राफेल सौदा आणि देफायसिस सोल्युशन ना दिलेली दलाली
युपीएच्या काळात डिफेन्स-डिल्स मध्ये एजंट नाही, तर मिडल-मन/ ब्रोकर होते. 'दोन्ही एकच असतंय' म्हणणारी हुशार लोकं जगात कमी नाहीत, म्हणून थोडक्यात फरक सांगतो : डिफेन्स-डिल्स मध्ये ब्रोकर/ मिडल-मन हा व्यवहाराचा भाग असतो. तो रेट ठरवू शकतो. व्यवहार कसा 'बसवायचा' हे तोच ठरवतो. 'व्यवहार पूर्ण झाल्यावर' ज्याच्या साठी ब्रोकरगिरी करत असतो, त्या पार्टीला अपेक्षित रक्कम मिळवून दिली की उरलेली रक्कम हा त्याचा 'कट' मिळतो. अशा डिल्समध्ये ब्रोकरही व्यवहारातील एक 'पार्टी' असतो. एजन्ट कधीच व्यवहाराचा भाग नसतो. त्याला रेट ठरवायचा अधिकार नसतो. तो पेमेंटच्या टर्म्स ठरवत नाही. माल विकणाऱ्याच्या वतीने तो फक्त त्यांच्या प्रोडक्टचे मार्केटिंग करत असतो. व्यवहार झाला, तर त्याला आधीच ठरलेले कमिशन/टक्केवारी विक्री करणारा देतो.
★ मोदी सरकार आल्यावर डिफेन्स-डिल्स मधून दलाल आणि दलाली दोन्हीवर बंदी टाकण्यात आली. मोदी सरकार आल्यावर असे सगळे डिफेन्स-डिल थेट सरकार-टू-सरकार होऊ लागले. आपले प्रॉडक्ट्स विकण्यासाठी या कंपन्यांच्या एजन्ट्सना (agents) मार्केटिंग करायची परवानगी मात्र होती, पण व्यवहारांमध्ये रेट ठरवून/वाढवून भरमसाठ कमाई करायची पद्धत बंद करण्यात आली. लिंक - https://www.ndtv.com/india-news/new-guidelines-for-agents-who-broker-defence-deals-1419028
★ 31 जानेवारी 2012 : राफेल Medium Multi-Role Combat Aircraft (MMRCA) ची डिल फायनल झाली. भारताच्या रक्षा मंत्रालयाने अशी घोषणा केली. दुर्दैवाने, तेंव्हा केंद्रात युपीए सरकार होते आणि 'सोनिया गांधी यांचे खास' ए.के.अँथनी भारताचे रक्षामंत्री होते. यात राफेल आणि युरोफायटर या दोन फायटर्स मध्ये स्पर्धा होती. 2012 मध्ये ही डिल दोन सरकारांमध्ये झाली नव्हती, हा व्यवहार भारत सरकार आणि राफेल बनवणाऱ्या Dassault Aviation मध्ये होता. यात दलाल अर्थात middle-men/broker होते. लिंक - https://www.ndtv.com/india-news/dassault-rafale-wins-usd-10-4-billion-indian-air-force-jet-fighter-deal-sources-571309
★ 6 फेब्रुवारी 2014 : ऑक्सफर्ड की केम्ब्रिज की लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स वाले एक वर्ल्ड-फेमस इकॉनॉमिस्ट देशाचे पंतप्रधान असूनही त्यांच्या दळभद्री रक्षामंत्री अँथनी यांनी 'पैसे नाहीत' म्हणून ही विमानं विकत घेणार नाही असं म्हणत हात वर केले! या ब्रोकर/दलालाची सगळी मेहनत वाया गेली. लिंक -
https://www.ndtv.com/india-news/india-delays-rafale-fighter-jet-deal-after-exhausting-capital-budget-549972
★ युपीएच्या काळात झालेल्या 3600 कोटी ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर डिल मधील घोटाळ्यात पण एक ब्रोकर होता. या ब्रोकरला ईडीने 26 मार्च 2019 रोजी अटक केली होती. या ब्रोकरचे नाव होते सुशेन गुप्ता. सुशेन गुप्ता हा राजमातेचा जावईबापू रॉबर्ट याचा खास मित्र! याच्या कंपनीचे नाव आहे डेफसिस सोल्युशन्स (Defsys Solutions). लिंक - https://www.ndtv.com/india-news/alleged-middleman-in-vvip-chpper-case-sushen-mohan-gupta-remanded-to-judicial-custody-2019678
★ याच्या डायरीत/पेन ड्राईव्ह मध्ये कोणा एका RG ला 2004 ते 2016 याकाळात 50 कोटी दिल्याची नोंद सापडली आहे. रजत गुप्ता नावाच्या व्यक्तीला दिले असं सुशेन गुप्ता म्हणतोय, काही एन्ट्री पण मिळाल्या.. परंतु, RG कोण आहे याची ईडीला पण तीच शंका आहे जी तुम्हाला आणि मला आहे. लिंक - https://www.ndtv.com/india-news/trying-to-find-who-is-rg-in-vvip-chopper-case-probe-agency-tells-court-2017495
आता फ्रांसच्या वृत्तपत्रात आलेली माहिती -
★ आपल्याकडे ठाकरे सरकराची जशी ACB आहे, अगदी तशी तिकडे मॅक्रोन सरकारची संस्था Agence Francaise Anticorruption (AFA) आहे. या AFAनेच ही माहिती दिली आहे : फ्रांस-भारत राफेल डिलमध्ये एक मिलियन युरो दलाली दिली गेली. ती दलाली (याच) सुशेन गुप्ता याला दिली गेली! ही 'दलाली' राफेल विमानांची मॉडेल बनवण्यासाठी देण्यात येणाऱ्या रकमेच्या रुपात देण्यात आली, जी भारतीय वायुदलाच्या मुख्यालयाच्या बाहेर, काही एयर-फोर्स स्टेशनच्या बाहेर डिस्प्ले केली आहेत. ए के अँथनी यांनी 'पैसे नाहीत' म्हणून हात वर केल्यावर या सुशेन गुप्ताची मेहनत वाया गेली होती, त्याचा 'फुल नाही फुलाची पाखळी' म्हणून हा मोबदला होता. या मॉडेल्सचे पैसे राफेल विमानं बनवणाऱ्या कंपनीने दिले, याचा भारत आणि फ्रांस सरकारमधील व्यवहाराशी काहीही संबंध नाही. लिंक - https://www.ndtv.com/india-news/dassault-paid-1-million-euros-to-indian-middleman-in-rafale-deal-report-2406450
गम्मत अशी आहे की ही माहिती AFAने उकरून काढली, पण फ्रांसमध्ये या केसमध्ये कोणावरही एफआयआर, आरोपपत्र, खटला चालवायची आवश्यकता नाही असं त्यांनी म्हटलं आहे! मग, या उठाठेवी केल्या तरी का? सूत्रांनी दिलेली माहिती अशी आहे -
★ सुशेन गुप्ताचे कनेक्शन कुठे जात आहेत हे ईडीला चांगलंच माहीत होतं. जमाई राजा तर अडचणीत होताच.. पण हा जो कोणी RG आहे, त्याचे अक्रोडही कपाळात आले होते. पण या सुशेन गुप्ताला नेमका 'चुकीच्या वेळ' जामीन मिळाला. लिंक - https://www.ndtv.com/india-news/delhi-court-grants-bail-to-alleged-defence-dealer-sushen-mohan-gupta-in-agustawestland-vvip-chopper-2046532
फ्रांसची AFA तर काही ऍक्शन घेणार नाही, पण भारतात ईडी आता या सुशेनला परत उचलणार अशी माहिती येत आहे. मागच्यावेळी उचललं तेंव्हा सुशेन गुप्ता ने कमलनाथ चा भाचा रतुल पुरी याच्याकडे बोट दाखवलं होतं, यावेळी RG कोण आहे हे नक्की सांगेल असा ईडीला विश्वास आहे. रतुल पुरी याला उचलल्यावर कमलनाथ राजकारणातून VRS घेतल्या सारखा शांत झालाय, RG चं पुढे काय होतंय बघू..
https://www.ndtv.com/india-news/vvip-chopper-scam-probe-agency-summons-kamal-naths-nephew-ratul-puri-for-interrogation-2017517
मॉरल ऑफ दि स्टोरी : काँग्रेस आणि राहुल गांधी यांना मोदी यांनीच हे कोलीत दिलं, आणि या विषयावर त्यांच्याकडूनच गावभर ही बातमी पोचवली आहे. हे प्रकरण काँग्रेस पक्षाच्या आणि गांधी परिवाराच्या बेक्कार अंगलट येणार आहे. जाऊद्या, आपल्याला काय, आपण 'मोदी और मॅक्रोन मिले हुए है जी' म्हणायचं आणि जे चाललंय ते बघून आनंद घ्यायचा..
बाकी, सुप्रीम कोर्टाने याआधीच राफेल डिलमध्ये कुठल्याही प्रकारचा गैर-व्यवहार झाला नाही हे स्पष्ट केलेले आहेच. लिंक -
https://www.ndtv.com/india-news/no-probe-into-rafale-deal-supreme-court-dismisses-petition-says-no-reason-to-intervene-1962483
*अशामुळे काँग्रेस आणि इतर विरोधकांच्या खोट्या प्रचारामुळे बॅक फुटवर जायची काही गरज नाही. खरी परिस्थिती वर नमूद केली आहे*.
Comments
Post a Comment