मी अस्सल मराठी माणूस - मुंबई ही माझी कर्मभूमी आहे, मी बोलतो त्या भाषा माझ्या माय व मावशी आहेत - मनोज कोटक
मी अस्सल मराठी माणूस - मुंबई ही माझी कर्मभूमी आहे, मी बोलतो त्या भाषा माझ्या माय व मावशी आहेत - मनोज कोटक
गेली ४० वर्ष्यांपासून मुंबई हीच माझी कर्मभूमी आहे , मराठी हीच माझी भाषा आहे , महाराष्ट्र हेच माझे कार्यक्षेत्र आहे . सर्वार्थाने मी एक अस्सल मुंबईकर आहे असे उद्गार भाजपा - शिवसेना - रिपाई महायुतीचे ईशान्य मुंबईचे लोकसभा उमेदवार मनोज कोटक यांनी घाटकोपर येथे एका प्रचार मेळाव्यात बोलताना काढले.
व्यक्तीपेक्षा भूमी मोठी, देश मोठा, भाषा मोठी, संस्कृती मोठी, हा महाराष्ट्र मोठा असे सांगून मनोज कोटक पुढे म्हणाले की लहाणपणी शेजारच्या घरात जाधव आजीच्या जवळ आम्ही सर्व मित्र गोष्ट ऐकण्यासाठी एकत्र जमायचो मग आजी आम्हाला सांगायची शिवबाच्या गोष्टी - जिजाऊचा बाल शिवबा,आईचा आदर करणारा, स्वराज्याचा निर्धार करणारा, अन्याय आणि दुष्टांचा संहार करणारा शिवबा, स्त्रियांचा आदर करणारा शिवबा.
लहानाचा मोठा होत असताना रक्तामध्ये हळूहळू भिनायला लागलेला शिवबा . जसजशी समज वाढत गेली वय वाढत गेली तस तसे पुस्तक, टीव्ही, कादंब-या, वर्तमानपत्र जिथं जिथं शिवबा सापडत गेला तिथं तिथं वाचत गेलो आणि शिवबा समजून घेत गेलो. नकळत डोक्यातले आणि ओठांवरचं शिवबा हे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज कधी झालं तेच समजलं नाही.
होय *छत्रपती शिवाजी महाराज!* लहानांपासून ते वृद्धांपर्यंत आपल्या आदर्श जगण्याने सर्वांसाठी ‘दीपस्तंभ’ बनलेले श्रद्धास्थान म्हणजे महाराज.
मनोज कोटक पुढे म्हणाले की त्यांचा वाढत्या वयात प्रभाव पाडणारी दुसरी व्यक्ती होती ती म्हणजे त्यांचे शिक्षक जोशी गुरुजी. स्वतःमध्ये काय काय बदल करणे आवश्यक आहे, रोजच्या व्यवहारातील स्पर्धेत टिकण्यासाठी, पुढे जाण्यासाठी कुठली मुल्ये जोपासावीत, कुठली कौशल्ये आत्मसात करावीत, आपल्या उन्नतीच्या आड येणारे कुठल्या रुढींचे, विचारांचे जोखड फेकून द्यावे हे सर्व मी जोशी गुरुजींकडून शिकलो असे सांगून ते म्हणाले कि मराठी भाषेचे, मराठी संस्कृतीचे हे माझ्यावर मोठे ऋण आहे.
ऐन निवडणुकीच्या काळात विरोधक केवळ मतदारांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाषिक वाद उकरून जनतेची दिशाभूल करीत असल्याचे सांगून मनोज कोटक म्हणाले कि जो मनुष्य महाराष्ट्र व मुंबई च्या हितासाठी, त्यांच्या उन्नती साठी काम करतो - असे सर्व हे मराठीच असतात. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ओळींचीची आठवण करून कोटक यांनी आपले भाषण संपवले:
'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी - जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी -धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी.'
Regards,
Dayanand J. Nene
Comments
Post a Comment