भरडला जातो तो मध्यम वर्गातील माणूस

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आम्हांस आपल्याबद्दल नितांत आदर आहे आणि तो कायम राहील पण...
मला व्हाट्सअपवर एक पोस्ट आली आहे ती आपल्या नजरेस पडावी म्हणून हा उहापोह.
सरकारने अापल्या कमाईचे मात्र सर्व पर्याय खुले केलेत!
१. दारू विक्री सुरू
२. गुटखा विक्री सुरू
३. पेट्रोल पंप सुरू (तेही पूर्ण दर आकारून)
४. आरबीआयचे व्याज सुरू
५. ऑनलाइन मार्केट सुरू
७. टि.व्हि.चँनेल सुरू
७. सर्व विभागांचे कर लागू (भूमी कर, परवाना देयक इ.)
८. वीज देयक सुरू 🙁

जे कुठलाही कर देत नाहीत त्या गरीबांना सर्व काही मोफत.
१. काेरोना चाचणी मोफत
२. धान्य मोफत
३. मनरेगा लागू (नव्या दरांसह)
४. गॅस सिलिंडर मोफत
५. विनाकाम मजुरी लागू🙁

मध्यमवर्गीय सर्वच ठिकाणी दबतोय कारण तो याचसाठी जन्मलाय!
१. सरकारची देयकं अदा कर.
२. मुलांच्या शिक्षणाची फी भर.
३. सर्व परवान्यांची देयकं भर.
४. दुकान, उद्योगधंद्यात कर्मचाऱ्यांना बिनाकाम पगार दे.
५. दुकान न उघडताच भाडं, वीज देयकं भर.
६. बँकेला पूर्ण व्याज नाही दिलंस तर तो अतिरिक्त भार झेल.
७. सरकारला मदतस्वरूपात दान दे.
८. आसपासच्या गरजवंतांना भोजन,  सामान इ. मदत कर.
९. तुझ्या बचतीवरचं व्याज कमी केलंच आहे.
१०. धंधा करायचाच असेल तर सरकारी नियमांचं पालन कर.🙁

चाळीस दिवस सरकारकडे कर नाही आला तर सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन देऊ शकत नाहीय आणि जणू मध्यमवर्गीयांकडे पैशाचं झाडच लावलंय ज्यांनी करही भरायचा, भाडंही भरायचं, पगारही द्यायचे, शाळा-कॉलेजांची फीसुद्धा भरायची आणि आपलं घर-कुटुंबही सांभाळायचं.🙁

खरंच ज्यांना हा लेख मनापासून आवडेल, समजेल त्यांनी तो नक्की सर्वत्र पाठवा. मध्यमवर्गाचं हे न उलगडणारं कोडं यातून काही सुटेल, असं वाटत नाही; पण किमान ते त्यांच्यापर्यंत पोहचू तरी देत!!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हा लेख न पटल्यास कोणतंही दु:ख नाही. कारण आता मध्यमवर्गाला याची सवय झालीय!!

 ✍️ मध्यमवर्गीय
मराठी माणूस

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained