कोरोनाविरुद्धची घ्यायची दक्षता
*कोरोनाविरुद्धची दक्षता:*
*वारंवार वाचा-काळजी घ्या.*
*१.* दिवसातून निदान चार-पाच वेळा आपले हात साबणाने एक पूर्ण मिनिट धुणे.
*२.* सार्वजनिक ठिकाणी सरफेसेसना हात लावताना प्लास्टिक ग्लोव्ह नक्की घालणे. घरात किंवा ऑफिसात शिरताना तो ग्लोव्ह बाहेरच काढून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणे.
*3.* आपला मोबाईल फोन सॅनिटायझर्स वापरून वारंवार पुसत रहाणे .
*४.* नाक, तोंड, चेहरा पूर्ण कव्हर करणारा चांगल्या प्रतिचे मास्क/स्कार्फ बांधूनच बाहेर जाणे. ६० टक्के लोकांनी, ६० टक्के क्षमतेचा मास्क घातल्यास कोरोना साथ ओसरेल.
*५.* बाहेर जाताना टाईट गॉगल घालणे.
*६.* जमेल तितका गर्दीशी संपर्क टाळवा . शक्यतो घरी राहून काम करणे.
*७.* कोणत्याही व्यक्तीशी बोलताना निदान सहा फूट दूर रहाणे. यात नाकातोंडावर मास्क असणे तर महत्वाचे आहेच.
*८.* अधिक "नाजूक" व्यक्तींना (७० +, कॅन्सर , फुफुसाचे आजार असणारे, एड्स, सुप्त लिव्हर किंवा किडनी फेल्युअर) अधिक संरक्षण आणि विलगीकरण देणे. तसेच १ वर्षाखालील बाळांनाही .
*९.* डायबेटीस आणि ब्लड प्रेशरवर उत्तम कंट्रोल ठेवणे. कृपया याकडे कडक लक्ष पुरविणे.
*१०.* दारू, सिगारेट आणि ड्रग्स मुळे प्रतिकारशक्ती कमी होते. ती या काळात टाळणे .
*११.* रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी रोज निदान ३० मिनिटे दमवणारा व्यायाम. तसेच जमेल तितके उन्हात उभे राहून शरीराचे तापमान वाढविणे. यात त्वचा उघडी ठेवल्यास व्हिटॅमिन डी निर्माण होण्यासही उत्तम मदत होते. (एक तास उन्हात उभे राहिल्यास पुरेसे व्हिटॅमिन डी तयार होते!)
*१२.* भारत सरकारने सुचविलेली मार्गदर्शक तत्वे पाळावीत. आयूष काढा - होमियोपॅथीक गोळ्या यांचे सेवन करावे.
*१३.*. भाज्या किंवा फळे घरी आणल्यावर ती सॅनिटायझरने धुवून वापरणे .
*१४.* घरी "पल्स ऑक्सिमीटर" द्वारे रक्तातला ऑक्सिजन मोजणे. ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे ९२ टक्के किंवा त्याहून कमी झाले असल्यास ती करोनाची खूण असू शकते.
*१५.* सर्दी-ताप-खोकला-घसा दुखणे-अशक्तपणा अशी लक्षणे असता घाबरून न जाता ताबडतोब जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे.
*१६.* सर्वात महत्वाचे प्रशासनाला सहकार्य करा. प्रशासन आपल्या परीने सर्वकाही करत आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवा., डॉक्टरांवर विश्वास ठेवा, आपला जीव धोक्यात घालून रुग्ण सेवा करणारया सर्वांचा आदर करा. सोशल मेडियावरील खोट्या मेसेजेसवर विश्वास ठेवू नका.
*Best Wishes!*
(संकलित)
Comments
Post a Comment