भाजपा बद्दल माझ्या मनातला एक प्रश्न

 *माझ्या मनातला एक प्रश्न*



अर्णब गोस्वामीला मुंबई व रायगड पोलीसांनी सूड बुद्धीने अटक केल्यावर माझ्या मनात एक प्रश्न आला की देशातील सर्व बलाढ्य तपास यंत्रणा हाती असूनही भाजप नेते पराभूत मानसिकतेचे का आहेत?

सत्ता कशी *मख्खन मे छूरी* पध्दतीने राबवायची असते हे भाजपा नेत्यांनी काँग्रेस-

राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिकले पाहिजे।

आम्ही सूड बुद्धीने वागत नाही या गोष्टीचे काय लोणचं घालायचे आहे ?

बळी तो कान पिळी ही उक्ती भाजपा नेत्यांनी कायम लक्षात ठेवली पाहिजे.

भाजपा नेहमीच सत्तेत असताना विरोधी पक्ष्यापेक्षा भित्रे अशी नजरेस येते.

खंबीर निर्णय घेण्याची वेळ व क्षमता या वर हमखास प्रश्नचिन्ह उपस्थित होतात.

भाजपा सत्तेत असताना विरोधी लोकांची कामे पटापट केली जातात पण स्वपक्षातल्या कार्यकर्त्यांना डावलले जाते अशी नेहमीची तक्रार आहे.

भाजपा नेते हे स्वतः निर्माण केलेल्या चक्रव्यूहात अडकल्या सारखे वागत असतात।

सिंचन घोटाळ्यात,शिखर बँक घोटाळ्यात,अन्य सहकारी संस्थांच्या भ्रष्टाचारात काँग्रेस व राष्ट्रवादीसारखे पक्ष नेस्तनाबूत होतील अश्या सज्जड केसेस असताना भाजपा सरकार कारवाई का करू शकली नाही किंवा आता ही कारवाई का करू शकत नाही हा मोठा गहन प्रश्न पडला आहे ?

मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचार प्रकरणात तर शिवसेनेच्या लोकांना अडकवता येण्यासारखी अनेक प्रकरणे किरीट सोमय्या यांच्याकडे आहेत पण कारवाई च्या नावाखाली नेहमी कचखाऊ भूमिका भाजपाकडून घेतली जाते.

राज्यातील फडणवीस सरकारने भले ही भ्रष्टाचार केला नसेल व करू ही दिला नसेल पण ज्यांनी पूर्वी भ्रष्टाचार केलाय अश्यांना सजा देऊ शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

आता ही केंद्र सरकार सुशांतसिंग व दिशा साल्यान प्रकरणात हस्तक्षेप करून केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून राज्य सरकारला नामोहरम करू शकते पण का करत नाही ही गोष्ट अनाकलनीय आहे.

आपल्या मराठी पत्रकारात राजीव खांडेकर, गिरीश कुबेर, समर खडस, रश्मी पुराणिक, प्रशांत कदम, राजू परुळेकर,ज्ञानदा कदम,आशिष जाधव, तुळशीदास भोईटे सह अन्य बऱ्याच पत्रकारांची भूमिका पक्षपाती असते. 

किमान त्यांच्यावर तरी फडणवीस सरकारकडून कारवाई अपेक्षित होती.

पण कारवाई कसली, नरमाई झाली.

भाजपा नेते का एवढे ढेमळे राजकारण करतात ?

त्यांचा हेतू चांगला असेल ही पण या लोकांना त्या भावनेची किंमत कशी कळणार ?

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034