धनंजय मुंडे आता मात्र अति होतंय

धनंजय मुंडे आता मात्र अति होतंय

ब्राह्मण समाजावर जातीवाचक टिका करणा-या धनंजय मुंडे यांचा जिल्हाभरातून तीव्र निषेध

ब्राह्मण समाज एकवटला; सर्वत्र संतापाची लाट

शरद पवार यांच्या सभेत  विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी  अनाजी पंत,अनाजी पंत अस जातीवाचक  बोलत राज्याचे सुसंस्कृत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वर टीका केली आहे.
एखादया नावावरून दुसऱ्या व्यक्तीच्या जातीचा हीन भाषेत उल्लेख करणा-या धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध संतापाची लाट पसरली असून जिल्हयातील समस्त ब्राह्मण समाजाने त्यांचा तीव्र निषेध केला आहे.

अनाजी पंत ही प्रवृत्ती आहे, त्याला जातीची जोड देऊन वातावरण अधिक दूषित करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे करत आहेत.
शेवटी ते ज्या राष्ट्रवादीच्या संस्कृतीतून येतात त्यांच्या नेत्यांनी सुद्धा जाणीव पूर्वक पुणेरी पगडी,पेशवे छत्रपतींना जहागीरी देऊ लागले. अशी वक्तव्य करून ब्राम्हण समाजाविषयीचा द्वेष वेळोवेळी दाखवून दिला.
किंबहुना राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीला ब्राह्मण समाजाच्या मताची गरज नसावी असे लक्षात येते.
बीड जिल्ह्यातील विधान सभा निहाय आकडेवारी जर पहिली तर बीड विधानसभा मतदार संघात ब्राह्मण समाजाच्या मतदारांची संख्या 18 ते 19 हजार म्हणजे अतिनिर्णायक मतदान आहे,परळी मतदार संघात 5 ते 6 हजार मतदार आहेत, माजलगांव मतदार संघात 5 ते 7 हजार मतदार आहेत,केज-अंबाजोगाई मतदार संघात 8 ते 10 हजार मतदार आहेत, गेवराई मतदार संघात 4 ते 5 हजार मतदार, आष्टी -पाटोदा-शिरूर मतदार संघात 4 ते 5 हजार मतदार ब्राह्मण समाजाचे आहेत आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही मुक्ताफळ आपण उधळले आहेत याचे परिणाम तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला भोगावी लागणार असा सज्जड इशारा ब्राम्हण समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
धनंजय मुंडे हे आपल्या विषारी फुत्कारातून दोन समाजात बुद्धिभेद करू पाहत आहेत.ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वामिनिष्ठ अश्या स्वराज्याचे सरसेनापती बाजीराव पेशवे, महाराजांच्या साठी वीरगती प्राप्त झालेल्या सरदार बाजीप्रभू देशपांडे, सरदार मुरारबाजी देशपांडे, धर्मवीर संभाजी महाराजांचे सहकारी कवी कलश, महाराजांचे अष्टप्रधान मंडळ यांचा इतिहास विसरले की काय? असा सवाल ब्राह्मण संघटनेच्या वतीने करून  त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला

राष्ट्रवादीला धडा शिकवू
-----------------------------
राज्यात ब्राह्मण बहुल मतदार संघात ठीक ठिकाणी बैठका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत करावे असे आवाहन ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे.  राज्यातील, जिल्हयातील विविध मतदार संघात  ब्राह्मण संघटना निषेधाच्या बैठकी ही घेणार असल्याचे  श्री.दिलीप खिस्ती, अँड.अजिंक्य पांडव,अँड.रवींद्र देशमुख, अँड.राजेश्वर देशमुख, प्रकाश जोशी, दत्ता  कुलकर्णी, अँड.अरुण पाठक, अँड.संगीताताई धसे, श्री.दत्ता महाजन,श्री. विनायक रत्नपारखी, श्री.अतुल देशपांडे, रोहित लिंबगांवकर,शार्दूल जोशी, राहुल महाराज देशपांडे, महेश महाराज कुलकर्णी, अभिषेख राजहंस,मयुरेश कुलकर्णी, अनिल देवा जोशी,संतोष कुलकर्णी आदी बीड, परळी, माजलगाव, अंबाजोगाई, गेवराई, आष्टी,पाटोदा मतदार संघातील ब्राम्हण संघटनेच्या,सावरकर प्रतिष्ठाण,परशुराम सेवा संघ,ब्राह्मण महासंघ, ब्राह्मण एकता संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. 

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained