कारशेड झक मारली
ती मेट्रोची कारशेड झाली नाही तरी बेहत्तर! अगदी मेट्रो रखडली तरी बेहत्तर! पण आरेमधली झाडे मात्र कसेही करून तोडलीच पाहिजेत. कारण ती मुठभर लोकांचे फ़ुफ़्फ़ूस असल्याचा नवा शोध लागला आहे. प्रामुख्याने असे बहुतांश लोक हे व्यावसायिक आंदोलनकर्ते, असून कुठेही ‘आम्ही सारे’ किंवा ‘आरे वाचवा’ असे फ़लक झळकवित उभे ठाकणार्या अशा लोकांनी करोडो सामान्यजनांच्या जीवनात कायमचा व्यत्यय निर्माण करून ठेवलेला आहे.
घातपाती स्फ़ोटकर्ते अफ़जल गुरू असो, किंवा याकुब मेमन असो. कशालाही जनहित घोषित करून त्यासाठी कुठेही व कधीही हातात फ़लक घेऊन सामान्य जीवनात व्यत्यय आणण्याचा त्यांचा व्यवसाय झाला आहे. असे लोक कुठे दोनचार झाडे लावणार नाहीत, किंवा कुठे नालेसफ़ाई करायला पुढे येणार नाहीत. किंबहूना कुठेही कसले काम करायची त्यांना इच्छाही नसते. तर उठसुट सरकार वा इतर कोणी काय करावे, याच्या मागण्या घेऊन उभे रहाणे; हा त्याच्यासाठी पोटापाण्याचा व्यवसाय बनलेला आहे.
अशा उपटसुंभांना हा नवा रोजगार पुरवणारे एनजीओ, थिन्कटॅन्क व त्यांच्या आर्थिक गरजा भागवणारे गुंतवणूकदारही जगभर उदयास आलेले आहेत. त्यातून ह्या जनहिताचे बुरखे पांघरलेल्या चळवळी उभ्या रहात असतात. त्यातल्या काहींना आरे येथील २७०० झाडे फ़ुफ़्फ़ूस वाटत असतील, तर ती तोडल्याने यापैकी अनेकांचा घुसमटून शेवट होऊ शकेल आणि तेवढ्यासाठी ती झाडे तोडलीच पाहिजेत. अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. मग ती झाडे तोडल्यामुळे मेट्रो कारशेडचे काम मार्गी लागणार असो, किंवा नसो. निदान अशी नतद्रष्ट माणसे आपल्या आयुष्यातून नष्ट होतील, अशी आशा आहे. कारण त्यांना कुठल्याही जनहिताशी कर्तव्य नाही, किंवा घेणेदेणे अजिबात नसते व नाही. त्यांचे बोलविते धनी भलतीकडेच कुठे बसून अशा समस्यांची निर्मिती करतात आणि मग या फ़लकधारी तैनाती फ़ौजेला प्रशासन, राज्यकर्ते किंवा कुठलेही काम करणार्यांच्या अंगावर छू करून सोडले जाते.
सहाजिकच घुसमटण्याने त्यांची संख्या कमी होणार असेल, तर त्यासारखे जनहिताचे दुसरे काम नाही. म्हणूनच ज्यांच्या कोणाच्या हाती असे आरेतील झाडे तोडण्याचे काम असेल, त्यांनी कृपया शक्य तितक्या घाईगर्दीने त्या झाडांची कत्तल करून टाकावी. अर्थात जनतेचे सुदैव असेल, तरच अशा उचापतखोरांची घुसमट होईल. कारण आरे हे फ़ुफ़्फ़ुस नाही किंवा त्यातून पर्यावरणाला कुठलेही संरक्षण मिळणार वा वाढणार नाही; याची त्यांनाही पक्की खात्री आहे. पण पापी पेटका सवाल है ना? याकुबच्या फ़ाशीसाठी मध्यरात्री उठून सुप्रिम कोर्ट सुनावणीला बसले्, तेव्हा अशा लोकांना घड्याळ कळत नव्हते.
पण दिवसाढवळ्या हायकोर्टाने दिलेला निकाल अंमलात आणण्यासाठी मध्यरात्री वृक्षतोड झाल्यावर मात्र त्यांना घड्याळ कळू लागते. एक कोटी तीस लाख मुंबईकरांतील एक टक्क्याच्या एक टक्का, म्हणजे तेरा हजार मुंबईकरही आरे वाचवायला पुढे येत नसतील, तर आरेमधली झाडे कोणाचे फ़ुफ़्फ़ुस आहे, त्याचे उत्तर मिळते. उर्वरीत एक कोटी, २९ लाख ८७ हजार मुंबईकरांना प्रवासाच्या दगदगीतून मुक्ती मिळण्यासाठी व त्यांच्या देहातील फ़ुफ़्फ़ुसे शाबूत रहाण्यासाठी ती झाडे तोडायलाच हवीत. कारण या इतक्या लाखो मुंबईकर जनतेसाठी आरे हे फ़ुफ़्फ़ूस नसून प्रदुषणमुक्त प्रवासाची सुविधा हेच त्या सर्व मुंबईकरांसाठी सुदृढ फ़ुफ़्फ़ूस असेल. म्हणूनच ज्यांना लक्षावधी मुंबईकराच्या देहातील फ़ुफ़्फ़ूसापेक्षा भलतेच कुठले फ़ुफ़्फ़ूस असेल, त्यांची या मुंबईत गरज नाही. त्यांना संपवण्याचा सोपा मार्ग आरेतील वृक्षतोड हाच आहे. म्हणून प्रशासन वा जो कोणी त्याचा अधिकारी असेल, त्याला कळकळीची विनंती तात्काळ युद्धपातळीवर कामाला लागून ती कुठली झाडे आहेत, त्याची संपुर्ण कत्तल करावी.
@ प - आतंकवादयांचा शत्रू

Comments
Post a Comment