राहुल गांधी असंवेदनशील आहेत।

राहुल गांधी असंवेदनशील आहेत।
आपले 'रेप इन इंडिया' चे वक्तव्य पचवण्यासाठी राहुल गांधी यांनी मोदींची एक जुनी क्लिप पोस्ट केली ज्यामध्ये मोदी दिल्लीला बलात्काराची राजधानी म्हणून संबोधतात.
मात्र लोकांनी राहुलच्या या धुळफेकी कडे लक्ष न देता संदर्भ समजून घ्यायला पाहिजे.
त्या वेळी दिल्लीतील गुन्ह्यांची वाढती संख्या पाहता दिल्लीबद्दल तसे म्हणणे; जसे राहुल गांधी उन्नावमधील बलात्कारांची संख्या पाहता म्हणाले;
मात्र दुसरीकडे जगभरातील देशांमधील बलात्काराच्या घटना या तेथील लोकसंख्येच्या मानाने घडणार्‍या अशा गुन्ह्यांची संख्या पाहता भारताला बलात्कारांची राजधानी म्हणण्यात फार मोठा फरक अाहे आणि अतिशयोक्ती आहे.
दोन्ही सारखेच असे म्हणून कसे चालेल?
उद्या मुंबईत असे गुन्हे फार वाढले तर देशाची अार्थिक राजधानी ही बलात्कारांची राजधानी बनली असे कोणी म्हणेलच. दिल्ली बद्दलची मोदींची वक्तव्ये तशा स्वरूपाची होती.
राहुल गांधी यांचे रेप इन इंडिया हे वाक्य स्त्रियांना बलात्कारामुळे भोगाव्या लागणाऱ्या शारीरिक व मानसिक यटनांप्रति असंवेदनशील होते आणि आहे आणि त्यापुढे जाऊन मी माफी अथवा दिलगिरी व्यक्त करणार नाही ही त्यांची वृत्ती पुरुषी अहंकार आणि मानसिक विकृती दोन्ही दर्शवते.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034