हे साहेबांचेच अपयश

हे साहेबांचेच अपयश

साहेब या वयातही केवढे कष्ट घेतात म्हणून अनेकांना त्यांचे कौतुक वाटते.
प्रत्यक्षात या वयात असे श्रम घ्यावे लागणे हा त्यांच्या वैयक्तिक अपयशाचा भाग अाहे.
या वयातही अापल्याशिवाय इतरांचे काही चालत नाही या अर्थाने. यांनी स्वत:ला पर्याय - स्वत:चा उत्तराधिकारी म्हणून कोणत्या नेत्याला घडवले, हे पाहिले तर हे लक्षात येईल. अजित पवार की सुप्रियाताई की अाव्हाड ही नावे त्या उत्तराधिकार्‍याचा अद्याप "उ"  देखील नाहीत.

हे तर प्रादेशिक अाणि त्यातही उपप्रादेशिक नेते. कारण महाराष्ट्रभर असा त्यांचा प्रभाव कधीच नव्हता.
तिकडे एवढी मोठी काँग्रेसदेखील नेमक्या याच अवगुणामुळे याच स्थितीतून जात अाहे. त्यांच्याकडे तर राजमाता ते युवराज ते राजे ते पुन्हा राजमाता असा विचित्र प्रवास झाला.
घराणेशाही का असेना पण जबरदस्तीने घोड्यावर बसलेले युवराज फारच बुद्दु निपजले.

त्यामानाने भाजपमध्ये मात्र ज्येष्ठ नेत्याचा प्रभाव संपल्यावर त्याने पूर्वी भूषवलेल्या पदांचा मुलाहिजा न ठेवता त्याला phase out केले जाते. अडवाणी हे याचे प्रमुख उदाहरण. भाजपच्या समर्थकांपेक्षा विरोधी पक्षीयांनी व त्यातही प्रसार माध्यमांमधील भाजपविरोधकांनीच त्यांच्यावरून गळा काढावा हे दृश्य फारच मौजेचे होते.
पण भाजपाला हे शक्य झाले याचे एकमेव कारण हे होते की त्यांचे पर्याय सक्षम होते.

नेमकी हीच गोष्ट पवारांच्या बाबतीत लक्षात घेतली जात नाही.
त्यातही हे या वयातही श्रम घेत अाहेत; म्हणजे नक्की काय करत अाहेत?
म्हातारचळ म्हणावा असे पेशवा-छत्रपती असे अतिशय अाक्षेपार्ह (ते गमतीने म्हणालो असे हे नंतरही म्हणाले नाहीत) असे वक्तव्य अाणि एवढेच नव्हे तर त्यांच्या तोंडातून अशा वक्तव्यांची मालिका हा माणूस अाता संपला हेच दाखवते.
अाता श्रम म्हणजे केवळ केविलवाणी बडबड उरली अाहे हे दिसते. ''मी काहीही बरेवाईट केले; मात्र तुरूंगात गेलो नाही' हे त्यांचे वक्तव्य तर यावर शिक्कामोर्तब करणारे ठरावे. अाताच्या "झक मारण्या" बद्दलच्या वक्तव्याबद्दल अाश्चर्यही वाटत नाही ते त्यामुळे.

20/9/2019

Comments