#उद्धव #ठाकरे #महाराष्ट्र #उध्वस्त #होतोय...

#सहनशीलता #संपलीये...
#उद्धव #ठाकरे #महाराष्ट्र #उध्वस्त #होतोय...

मुख्यमंत्री होण्याचा तुमचा बालहट्ट पूर्ण झाला
पण करोडो लोकांचे आयुष्य उध्वस्त होतंय तिकडे लक्ष दिले असते तर मा.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा आत्मा सुखावला असता.

कोरोना संकटात महाराष्ट्र ज्या पद्धतीने होरपळून निघतोय ते पाहून मन विषण्ण होतंय.
कुठलीच संवेदनशीलता,कार्यतत्परता, नियोजन नसलेले राज्यकर्ते असल्यावर लोकांना असहायतेच्या भावनेव्यतिरिक्त काहीही लाभू शकत नाही.
सगळं रामभरोसे चाललंय.
लोकांना मरायला मोकळं सोडलंय अशी भीषण स्थिती महाराष्ट्रभूमीत आहे.

घरी बसून पक्ष चालवत लोकांना फुकटचे सल्ले देणं वेगळं.
मुख्यमंत्री होणं म्हणजे मठ चालवण्याऐवढं सोपं नाही असले भिकार सल्ले देणाऱ्यानी महाराष्ट्र मरणाच्या दारात नि यमाच्या ताब्यात देऊन ठेवलाय.

आमदार होण्यासाठी दहादा राज्यपालांचे उंबरे झिजवणारे,फॉर्म भरायला सहकुटुंब बाहेर पडून लोकांना घरात रहायचे सल्ले देणारे,त्यानंतर शपथविधी ला घराबाहेर पडणारे पण या सगळ्यात गेल्या दोन महिन्यात कुठेच जमिनीवर,रुग्णालयात जाणारे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतेला पहायला मिळाले नाहीत हे एक भयानक वास्तव आहे.
युद्ध युद्ध असले बालिश भाषण ठोकणारे सेनापति घरात बसून पोकळ गरम पाण्याच्या डरकाळ्या फोडतायेत.

गेले दोन महिने संघ परिवाराच्या माध्यमातून फक्त पुणे जिल्ह्याचा विचार केला तर लाखो कुटुंब दोन वेळच जेवण मिळवतायेत.
या लोकांतील फक्त भूकबळीमुळे मेलेल्या लोकांची संख्या काही हजारात गेली असती.
एक अराजकीय संघटना स्वतःच्या निःस्वार्थ कार्यकर्त्यांच्या जोरावर जर हे करू शकली तर प्रशासन, यंत्रणा,पैसा,अधिकार असणाऱ्या राज्य सरकारला हे का जमत नाहीये ????
की त्यांना हे करायचंच नाहीये???
या सगळ्यात आपण प्रवास व्यवस्था,निवारा,औषध वाटप, वस्तीत जाऊन केलेल्या कोरोना टेस्ट,लॉकांना अन्नधान्य वाटप,अडीअडचणींना नियोजन करून तत्पर मदत या गोष्टींचे उल्लेखही केले नाहीये...
स्वयंसेवी संस्थांना जे जमतंय ते राज्यसरकारला जमत नाहीये यातच सर्व काही आलं.
या सर्व गोष्टी जर वजा केल्या तर राज्यात किती हाहाकार माजला असता याच्या जाणीवेने सामान्य नागरिक उद्विग्न नि संतप्त झालाय.

पोलिसांचे होणारे हाल,हजारो पोलिसांना झालेली कोरोना लागण, पोलिसांवर झालेले शेकडो हल्ले या सगळ्यात पोलीसांच्या रक्षणासाठी राज्य सरकारने काय केले तर हल्ले करणाऱ्याना रमजान मध्ये खिरापत वाटून पोलिसांच्या जखमेवर मीठ चोळून हिंदुत्वाला बळकटी मिळवून दिली.

कर्तव्य बजावताना कोरोनाने मृत्य पडलेल्या तरुण पोलिसाला वेळेत उपचार न मिळणे,त्याच्या मृत्यू दाखल्यावर कोरोनाचा उल्लेख न करता इतर रोगांचा उल्लेख करून त्याच्या मृत्यूची अवहेलना करताना पोलीस दल नि त्यांच्या घरच्यांसमोर आपण काय आदर्श ठेवतोय याचा विसर पडलेल निगरगट्ट,स्वार्थी,घरबसे नेतृत्व पहायला मिळणे हे महाराष्ट्राच दुर्दैव आहे.
स्वतः घरात सुरक्षित बसून पोलीस नि जनतेला अक्षरशः मरायला मोकळं सोडलं अशी भीषण स्थिती असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल.

फक्त एकट्या मुंबईत रोज हजारो रुग्ण सापडतायेत पण त्याच वेळी त्यांची व्यवस्था कुठे होतीये याबद्दल काहीच कळायला मार्ग नाही...
मोठे उद्योजक फिरायला जातायेत पण सरकारला याबद्दल काहीच माहिती नसते...
कोरोना रुग्ण रुग्णालयातून पळून जातायेत, रुग्णांच्या चाचण्या न घेता बरे झाले म्हणून घरी सोडलेले रुग्ण परत आजाराने ग्रस्त होतायेत पण सरकारला काहीच माहीत नाहीये...
रुग्णांना जागा नाही म्हणून रस्त्यावर तडफडून मरणारे लोक महाराष्ट्र बघतोय पण सरकारला दिसत नाहीये...
डॉ चे,सेवकांचे पगार कापतायेत...
डॉ ना औषध,पूरक गोष्टींचा भयानक तुटवडा जाणवतोय...
एकीकडे 5 रु शिवभोजन असताना दुसरीकडे 50 रु ची खिचडी जी येणार दुपारी 3ला तीही आंबलेल्या अवस्थेत...
तर दुसरीकडे मुंबईत नि ठाण्यात क्वारंटाईन सेंटरमध्ये कंत्राटदाराला वेगवेगळे जेवणाचे दर ?
पूर्व उपनगरात दिवसाचे १७२ रु, धारावी दादर मध्ये ३७२ रु आणि ठाण्यात ४१५ रु ??....

दुसरीकडे स्वतःच राज्य,राज्यातील जनता यांच्या आयुष्यासोबत खेळत असताना जबाबदारी ढकलून,भोंगळ कारभार करत स्वतःच्या राज्यातून जे लोक इतर राज्यात चाचणी न करता पाठवले तिकडेपन कोरोना पसरवायच पातक यांनी स्वहस्ते केलं.
आपल्या नाकर्तेपणामुळे,प्रचंड मेहनत करत,धोका पत्करत,अहोरात्र काम करत कोरोनामुक्त झालेली राज्ये आपल्या कर्तबगार मुख्यमंत्र्यांमुळे कोरोनाने भरून गेली.

हे सगळं होत असताना निर्लज्जपणे,एरवी कायम खोट्या जगात वावरणाऱ्या नट नट्यांकडून पैसे देऊन स्वतःच कौतुक करवणारा नि पोकळ,फुटकळ प्रसिद्धी मिळवणारा मुख्यमंत्री पहायचं महाराष्ट्राच्या नशिबी आलं.
स्वतःच अपयश झाकण्यासाठी एवढ्या खालच्या स्तरावर जाणारा असंवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधीही मिळाला नाही.

कोरोनसंदर्भातल्या राज्यपाल बैठकीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या...
पण विरोधी पक्षांच्या बैठकीला हजर राहणारेत नि हे इतरांना राजकरण करू नका सांगणार...
महिला सॅनिटरी नॅपकिनवर युवराज आदित्य ठाकरेंचा फोटो छापला...
दोन महिने नाकर्तेपणा झाकण्यासाठी राजकारण करू नका म्हणाले
पण स्वतः राजकारण करत राहिले...

आत्मभान,संवेदनशीलता असेल तर नैतिकता दाखवत पायउतार व्हा नि योग्य व्यक्तीकडे कारभार सोपवा...
अन्यथा मराठी,हिंदू माणूस असाच मरत राहील...
पण ज्या खुर्चीसाठी एवढी सगळी सर्कस केली ते सुटेल अशी आशा अजिबात नाही.....

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034