लढायच कोणा कोणा बरोबर.. मी मध्यमवर्गीय.
*लढायच कोणा कोणा बरोबर.. मी मध्यमवर्गीय.*
माझे आयुष्य म्हणजे रेशन चे तांदूळ खाऊ वाटत नाही आणि दुकानातले तांदूळ परवडत नाही अशी . अर्थव्यवस्थेत मागणी उत्पन्न करणारा घटक मी, श्रीमंतांनी कर्ज घ्यायची, गरिबांनी अनुदान घ्यायचं,
मी मात्र भुकेल्या पोटी फोनचा रिचार्ज करून फेसबुक वर सुखाच्या कल्पना शोधायच्या. मला कुठल्याच व्यवस्थेला प्रश्न विचारायचा अधिकार नाही.
मागच्या आठवड्यात मुलांच्या शाळेचा मेसेज आला फी भरण्यासाठी ऑनलाईन लिंक ओपन केली आहे. मुलांना मुश्किलीने शाळेत प्रवेश मिळाला आहे, शाळेच्या व्यवस्थापनाला मी प्रश्न विचारू शकत नाही की राज्य सरकारने शाळा सुरू होई पर्यंत फि घेवू नका असे सांगितले असताना तुम्ही शाळा सुरू न करताच फी का घेता ?
कारण मी मध्यमवर्गीय ..
चोवीस रुपये लिटर मुळ किंमत असलेल्या पेट्रोल वर मी ६१ रुपये कर राज्य आणि केंद्र सरकारला देतो. या रोज होणाऱ्या लुटी बद्दल मी प्रश्न विचारायचा नाही, कारण मी मध्यमवर्गीय.
परवा दवाखान्यात गेलो, शरीरात धडधड होते म्हणून डॉक्टर ने ECG काढला, दवाखान्यात भरती केले दोन दिवस, सगळ्या चाचण्या करायला सांगितल्या , बावीस हजार रुपये बिल देवून डॉक्टर ने सांगितले तुमच्या शरीरात एक Vitamin कमी आहे.
सगळा संताप दाबून बिल भरले कारण मी मध्यम वर्गीय..
लॉक डाऊन काळात बँकेने स्थगित केलेल्या हफ्त्यांवर चक्रवाढ व्याज आकारात आहेत सुप्रीम कोर्टाने सांगून सुद्धा पण मी बँकेला प्रश्न विचारायचा नाही कारण मी मध्यम वर्गीय.
लॉक डाऊन नंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला केराची टोपली दाखवत कंपनीने १० ते ३० % पगार कमी केलेत पण या बाबत मी प्रश्न विचारायचा नाही, कारण मी मध्यम वर्गीय.
सध्या मध्यमवर्गीय कुटुंबाची स्थिती नवऱ्याने सोडलेली बायको जिला माहेर नाही अशी आहे. त्याने येईल ती परिस्थिती निमूट पणे स्वीकारायची आणि गप्प बसायचे. प्रश्न विचारायचे तर कोणा कोणाला विचारायचे आणि कोणा कोणा बरोबर लढायच छोट्या छोट्या गोष्टींसाठी लढायची तयारी केली तरी ज्यांचा प्रश्न आहे ते वर्ग म्हणून संघटित नाहीत.
आयुष्य अश्याच तडजोडीत संपणार याची खूणगाठ बांधून माझ्या मागे लागलेल्या कोरोना ला मी विसरलो आहे आणि मीच कोरोना च्या मागे लागलो आहे.
सद्य स्थितीचे व्यापक मंथन केल्यावर, कोमट पाण्याबरोबर साईड इफेक्ट नसलेलं स्वस्त औषध घेवून आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नाही.
*"कोरोना "हा आता कोणताही आजार राहिलेला नसून तो आता मेडिकल इंडस्ट्री चा धंदा झाला आहे.*
कुठे आहे *मलेरिया, डेंग्यू , न्यूमोनिया ,कावीळ हे आजार आता वातावरणातून हद्दपार झालेत का?*
*साधी सर्दी , खोकला झाला तरी तुम्हाला "कोरोना" positive करून टाकतात.*
आपण एवढे घाबरलो आहोत की बाकीचे आजार आपल्याला होतात हेच विसरलो आहेत.
*५ हजाराचे इंजेक्शन ४० हजार*
*३ लाख कमाई, सहजपणे फक्त कोरोना झाला असे सांगा.*
*झोपडपट्टी तून कोरोना गेला खूप नियंत्रण मिळवले.*
*थोडा विचार करा आता फक्त मध्यमवर्गीय, श्रीमंत येथेच कोरोना होतोय.*
*कारण याच लोकांकडून प्रत्येक व्यक्ती मागे ३ ते ५ लाख रुपये कमाई होते.*
*झोपडपट्टी वासियांकडून आता काहीच मिळणार नाही म्हणून तेथे कोरोना नियंत्रणात आला आहे.*
*🙏🏻🙏🏻सावध व्हा आणि निर्णय घ्या अन्यथा हा बाजार असाच आपल्याला संपवेल.🙏🏻🙏*
कारण मी मध्यम वर्गीय.
*बेंबीच्या देठापासून भारत माता की जय*
Comments
Post a Comment