शरद पवार यांच्या गच्छंतीचा प्रवास

शरद पवार यांच्या गच्छंतीचा प्रवास -

1) शरद पवारांनी सोनिया गांधीच्या विदेशी असण्याचा मुद्धा उपस्थित करून काँग्रेस सोडली खूप आवडले पण नंतर त्याच सोनिया गांधीना आपल्या निष्ठा अर्पण केल्या म्हणून मला शरद पवार आवडत नाहीत.

2)राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिला जाहीरनाम्यात जातिगत आरक्षण बंद करून फक्त आर्थिक आधारावर आरक्षण देणार खूप आवडले .पण त्याच जाहीरनाम्यातील ते वचन पूर्ण करा म्हणून शालिनीताई पाटील ह्यांनी आग्रह धरला तर त्यांना त्रास दिला व जातिगत आरक्षणची परत कास धरली म्हणून मला शरद पवार आवडत नाहीत.

3) पूर्वी खरोखर धर्मनिरपेक्ष असणारे शरद पवार मात्र मुस्लिम धार्जिणे आहेत व हिंदू द्वेष्टे आहेत हे वेळोवेळां जाणवले म्हणून शरद पवार मला आवडत नाहीत.

4) ईदच्या मिरवणुकीचे नेतृत्व करणारे शरदराव कधीही पायी वारीत वारकऱ्यांच्या बरोबर चालले नाहीत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा बारामतीत येतो पण शरद कधी सामोरे आले नाहीत पण तेच शरद पवार इफ्तार पार्टीत उत्साहाने सहभागी होतात म्हणून मला शरद पवार आवडत नाहीत .

5) ज्या दिवशी शरद पवारांनी रामायण , महाभारत वाचू नका .राम कृष्णाला मानू नका हे उद्गार काढले आणि शरद पवार साहेब माझ्या मनातुन पूर्ण उतरले

6) जवळजवळ 40 वर्षे सत्तेत असताना मराठा आरक्षण दिले नाही पण भाजप सरकार प्रामाणिक प्रयत्न करत असताना संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेला पुढे करून हिंसक आंदोलन करून सरकारला अडचणीत आणण्याचा घृणास्पद प्रयत्न केला म्हणून मला शरद पवार मला आवडत नाहीत.
7) मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला की छगन भुजबळ सारख्या ओबीसी नेत्याला पुढे करायचे व मराठा ओबीसी वाद निर्माण करायचा . शरद पवारांनी जर छगन भुजबळ ह्यांना समज दिली असती तर मराठा विरुद्ध माळी विरुद्ध ओबीसी हा वाद निर्माण झाला नसता पण शरदराव ह्यांनी कधीच भुजबळ ह्यांना समज दिली नाही म्हणून शरदराव मला आवडत नाहीत.
8) धनगर आरक्षणचा प्रश्न आला की मधुकर पिचड सारख्या नेत्याला पुढे करायचे व धनगरांच्या एसटी मध्ये समावेश करायला अप्रत्यक्षपणे विरोध करायचा व दुसरीकडे धनगरांना आरक्षण देत नाही म्हणून ओरड करायची पण कधी मधुकर पिचड ह्यांना झापल्याचे आढळत नाही म्हणून शरदराव मला आवडत नाहीत.
9) जितेंद्र आव्हाड सारखी व्यक्ती उघड उघड हिंदू धर्मावर टीका करते अतिरेक्यांचे उघड समर्थन करते तरी शरदराव ह्यांनी कधी त्याची कानउघाडणी केल्याचे दिसत नाही.
10) स्वामिनाथन आयोगाने आपला अहवाल 2006 साली दिला होता. 2006 ते 2014 पर्यंत शरद पवार ह्यांची सत्ता होती मग शरदराव ह्यांनी तो लागू का केला नाही ? सरसकट कर्ज माफी करून सरकारी खजिना रिकामा केला ह्या उलट भाजप सरकारने गरीबांना कर्ज माफी केली .म्हणून मला शरदराव आवडत नाहीत.
11) खरे म्हणजे मला त्यावेळी जास्त धक्का बसला ज्यावेळी अब्दुल करीम तेलगी ह्याने छगन भुजबळ व माननीय शरद पवार ह्यांची नावे स्टॅम्प घोटाळ्यात नार्कोटेस्ट मध्ये घेतली ती नार्कोटेस्ट खोटी कशी म्हणता येईल म्हणून शरदराव मला नको वाटतात .
12) छगन भुजबळ ह्यांना अटक झाली कोर्टात केस चालू होती .छगन म्हणजे मुरब्बी नट त्याने जेल मध्ये आजारपणाचे सुरेख नाटक केले त्यावेळी मा शरद पवारांनी सरकारला दम भरला की भुजबळाला काही झाले तर सरकार जबाबदार असेल नाईलाजाने छगन जामिनावर बाहेर आला तर सुप्रियाताईला तर रडू फुटले अश्या गुन्हेगार व्यक्तीला मदत केली म्हणून मला शरदराव आवडत नाहीत.
13) भारताचे कृषिमंत्री व संरक्षण मंत्री पद भूषवणारी व्यक्ती भारतीय सैन्याच्या करवाईवर शंका घेते त्यामुळे शरदराव मला आवडत नाहीत.
14) 2014 साली भाजप विरुद्ध निवडणुका लढवल्या व निकाल पूर्ण लागायच्या आधी भाजपला बिनशर्त पाठींबा देता आणि आता त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवता आपण परत असेच काही करणार नाही ह्याचा विश्वास वाटत नाही. म्हणून शरदराव मला आवडत नाही.
15) पार्थ पवार ज्याला धड भाषण करता येत नाही त्याला आपण मावळ मतदारसंघात केवळ नातू म्हणून उमेदवारी दिली.मावळ मधील कोणीच योग्य तरुण दिसला नाही.ही घराणेशाही मला आवडली नाही.
16) हिंदू देव देवता व मराठा समाजाला अपशब्द वापरणाऱ्या सुषमा अंधारे ह्यांना स्टार प्रचारक नेमले म्हणून मला शरद पवार आवडत नाहीत.
अजूनही अनेक कारणे आहेत की ज्यामुळे मला शरद पवारांचे राजकारण आवडत नाही.

आता पवारांनी फालतू राजकारण बंद करून, म्हातारपणाचे दिवस सुखात घालावे.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained