सडता सडता सत्ता!



२५ वर्षे शिवसेना युतीत सडली, असे उदगार उद्धवजी ठाकरे यांनी अगदी अलीकडे कधीतरी काढले होते.
- आता, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे संजय राऊत वारंवार विश्वासाने बोलत आहेत.
- युतीमुळे भाजप आणि सेना दोघांनाही सरकार स्थापन करण्याचे बळ मिळाले आहे.
- त्यामुळेच शिवसेना मुख्यमंत्रीपदावर दावा करू पाहात आहे.
- अन्यथा एकदाही शिवसेना स्वबळावर सत्तेवर येऊ शकलेली नाही. आताही स्वबळावर हा दावा शक्य नाही.
- युतीमुळे शिवसेनेला -आणि भाजपलाही- परस्परांच्या परंपरागत मतदारांनीही मते दिली, म्हणून हे बळ मिळाले.
- सत्तेचा दावा करण्याची ताकद शिवसेनेला मिळाली.
- मग शिवसेना युतीत सडली हा दावा चुकीचा नाही काय?
- उद्या खरेच शिवसेना सत्तेत आलीच, -कोणाही पक्षाशी हातमिळवणी करून- तर त्यांच्या त्या यशाचा मोठा वाटा भाजपचा नाही का?
- सेनेने त्यासाठी भाजपचे आभार मानायला हवेत.
- सडता सडता सत्तेपर्यंत पोहोचविण्यासाठी हात दिल्याबद्दल!!

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained