सावरकरांची माफी - एक राजकीय खेळी

सावरकरांची माफी - एक राजकीय खेळी
अंदमानातील काळ्यापाण्याच्या शिक्षेतून सुट मिळण्यासाठी मागितलेल्या माफीनाम्याने सध्या खुप गदारोळ उठला आहे. पण ती खरंच माफी होती ? माझ्यामते ती माफी नव्हती, ती एक राजकीय खेळी होती, एका वकीलाच्या तल्लख बुद्धीने तयार झालेली. त्या वकीलाचे नाव विनायक दामोदर सावरकर, ज्यांना आपण स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून ओळखतो. पण ही खेळी त्यांना का खेळायला लागली यासाठी त्याची पार्श्र्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे.
स्वा. सावरकर कॉलेजमध्ये असल्यापासून देशाच्या स्वातंत्रतेच्या ध्येय्याने झपाटले होते. त्यांच्या भावाच्या साथीने त्यांनी अभिनव भारत ही एक संस्था देखील स्थापन केली होती. एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दशकाचा काळ देशामधील अनेक राजकीय घडामोडींनी उकळत होता, मुस्लीम लीगची स्थापना देशात झाली होती पण हिंदु असंघटीत होते. तेव्हा स्वा. सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला निघाले होते. आणि तिथे त्यांचे शिक्षण चालु असताना "हिंदु, हिंदुत्व" या विषयाने त्यांना विचारमग्न करुन सोडले होते. आणि तिथेच त्यांच्यातील क्रांतीकारकाचा जन्म झाला. हिंदु आणि हिंदुत्व जगवण्यासाठी देश स्वतंत्र होणे आवश्यक होते. आणि त्यासाठी त्यांचे वैचारिक कार्य सुरू झाले. त्यातून त्यांचे ब्रिटिश सरकारविरुद्ध लिखाण देखील सुरू झाले. आणि इंग्लंडमध्ये ते तेथील सरकारच्या स्कॅनरखाली आले. तिथे शिक्षण पुर्ण करत असताना त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला मदत होईल अशी दोन पुस्तके लिहीली. त्याची खबर ब्रिटीशांना लागली आणि पुस्तकं प्रकाशित व्हायच्या आधीच त्यावर बंदी घालण्यात आली आणि ब्रिटीशांविरुद्ध उभे राहील्यामुळे त्यांना प्रत्येकी २५ वर्षे अशा दोन जन्मठेपेच्या शिक्षा एकामागोमाग एक अशा भोगण्यासाठी अंदमानच्या काळ्यापाण्यावर पाठवण्याचा निर्णय झाला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिला असा क्रांतीकारी ज्याला भारताबाहेर असताना भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला मदतीच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याकाळात वकिली पुर्ण करुन बक्कळ पैसा कमावता आला असता, पण त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याला प्राधान्य दिले. लंडन वरुन बोटीनी त्यांना अंदमानसाठी पाठवण्यात आले. अंदमानात गेलो तर आपले कार्य अधूरे राहणार या कल्पनेने ते अस्वस्थ झाले होते. आणि त्यांनी कैदेतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. फ्रान्सच्या किनाऱ्याला बोट लागताच आपण फ्रेंच पोलिसांच्या स्वाधीन व्हायचे असे त्यांनी ठरवले, पण ते होणार कसे ? ते बोटीवर कैदी होते. आणि जन्म झाला एका धाडसाचा, बोटीच्या पोर्टहोलची काच तोडून त्यातून बाहेर पडताना सोलवटल्या जाणाऱ्या अंगाची पर्वा न करता मार्सेलिस येथे समुद्रात उडी मारली. संबंध अंगाची आग होत असताना मार्सेलिसच्या किनाऱ्याकडे पोहु लागले. एकच उद्देश फ्रेंच पोलिसांना स्वाधीन होणे आणि मग त्या मार्गाने भारतात जाऊन देशकार्य सुरु ठेवणे. तसे ते फ्रेंच पोलिसांच्या ताब्यात गेले देखील होते पण नशिबाने साथ नाही दिली. फ्रेंचभुमीवर फ्रेंच प़लिसांकडून त्यांना ताब्यात घेण्याचे अधिकार ब्रिटीशांकडे नव्हते पण तरीदेखील त्यांचा ताबा ब्रिटीशांना देण्यात आला. तसे जर झाले नसते तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे चित्र वेगळे दिसले असते. प्रयत्न असफल झाला तरीही त्यांनी आशा सोडली नव्हती. अंदमानात दाखल झाल्यावर त्यांची रवानगी सर्वात घातक गुन्हेगार भागात करण्यात आली "राजकीय कैदी" म्हणून नाही. असंख्य यातना सहन केल्या पण देशसेवेचे व्रत मनाला उभारी देत होते. तिथे कैदेत असताना त्यांचा हिंदूत्वा वरील विचारचक्र चालूच होते. विचार लिहायला कागद पेन नव्हते तर कोठडीच्या भिंतींवर दगडाने कोरुन लेख, कविता लिहील्या आणि त्या नाहीश्या होण्याच्या आधी स्वतः पाठ करुन ठेवल्या. कठीण शारिरीक कष्ट भोगत असताना त्याकडे दुर्लक्ष करून लिहीलेले विचार पाठ करून ठेवले. इतर कैद्यांमध्ये देशप्रेम जागवले. हो, कारण इतर कैदी राजकीय नव्हते, अट्टल गुन्हेगार होते. १० वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगून झाली होती. त्यांचा विचार स्पष्ट होता, इथे अडकलो तर देशकार्य घडणार नाही. पळुन जाता येण्यासारखी परिस्थिती नव्हती, कारण एका बाजूला अथांग सागर आणि दुसऱ्या बाजुला विषारी सरपटणारे प्राणी आणि मानवभक्षक आदिवासींनी भरलेले जंगल होते. तेव्हा त्यांच्यातील वकीलाने "माफीपत्र" तयार केले, एकच उद्देश, मायभूमीत परतून देशकार्य चालु ठेवणे. स्वातंत्र्ययुद्धात भाग घेण्यासाठी जेलमध्ये माफीचा देखावा उभा केला, त्यांच्या प्रयत्नांना यश लाभले आणि त्यांना भारतात रत्नागिरीला पाठवण्यात आले आणि नजरकैदेत ठेवले. छत्रपतींनी देखील मोगलांशी काहीवेळा तह केले होते, आग्र्याहून पलायन करायला लागले होते, पन्हाळ्यावरुन निसटायला लागले होते म्हणून आपण त्यांना पळपुटे म्हणणार का ? ते निर्णय आवश्यक होते हिंदवी स्वराज्य घडवण्यासाठी. आणि तेच लागु पडतं स्वा. सावरकरांच्या बाबतीत देखील. ते परत आल्यानंतर त्यांनी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केला आणि हिंदुत्वासाठी लढत राहिले, हिंदु महासभेचे ते अध्यक्ष देखील होते. आणि कॉंग्रेसच्या स्वार्थी धोरणांविरुद्ध खूलेआम त्यांनी आवाज उठवला होता.
"राजकारणाचे हिंदुकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण" हाच तो महामंत्र की जो प्रत्यक्षात आल्यास जगातील कुठलेही राष्ट्र हिंदुस्थानकडे वाकड्या डोळ्यांनी पाहु शकणार नाही. तो दिवस लवकर यावा हीच आमची आकांक्षा आहे"
"मी जर अध्यक्ष झालो असतो तर पहिल्या दिवशी दोन मानचित्र माझ्या डोळ्यापुढं ठेवली असती. एक म्हणजे हिंदुस्थानच्या सीमा कोणत्या आहेत त्या निश्चित करुन, याही माझ्या व्याख्येप्रमाणे, त्यात अरबी समुद्राला "अरबी" समुद्र हे नाव नाही, तो काही अरबांच्या बापाचा नाही, त्याला सिंधु सागर केला असता, आणि नंतर हे मानस सरोवर, हा चीन, आमची सगळी पुराणं काढुन आमच्या सरसीमा कुठवर होत्या त्या पाहून ही नो मॅन्स लॅंड हिंदु मॅन्स लॅंड करुन घेतली असती. आणि आमची सेना तिथे नेऊन ठेवली असती."
असे जाज्वल्य आणि ज्वलंत विचार असणारा माणूस, शेवटपर्यंत केवळ भारताचाच विचार करणारा माणूस पळपुटा असूच शकत नाही. ही नेहरुची पिलावळ सावरकरांविरुद्ध बोलते यांचे कारण सावरकरांनी नेहरुं बद्दल मांडलेले परखड विचार‌. " पण तो पटेल ... तो पोलादी पुरुष, मी त्याचे शतशः गुण गातो. जर त्याच्या हाती राज्यसत्ता असती ना तर बेरुबारी आज गेली नसती. पण त्या नेभळट लोकांच्या हाती तुम्ही सत्ता दिलीत, मतं दिलीत, आणि आता रडत बसता, मरगळ आली म्हणता ? कोणी मतं दिली नेहरुला ? तुम्ही दिलीत". "परंतू नेहरुला माहित होतं की चीन तिकडे रस्ते बांधतो आहे. अरे चारचारशे मैल मोटारचे रस्ते, रेल्वेचे रस्ते, सैनिकी रेल्वेचे रस्ते तिकडे बांधले जात असताना तुमचं हेरखातं काय करीत होतं ? पहिल्याने नेहरुंनी सांगितलं की आपल्याला बुवा काSSही पत्ता नव्हता. जर पत्ता नव्हता तर पंतप्रधान व्हायला अयोग्य होतास तू"
कळलं का आता इटालीयन ब्रीड का खार खाऊन आहे. सावरकरांवर संशय घेणाऱ्याला उत्तर म्हणजे सावरकरांचे विचार. त्या डुकराला काय वाटेल ते बरळु दे, आपले कार्य किंवा आपले प्रत्युत्तर सावरकरांचे विचार सगळीकडे पसरवणे. सावरकरांची जी भाषाशैली होती त्याचा प्रभाव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दिसून येतो, पण काय लाजिरवाणी गोष्ट पहा अशा तेजःपुंज माणसाच्या घरात असा करंटा जन्माला यावा.
या डुकरांनी कितीही घाण ओकली तरी काही फरक पडत नाही, ही संधी घ्या आणि सावरकरांचे विचार सगळीकडे पसरवा, सावरकर समजून घ्या तो खरा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान ठरेल.
हे अधम रक्तरंजिते | सुजन पुजिते | श्री स्वतंत्रते
तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण चराचर शरण, श्री स्वतंत्रते
वंदे त्वामहं यशोयुताम वंदे
जयोस्तुते श्री मह्नमंगले | शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती | यशोयुताम वंदे
जयहिंद
© स्वप्नील सुनील गुप्ते

Comments