आता जरा कडू कारल्याचा रस पाजतो - मॅट्रो प्रोजेक्ट

आता जरा कडू कारल्याचा रस पाजतो

ठाण्याच्या परिसरातील जेवढी मोठी बांधकाम आहेत सगळीच्या सगळी तिवरांच्या झाडांची कत्तल करून तिथे मातीचा भराव टाकून मग केलेली आहेत ।

गेली दहा वर्ष महाराष्ट्र टाईम्समध्ये या तिवरांच्या झाडांच्या कत्तली बद्दल येत असते आतापर्यंत किती तिवर कापण्यात  आले माहितीये ? 1700000..

ठाणे आणि मुंबईला जोडणारा संपूर्ण पट्टा ही नैसर्गिक रित्या तिवराची खाजण होती या खाजणांमध्ये बिल्डर लोकांनी मातीचे भराव टाकून टाकून टाकून टाकून तिथे बिल्डिंगा बांधलेल्या आहेत ।

ज्या दिवशी समुद्राचे डोके फिरेल आणि तो स्वतःची मर्यादा सोडेल माझे शब्द लिहून ठेवा कमीत कमी दहा लाख मुंबईकर स्वतःच्या राहत्या घरासकट समुद्रात वाहुन जातील ।

या सगळ्याबद्दल एकही राजकीय नेता पेज-3 सेलिब्रिटी थोबाड उचकटून बोंबलणार नाही कारण या सगळ्यांच्या तोंडामध्ये बिल्डरांनी मजबूत पैसे कोंबलेले असतात ।

तिवराची खाजण ह्याचा आपल्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचा उपयोग आहे। समुद्र आणि मानवी वस्ती यांच्यामधील हा दुवा आपलं समुद्रापासून संरक्षण करत असतो आपण हा दुवा नष्ट करून तिथं बिल्डिंगा बांधणे  हे नुसते पातक नाही महापातक आहे ।

पण हे सगळ्या संबंधितांची थोबाड पैशांनी बंद करून झालेला आहे म्हणून याला कोणीही प्रसिद्धी देत नाही ना मीडिया देतो ना पेज थ्री सेलिब्रिटीज देतात ।

मुंब्रा घोडबंदर डोंगरी हे सगळे डोंगराळ भाग होते या सगळ्या ठिकाणी वनखात्याच्या मालकीची प्रचंड जमीन आहे अजूनही कागदांवरती वनजमीन म्हणूनच दिसते तिथे कोट्यावधी वृक्ष होते.

बांगलादेशातून आलेल्या निर्वासित मुस्लिमांना व्होट बँक आणि स्वस्तात राबणारे लेबर म्हणून वापरायचे असल्याने सर्व राजकीय नेत्यांनी त्यांना बेकायदेशीररित्या तिथे वसवले आहे। संरक्षित वन जमीन असतांना कोट्यावधी झाडांची कत्तल केली गेलेली आहे याबद्दल कोणीही एक अक्षर काढत नाही ।

मुंब्रा हा जो जितेंद्र आव्हाडांचा बालेकिल्ला आहे तिथे हे महापातक सर्वात जास्त झालेले आहे। तुम्हाला आठवत असेल दोन-तीन वर्षांपूर्वी याच जमिनीवरची एक इमारत अख्खीच्या अख्खी कोसळली पन्नास शंभर लोक मेले होते ।

कायदेशीरदृष्ट्या तिथं फ्लॅट सिस्टिम अस्तित्वातच नव्हती ती वनजमीन असून पूर्ण हिरवी राखली गेली होती । त्यांना काही कंपेन्सेशन  देणे शक्य नव्हतं मुख्यमंत्र्यावर दडपण आणून त्यांना सरकारी मदत पोहोचवली गेली।

हेच निच  लोक आता २७०० झाडांसाठी गळे काढून बोंबलत आहेत आणि आपला र* मीडिया त्यांना छाताडावर घेऊन नाचतो आहे त्याच्या मागची ही सगळी कटू पार्श्वभूमी लक्षात घ्या .
मॅट्रो  प्रोजेक्ट हा सामान्यांच्या हितासाठी सामान्यांच जगणं थोडं तरी सुखकर करण्यासाठी सरकार व करत आहे त्यात सुद्धा जी २७०० झाडे तोडली गेली आहेत त्याच्या बदल्यात पर्यायी आरेच्या जागेमध्ये दहा हजार वृक्ष लावून देतो हे सरकारने न्यायालयात दिलेलं वचन आहे सरकार त्याचं पालन करेल यासाठी डोळ्यात तेल घालून आवर्जून उभे राहा ।

पण या प्रोजेक्टला वांझोटा विरोध करणारा मिडिया राजकीय नेते आणि छपराट सेलिब्रिटींच्या नादाला लागू नका त्यांच्यासाठी हा इव्हेंट आहे हा इवेंट संपला की ते दुसर्यांच्या शोधात निघून जातील मेट्रो प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण झाला नाही तर त्याच्यात नुकसान तुमच आणि माझं होणार आहे ।

पोटतिडकीने सांगतो कळवळून सांगतोय दहा वेळा समजावून सांगतोय या सगळ्या घटनांच्या मागे असणारी ही सगळी पार्श्वभूमी समजून घेत जा त्यानंतर व्यक्त व्हा । तुमच्या सारख्यांच्या उथळ प्रतिक्रिया या इव्हेंट करणाऱ्या लोकांच्या साठी अमृतासमान असतात । त्यांना आग लावणे अधिक सोपे जाते सरकारविरुद्ध असंतोष अधिकाधिक पेरता येतो आणि याच्यातून त्यांना स्वतःचा फायदा साधता येतो ।

आणि ही सगळी पार्श्वभूमी आपल्या शासनाने न्यायालयामध्ये व्यवस्थित समजावून सांगितलेली आहे या डिपार्टमेंटशी  संबंधित असणाऱ्या अश्विनी भिडे यांनी सुद्धा दोन ते तीन वेळेला मुलाखत देऊन ही सगळी माहिती रीतसर सांगितलेली आहे तरीसुद्धा गरज नसताना हा आग लावण्याचा प्रकार होतो आहे यांच्या खेळातील प्यादे होऊन जगू नका परमेश्वराने अक्कल दिलेले आहे तिचा वापर करायला शिका ।

न्यायालय हे त्याच्या समोर आलेल्या पुराव्यांना अनुसरून निर्णय देत असते न्यायालयामध्ये शासनाने या सगळ्या बाबी व्यवस्थित रित्या सिद्ध करून दिलेल्या आहेत आणि या उलट जे तथाकथित पर्यावरणप्रेमी म्हणून उभे आहेत त्यांच्यापैकी एकाला ही न्यायालयाच्या प्रश्नांची संयुक्तिक उत्तर सुद्धा देता आलेली नाहीत या गोष्टीला नजरेआड करू नका ।

मेट्रोच्या या प्रकरणात माझे मत हे माझ्या सगळ्या मित्रांच्या किंवा फॉलोवर्स पेक्षा वेगळे असले तरी मला त्याची पर्वा नाही. जिथे सत्य आहे त्याच मार्गावर मी चालणार । मी एकटा असलो तरी मला फरक पडत नाही.

Comments