मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याच्या हालचालींना वेग
*The demand to rename Mumbai Central Station to Nana Shankar Shett Station is coming true.*
*Our Alert Citizens Forum has been demanding this thing since 2017*
*Read Complete story in the link below:
मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याच्या हालचालींना वेग; जाणून घेऊया 'भारतीय रेल्वेचे जनक' आणि 'आधुनिक मुंबईचे शिल्पकार' नाना शंकरशेठ यांच्याविषयी...
http://vichakshan.com/vichakshan_ek_nai_soch/news_details_view/509
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून केली जात आहे. याबाबत राज्य सरकारने विधानसभेत प्रस्ताव देखील पारित केला आहे. दरम्यान नाव बदलण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला असून स्वतः केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी तसे सुतोवाच केले आहे. गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी खासदार अरविंद सावंत यांना नाव बदलण्याबाबत सर्व यंत्रणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यावर केंद्र सरकार कार्यवाही करत असल्याची माहिती दिली आहे.
म्हणून नाना शंकरशेठ यांना भारतीय रेल्वेचे जनक म्हटले जाते...
160 वर्षापूर्वी सामान्य माणसाकडे लांब पल्ल्याचा प्रवासासाठी आणि सामानाच्या वाहतुकीसाठी बैलगाडीचा पर्याय उपलब्ध होता. ही बाब ध्यानात घेऊन नानांनी स्वत: 1843 साली रेल्वेची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ग्रेट ईस्टर्न कंपनीची स्थापना केली. या कंपनीचे कार्यालय गिरगावातील नानांच्या वाडय़ात होते. दहा वर्षाच्या अथक प्रयत्नांमुळेच 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावरून केवळ देशातीलच नव्हे, तर आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली. उद्घघाटन सोहळय़ाला प्रमुख पाहुण्यांचा व प्रवाशाचा मान इंग्रजांनी नानांना दिला, तसेच फर्स्ट क्लासचा सुवर्ण पास देऊन त्यांचा सन्मानदेखील केला. तेव्हापासूनच नाना शंकरशेठ यांना “भारतीय रेल्वेचे जनक” म्हणून ओळखले जाऊ लागले. मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या (सीएसएमटी) प्रवेशद्वाराच्या भिंतीवरील नाना शंकरशेठ यांचा पुतळा आजही त्याची साक्ष देतो आहे.
राजकीय विश्लेषक व सामाजिक कार्यकर्ते दयानंद नेने यांनी आमच्याशी बोलताना सांगितले की,
"नाना शंकरशेठ हे आधुनिक मुंबईचे शिल्पकार व भारतीय रेल्वेचे जनक आहे. आताच्या पिढीला त्यांच्याविषयी इतकी माहिती नाही. पण त्यांनी दिलेले सामाजिक आणि आर्थिक योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी दिलेले आर्थिक पाठबळ मुंबई घडवण्यासाठी कामी आले. आमच्या अलर्ट सिटीझन फोरम संस्थेने तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंकडे स्थानकाला नानासाहेबांचे नाव देण्याचे मागणी केली होती. पण मंत्रीमंडळ विस्तारात त्यांचे खाते पियूष गोयल यांच्याकडे आले. गोयल यांची भेट घेऊन आम्ही हा विषय त्यांच्या कानावर घातला. अखेर स्थानकाच्या नामांतराला आता वेग आल्याने आनंद आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसला नानासाहेबांचे नाव दिल्याने त्यांची आठवण ताजी राहील व येणार्या पिढीलाही नानांच्या कार्याची माहिती मिळेल."
जाणून घेऊया कोण होते नाना शंकरशेठ...
- जगन्नाथ शंकर उर्फ नाना शंकरशेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी, 1803 साली ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या गावी झाला. लहानपणीच आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर घर आणि व्यापाराची जबाबदारी त्यांच्यावर आली. महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले नसतानाही नानांनी संस्कृत व इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले होते. इंग्रज काळात भारतीयांनी शिक्षण घ्यावं आणि मुख्य प्रवाहात यावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले. भारतीयांच्या कायदे शिक्षणासाठी त्यांनी इंग्रजांना खास वर्ग सुरू करायला लावले.
- मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेमागे नानांची दुरदृष्टी होती. 1866 सालापासून त्यांनी मुंबई विद्यापीठातर्फे मानाची जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत शिष्यवृत्ती सुरू केली, जी आजतागायत सुरू आहे. तत्कालीन राजकीय चळवळीचे केंद्र बनलेली ‘बॉम्बे असोसिएशन’ नानांनीच स्थापन केली. 'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी' या पश्चिम भारतातील पहिल्या शिक्षणसंस्थेच्या संस्थापकांपैकी नाना शंकरशेठ हे एक होते.
- ग्रँट रोड येथील चौकास ‘नाना शंकरशेट चौक’ असे नाव देण्यात आले. बालविवाह, सती प्रथेला त्यांनी कडाडून विरोध केला. सती प्रथेवर बंदी आणण्यासाठी 1823 साली ब्रिटीश पार्लमेंटकडे राजा राममोहन रॉय आणि नाना शंकरशेठ यांच्या सह्या असलेला अर्ज देण्यात आला होता. 1829 साली हा सती कायदा आणला गेला.
- एलफिन्स्टन कॉलेज, ग्रँट मेडिकल कॉलेज, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट अँड आर्किटेक्चर, डॉ. भाई दाजी लाड संग्रहालय, मुंबई विद्यापीठ, जे. जे. हॉस्पिटल, मुलींची शाळा, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, विहार तलाव, राणीची बाग आदींच्या उभारणीत त्यांचा पुढाकार होता.
- नाना शंकरशेठ 1962 साली तत्कालीन मुंबई प्रांताच्या गव्हर्नरचे सल्लागार म्हणून नियुक्त झाले. मुंबई महापालिकेची स्थापनादेखील त्यांचे योगदान असलेल्या बॉम्बे म्युनिसिपल अॅक्टच्या आधारेच झाली होती.
- मुंबईतील पहिले थिएटर व पहिला दवाखाना नानांनीच बांधला. मरीन ड्राइव्ह व बाणगंगा येथील स्मशानभूमीला त्यांनी जागा दिली. लोहमार्गाचा शुभारंभ नानांनी केल्यामुळे त्यांना ‘भारतीय रेल्वेचे जनक’ व ‘मुंबईचे आद्य शिल्पकार’ असेही संबोधले जाते. भारत सरकारने 1991 साली त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीटही काढले.
- आधुनिक मुंबईच्या विकासासाठी झटलेल्या या कर्मवीराची प्राणज्योत 31 जुलै, 1865 रोजी मालवली.
Comments
Post a Comment