*स्वा. सावरकरांच्या आरोपावरील सप्रमाण खंडन*

*स्वा. सावरकरांच्या आरोपावरील सप्रमाण खंडन*

नुकतेच मी सावरकर नाही, मी माफी मागणार नाही, अशा तऱ्हेचे वक्तव्य करुन राष्ट्रीय पप्पुने अकलेचे तारे तोडले. पप्पुने हे जे सावरकरांबद्दलचे वक्तव्य केले आहे ते अतिशय निषेधार्ह आहे. आता यावर दोन्ही पक्षांकडून आणि राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप आणि चर्चा होतील. खरी स्थिती काय आहे? सावरकरांनी माफी मागितली होती काय? जर मागीतली होती, तर कोणत्या अटी आणि शर्ती होत्या? याचे सप्रमाण खंडन रणजित सावरकर यांनी आपल्या छोटेखानी पुस्तिकेत केले आहे. त्या पुस्तकातील मुद्दे इथे मांडत आहे. 
२४ जानेवारी २०१६ च्या द विक या साप्ताहिकाच्या अंकात स्वा. सावरकर यांची बदनामी करणारा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखात पाच आरोप झाले होते. त्यापैकी आरोप क्र. १:- *स्वा. सावरकर अंदमानमध्ये गेल्यानंतर खचले आणि त्यांनी एका मागोमाग एक माफीपत्र पाठवली.* (याच द विकच्या लेखाचा आधार घेऊन राष्ट्रीय पप्पुने सावरकरांवर चारित्र्यहनन करणारा आरोप लावला.)
*वस्तुस्थिती:-* स्वा. सावरकरांनी आपली सुटका व्हावी यासाठी अनेकदा आवेदने पाठवली होती आणि ही वस्तुस्थिती त्यांनी माझी जन्मठेपेमधे कधीही लपवली नाही. परंतु या आवेदनपत्रांत कुठेही आपल्या कृत्याबद्दल माफी अथवा पश्चाताप नाही. सावरकर बैरीस्टर होते. त्यामुळे वकिलीबाण्याने आपल्या सुटकेसाठी कायद्याच्या चौकटीत प्रयत्न करणे आणि पुन्हा लढा उभारणे, हे प्रत्येक क्रांतीकारकाचे कर्तव्य आहे, हे सावरकरांचे मत होते. हे आपले मत अंदमानात असलेल्या क्रांतीकारकांपुढे ते वारंवार मांडत. याला थोर क्रांतिकारक सच्चिंद्रनाथ संन्याल साक्षिदार होते. लाहोर कटाच्या खटल्यात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती आणि सावरकरांप्रमाणेच वचनपत्र देऊन ते सुटले होते. नंतर त्यांनी पुन्हा जोमाने क्रांतीकार्य सुरू केले आणि प्रसिद्ध काकोरी कटाचे सुत्रधार म्हणुन त्यांना पुन्हा जन्मठेपही झाली. 'बंदी जीवन' या आपल्या आत्मचरित्रात पान क्र. २२६ वर ते म्हणतात, "सावरकरांनी केलेल्या अर्जात माझ्याप्रमाणेच सहकार्याचे वचन दिले होते, परंतु माझी सुटका झाली पण त्यांची का नाही? .... कारण सरकारला अशी भिती होती की, सावरकरांची सुटका झाली तर महाराष्ट्रात पुन्हा बंडाचा भडका उडेल."
द विकने नोव्हेंबर १९१३ मधला एक अर्ज दिला आहे. परंतु त्यात कुठेही पश्चाताप किंवा माफी नाही. या अर्जात आम्हाला एकतर राजकीय बंदी हा दर्जा द्या, नाहीतर सामान्य बंदिवानाप्रमाणे सवलती द्या आणि हे शक्य नसेल तर भारतात अथवा ब्रह्मदेशातील तुरुंगात पाठवा ही मुख्य मागणी आहे. 
या अर्जाच्या शेवटी "Where else the prodigal son can go...." हे वाक्य असले तरी ती व्यंगोक्ती आहे. याच अर्जातील विशेष गैरसोयी भोगण्यासाठीच आम्हाला विशेष कैदी म्हणून गणल्या जाते, युरोपमधील इतर लोकशाहीवादी देशात अशी मागणी करावी लागली नसती, प्रत्येक मनुष्याचा जो मुलभूत अधिकार आहे, अशा गोष्टींची मागणी करावी लागणे हे दुर्दैवी आहे इत्यादी वाक्यातून ब्रिटिशांना लगावलेले टोले बघता ही गोष्ट स्पष्ट होते. 

१४ नोव्हेंबर १९१३ चा अर्ज देतांना सावरकरांनी सर रेजिनाल्ड क्रेडाक यांच्याशी व्यक्तिगत चर्चा केली होती. हा अर्ज सरकारकडे पाठवितांना आपल्या २३ नोव्हेंबर १९१३च्या अहवालात सर क्रेडाक यांनी सावरकरांबद्दल काढलेले निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते म्हणतात,
*"सावरकरांचा अर्ज हा दयेचा असला तरी त्यात त्यांनी कुठेही खेद अथवा खंत व्यक्त केलेली नाही. पण त्यांनी आपला दृष्टिकोन बदलला असल्याचा दावा केला आहे. १९०६-०७ मधे असलेल्या परिस्थितीमुळे आपण कट रचला असे त्यांचे म्हणणे आहे. पण आता सरकारने विधीमंडळ, शिक्षण इ. अनेक बाबीत सुधारणा करण्याचा सलोख्याचा दृष्टिकोन अवलंबला असल्याने क्रांतिकारी मार्ग अनुसरण्याची गरज नाही असे त्यांचे म्हणणे आहे."*
*"सावरकरांच्या बाबतीत त्यांना इथे कुठलीही मोकळीक देणे शक्य नाही आणि माझ्या मते ते कुठल्याही भारतिय तुरुंगातून पळून जातील. ते इतके महत्त्वाचे नेते आहेत की युरोपातील भारतिय अराजकतावादी त्यांना सोडवण्यासाठी कट रचून तो अल्पकाळात अंमलातही आणतील. त्यांना जर सेल्युलर जेलबाहेर अंदमानात धाडले तर त्यांची सुटका निश्चित आहे. त्यांचे मित्र सहजतेने एखादे भाड्याचे जहाज जवळपास सहज लपवू शकतील आणि थोडे पैसे पेरुन त्यांच्या सुटकेसाठी उर्वरित बाबी सहज शक्य असतील."*
परंतु रेजीनाल्ड क्रेडाक यांच्या या सविस्तर निष्कर्षाकडे आणि सावरकरांबरोबर अंदमानात शिक्षा भोगत असलेल्या सचिंद्रनाथ सान्याल, उल्लासकर दत्त, रामशरण शर्मा आणि भाई परमानंद यांच्या प्रत्यक्ष अनुभवांकडे मात्र सावरकरांना माफीविर संबोधुन अपमान करणारे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. 
सध्या उपलब्ध असलेल्या कारागृहातील नोंदींप्रमाणे त्यांनी भोगलेल्या अमानविय शिक्षा खालीलप्रमाणे:-
* ३० आगष्ट १९११ या दिवशी त्यांना सहा महिने एकांत कोठडीची शिक्षा.
*११ जून १९१२ या दिवशी त्यांच्याजवळ कागद सापडल्याबद्दल १ महिना एकांत कोठडीची शिक्षा
* १० सप्टेंबर १९१२ या दिवशी त्यांच्याजवळ दुसऱ्याला लिहलेले पत्र सापडल्याबद्दल सात दिवसांची खडी हातबेडी.
*२३ नोव्हेंबर १९१२ या दिवशी त्यांच्याजवळ दुसऱ्याला लिहलेले पत्र सापडल्याबदल एक महिन्याची एकांत कोठडीची शिक्षा
* ३० डिसेंबर १९१२ ते २ जानेवारी १९१३ या कालावधीत अन्नत्याग
* १६ डिसेंबर १९१३ काम करण्यास नकार
*१७ डिसेंबर १९१३ एक महिना एकांत कोठडीची शिक्षा. पुस्तके अथवा काम नाही. 
* ८ जून १९१४ काम करण्यास नकार. दहा दिवसांची खडीबेडीची शिक्षा
*१६ जून १९१४ काम करण्यास नकार. चार महिने साखळदंड
*१८ जून १९१४ काम करण्यास नकार. दहा दिवसांची खडीबेडीची शिक्षा. 
*१९ जून १९१४ दोर वळण्याचे काम करण्याची तयारी दाखवली
*१६ जुलै १९१४ एक महिना दंडाबेडीची शिक्षा
*१८ मे १९१५ दंडाबेडीची शिक्षा
*११ जून रुग्णालयात भरती केल्यामुळे दंडाबेडी काढली

स्वा. सावरकरांना देण्यात आलेल्या अनेक शिक्षा बेकायदेशीर असल्यामुळे त्यांची नोंद झाली नाही, असे स्वा. सावरकरांची माझी जन्मठेप या पुस्तकात म्हटले आहे आणि इतर क्रांतीकारकांच्या आत्मचरित्रातही हे स्पष्ट केले गेले आहे. तरीही वरील अपुर्ण दस्तावेज बघतांनाही सावरकरांना किती कठोर शिक्षा झाल्या होत्या, याची झलक मिळते. सावरकरांना अंदमानमध्ये पोहचल्यानंतर लगेचच सहा महिने एकांतवासात ठेवले होते. ही किती भयानक शिक्षा असते, हे कुठलाही मानसोपचारतज्ज्ञ सांगेल. 
*समारोप:-* गांधी वधानंतर सावरकरांवर कपुर कमीशनचा आधार घेत चिखलफेक होतच राहिली. मात्र नंतर भारताच्या पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी टपाल तिकीट प्रकाशित केले व नंतर स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाला रु. १००००/- देणगी वैयक्तिक खात्यातून दिली. ( आज याच इंदिरा गांधी नातू पप्पू गांधी मै सावरकर नहीं हू, मैं माफी नहीं मांगुगा म्हणतो.) २८ मे‌ १९७९ ला उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा शिलान्यास केला. 

हा लेख शेअर करायला सावरकर भक्तांना वेगळे सांगावे लागणार नाही.

*(संदर्भ:- स्वा. सावरकर यांच्यावरील खोट्या आरोपांचे सप्रमाण खंडन लेखक:- रणजीत सावरकर)*

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034