५१ वर्षांपूर्वी बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय

आज १९ जुलै , 

आजच्याच दिवशी ५१ वर्षांपूर्वी बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा  निर्णय झाला , महत्वाचा निर्णय Undoubtedly , याचं  कौतुक वगैरे वगैरे करणारे लांब लांब समाजवादी निबंध आपण वर्षानुवर्षे वाचतो ,  अशाच निबंध लिहिणाऱ्या आमच्या एका मित्राला विचारलं की १९६९ साली १९ जुलैचाच मुहूर्त का निघाला ? यावर काही का नाही लिहिलंस ? तर उत्तर मिळालं , "त्या तारखेत काय मोठं ?" 😊 ...



RBI च्या इतिहासात ज्या निर्णयाचा उल्लेख  Nationalisation of banks as the “single most important economic decision taken by any government since 1947. Not even the reforms of 1991 are comparable in their consequences—political, social and, of course, economic.”
अशा शब्दांत केला गेला असा निर्णय १९ जुलैलाच का झाला ?

९०% हुन अधिक मंडळींना माहितीच नसतं याचं उत्तर .

 अनेक लोक अधिकारवाणीने बँकांच्या IPO/FPO/ESPS वर व्यक्त होतात , पण हे नशीब १९ जुलैच्या वाटेला का आलं ? याचं उत्तर मिळत नाही 😊.

त्याचं कारण आर्थिक , समाजवादी नक्कीच नव्हतं .

बँकांचे राष्ट्रीयीकरण व्हावे हा विचार १९४८ पासून होता , हिशोब मागणारे कोणीच नव्हते म्हणून ढकलगाडी सुरू होती ,  १९६६ ला लाल बहादूर शास्त्रीजी यांचा दुर्दैवी अंत झाला आणि सत्ता 'गुंगी गुडीया'असलेल्या इंदिराजींकडे आली , मुंडावळ्या तयार ठेवलेली मंडळी अनेक होती , स्वतः मोरारजी होते , ६७ ची निवडणूक काँग्रेस जिंकली पण जागा केवळ २८३ होत्या , सात राज्यात सत्ता गेली होती , Syndicate हा इंदिराजींच्या ( Indicate ) विरोधी प्रबळ गट  कार्यरत होता .

राष्ट्रपती असलेल्या झाकीर हुसेन यांचा मृत्यू झाला ३ मे १९६९ ला , व्ही. व्ही. गिरी उपराष्ट्रपती होते त्यांना Acting President बनविण्यात आले , राष्ट्रपती पदाची निवडणूक लागली होती आणि अंतर्गत राजकारणही सुरू होतं , Syndicate मंडळींनी नीलम संजीव रेड्डी यांना उमेदवारी दिली , इंदिराजींचा विरोध होता आणि खेळ सुरू झाला ☺️ .

अर्थमंत्री असलेल्या मोरारजींना न विचारता १२ जुलैला बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा विचार इंदिराजींनी बोलून दाखवला , मोरारजी यांनी राजीनामा दिला , अर्थ मंत्रालय इंदिराजींनी स्वतःकडे घेतलं , व्ही . व्ही. गिरी यांना स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराविरोधात अपक्ष म्हणून उभं केलं त्यासाठी व्ही. व्ही. गिरी यांना उमेदवारी अर्ज भरायचा होता त्यासाठी आधी त्यांना राजीनामा देणे आवश्यक होतं , १८ जुलैला आय. जी.पटेल ( CEA) आणि एल. के. झा ( RBI गव्हर्नर ) यांना हा कायदा बनविण्यासाठी २४ तास देण्यात आले , जे २१ वर्षात नाही झालं ते २४ तासांत संपवायचे होते , आपल्या अनेक कामांना पांघरूण हवं असतं तसं एक पांघरूणच जणू .

१९ जुलैला या Ordinance वर Acting President असलेल्या व्ही. व्ही. गिरी यांनी सही केली आणि संध्याकाळी ८-८:३० ला पंतप्रधान असलेल्या इंदिराजींनी कायदा लागू केला , व्ही. व्ही. गिरी यांनीपुढची सही स्वतःच्या राजीनाम्यावर केली , २० जुलैला आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा फॉर्म भरला अजून गंमत काय तर २१ जुलैला लोकसभेचे अधिवेशन सुरू होणार होतं ☺️ . 

विचार करा आता समाजवाद , लोकशाही , सर्वांना सोबत घेऊन चालणे इत्यादी इत्यादी शब्दांवर ...

पुढं 'स्वतःच्या Conscious ला स्मरून मतदान करा' असे सांगणाऱ्या इंदिराजींनी पक्षविरोधी जाऊन गिरी यांना छोट्याश्या मताधिक्याने निवडून आणले , नीलम संजीव रेड्डी हरले आणि तिसऱ्या ठिकाणी राहिले महाराष्ट्राचे कंठमणी RBI चे पहिले भारतीय गव्हर्नर 'चिंतामणराव देशमुख' ☺️.

तसं १९ जुलैचे माझा मित्र म्हणाला ' तारखेत काय मोठं ? ' त्याप्रमाणे खरंच काही महात्म्य नाही पण या गोष्टी चर्चेत नसतात , यातील प्रत्येक संदर्भावर शोधल्यास , वाचल्यास इतकं काय काय वाचायला मिळतं की विचारू नका . 

या कायद्यालाच पुढं आव्हान देण्यात आलं कोर्टात , यात वेळोवेळी बदल झाले त्याबद्दल पुनः कधीतरी लिहीनच .

📌 १९ जुलैच्या बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या मुहूर्तामागे समाजवाद , राष्ट्रीय विचार , आर्थिक विचार हे प्रमुख नव्हतं जे होतं ते शुद्ध राजकारण , आज एवढंच ☺️ ....

🖋️ - शंतनु शरद पांढरकर

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034