकांनी, त्यांच्या पैशांच्या जोरावर आपल्याच आदिवासींना हाताशी धरून सरकरविरोधात रचलेले हे केवढे मोठे षडयंत्र!!
हाच NGO याकूब मेमनला फाशी देण्यात आले तेव्हा निषेध नोंदवण्यात पुढे होता, हे अजून एक वेगळंच!!
झारखंडमध्ये ज्या-ज्या क्षेत्रात ख्रिश्चन मिशनरी आहेत तिथे No Go Zones तयार झाले आहेत. कोणीही बाहेरील व्यक्ती, सरकारी यंत्रणा किंवा पोलिस येथे शिरकाव करू शकत नाहीत. चुकून जर सरकारी अधिकारी-कर्मचारी दिसलेच तर ते लगोलग मारले जातात!!
आधीच्या एका पोस्ट मध्ये आपण वाचलंय की पहाड सिंग कसा व्यवस्थित brainwashed झाला होता, तसेच हे आदिवासी ही brainwashed होऊन सरकार विरोधात जातात आणि सरळ हत्या करतात!!
त्यांच्या मुलुखात कुठल्याही प्रकारचे पर्यावरणवादी, मानवाधिकारवादी तडमडत नाहीत कारण हे प्रश्न निर्माण करणारेच तिथे सत्तेत असतात. बाहेर ज्या गोष्टींवरून हेच लोक रणकंदन माजवतात, त्या Freedom of Speech, Freedom of Expression वगैरे बाबी यांच्या गावी ही नसतात... परत कारण तेच, सत्ता यांच्याच हाती!! आणि ही सत्तेची आणि पैशांची भूक कधीच न शमणारी!!
या परदेशी मंडळींची सगळ्यात मोठी योजना म्हणजे आपल्या भारतात यादवी निर्माण करायची, अनागोंदीला खतपाणी घालायचं हीच आहे. अर्थातच या योजनेसाठी लागणारा बक्कळ पैसा ही त्यांच्या गाठीशी आहे. इराक, मध्य-पूर्वेतील देश(मिडल इस्ट) आणि काही आफ्रिकी देश या देशांतील यादवीचे मूळ ही या परदेशी पैशांमध्येच आहे. 2025 पर्यंत आपल्या देशात सशस्त्र क्रांती/लढा करण्याची आणि संपूर्ण भारतालाच "पाथालगढी" बनवण्याचे स्वप्न हा माणूस आणि यांच्या सारखे अनेक लोक पहात आहेत!!
आता लक्षात घ्या की Samy चा Swamy का करण्यात आला?? एक फिलीपीनी, ख्रिश्चन धर्मप्रसारक/मिशनरी आपला देश, आपले रीतिरिवाज, जगणं नष्ट करण्यामागे लागला आहे, त्याला बाहेरून पैशांची मदत तर आहेच पण आतून आपल्याच पोखरलेल्या भ्रष्ट यंत्रणेची तसेच माणसांची!!
Comments
Post a Comment