कोविड मुळे राजकीय फावडे मारणारे सोकावतील..

मा. राजेश टोपेजींनी जाहीर केलेले आहे की आदरणीय  महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य  योजने अंतर्गत कोरोनाग्रस्तांवरचे उपचार फुकट केले जातील. म्हणजे रूग्णालयाला रूग्ण पैसे देणार नाही, ते पैसे नंतर सरकार या योजनेअंतर्गत जमा करून राज्याच्या खर्चात दाखवेल.

आपण सर्वत्र पहात आहोत की कोरोनारूग्ण रूग्णालयात दाखल झाला की कमीतकमी  दीड दोन लाखापासून ते पाच लाखावर सुद्धा बिले त्याच्याकडून घेतली जात आहेत.

कोरोना पसरण्याच्या मॉडेलनुसार पुढील सहा महिन्यात महाराष्ट्रात किमान एक कोटी लोक कोरोनाबाधित होतील असा अंदाज आहे.
पावसाळ्यानंतर जिथे मोकळी जागा दिसेल तिथे बेड टाकून यांवर उपचार केले जातील.
ज्याची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह येईल तो कमीतकमी लाख रूपयांना कापला जाईल. सर्व रूग्णांना मिळून एकूण किती पैसे भरायला लागतील (रू. 1,00,000 x 1,00,00,000)

खरी मेख तर पुढेच आहे. प्रत्येक रूग्णाला तर पैसे भरायला लागणारंच.  परंतू नंतर या सर्व रूग्णांवर फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार झाले असे भासवून सरकार पुन्हा या सर्वांचे पैसे खर्चात दाखवून लाखो कोटींचा घोटाळा होण्यास पूर्ण वाव आहे. क्रॉसचेकींग करणेही अवघड आहे.
उद्या जर राज्यसरकारने 10000 कोटी रू. सॅनिटायझर स्प्रे करण्याचे लावले तरी त्याला कोणीही चॅलेंज करू शकणार नाही.

बर्याच ठिकाणी दानशूर जनता, स्वयंसेवी संघटना जेवण पुरवत आहेत पण सरकार म्हणाले कोट्यावधी माणसांना जेवण दिले तर सरळ गुणीले त्याचे काय असतील ते पैसे जे 175 रू. पासून 450 रू. पर्यंत आहेत तो खर्च दाखवला जाणार...

डेडबॉडी सूट खरेदीतही प्रचंड पटीत भ्रष्टाचार होत असल्याच्या बातम्या आहेत. साध्या काळ्या प्लॅस्टिक मधे गुंडाळून त्याचे 7500 रू. दाखवले तरी त्याला काहीही चॅलेंज नसणार आहे...

अन्नधान्याच्या भाजीपाल्याच्या किमती दुप्पट तिप्पट होत आहेत. हे वरचे पैसे कुठे जातात ते आता शेंबड्या मुलालाही समजते. गृहनिर्माण संस्थांकडूनही दबाव आणून हजारो रूपये मुख्यमंत्री निधीसाठी घेतले जात आहेत  अशाही बातम्या आहेत.

त्यामुळे कोरोना लवकर आटोक्यात येणार का किंबहुना सरकार तसे प्रयत्न करणार का ?  या प्रश्नाचे  उत्तर ज्याचे त्याने शोधावे.... 😀👍

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034