ग्राहक संरक्षण कायदा २०१९ हे आजच्या युगात ग्राहक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल
*ग्राहक संरक्षण कायदा २०१९ हे आजच्या युगात ग्राहक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेलः*
*ग्राहक संरक्षण सेवा समिती चे राष्ट्रीय चिटणीस दयानंद नेने यांचे झूम मीटिंग मध्ये प्रतिपादन*
ग्राहक संरक्षण अधिनियम, २०१९, २० जुलै २०२० रोजी अंमलात येईल. हा कायदा जुन्या 1986 च्या कायद्याची जागा घेईल. नवीन अधिनियम त्याच्या अधिसूचित नियम व तरतुदींद्वारे ग्राहकांना सक्षम बनवेल.
कोविड संक्रमण काळात लॉक डाउन असल्याने ग्राहकांशी झूम व्हर्चुअल मीटिंग द्वारे संवाद साधताना ग्राहक संरक्षण सेवा समितीचे राष्ट्रीय सचिव दयानंद नेने म्हणाले की, "नवीन कायदा 'ग्राहक देवो भवः 'च्या मूलभूत तत्त्वावर केंद्रित आहे जो आपल्या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे. या कायद्याद्वारे ग्राहक सुरक्षा सुनिश्चित केली जाईल. हा कायदा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार केला आहे. हा कायदा निश्चितपणे हेही सुनिश्चित करतो की खोट्या प्रॅक्टिसमध्ये गुंतलेल्या कोणत्याही घटकास माफी दिली जाणार नाही व ग्राहक हित हेच सर्वोपरी ठेऊन गरज असेल ती कारवाई केली जाईल."
प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी नवीन कायदा वाचून समजून घ्यावा, अशी विनंती मी करतो. या नवीन कायद्याची अंमलबजावणी होताच, ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अनेक नवीन नियमांची अंमलबजावणी केली जाईल, जे जुन्या कायद्यात नव्हते, विशेषत: गेल्या काही वर्षांत आलेल्या नवीन व्यावसायिक मॉडेल्सचादेखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. असे दयानंद नेने म्हणाले.
Comments
Post a Comment