महापालिकेच्या विविध विकासकामाच्या निविदा रद्द करण्याचा आपला निर्णय - *अलर्ट सिटिझन्स तर्फे स्वागत*.
ALERT CITIZENS FORUM OF INDIA
26 फेब्रुवारी 2019
मा. आयुक्त साहेब,
ठाणे महानगर पालिका,
ठाणे.
महोदय,
विषय : महापालिकेच्या विविध विकासकामाच्या निविदा रद्द करण्याचा आपला निर्णय - *अलर्ट सिटिझन्स तर्फे स्वागत*.
====================
ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत थीमपार्क, संगणक प्रणाली आणि म्हाडातर्फे पुनर्विकासाच्या कामात 100 कोटींचा कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सदस्यांनी केला होता. त्यावर बराच गदारोळ झाला होता.
आता आपण महापालिकेच्या विविध विकासकामात रिंग झाल्याचा संशय व्यक्त करून सुमारे सहाशे कोटींच्या कामाच्या निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
*आपल्या या निर्णयाचे अलर्ट सिटिझन्स फोरम स्वागत करते व आपले अभिनंदन करते* .
आपल्या या बोल्ड निर्णयामुळे नगरसेवक आणि ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील अनेक भागात विकासाची कामे सुरू आहेत.तसेच युटीडब्ल्यूटी, सिमेंट काँक्रिट रस्ते, एकात्मिक नालेबांधणी, नगरसेवक,प्रभाग विकास आणि एकात्मिक प्रभाग विकास निधीची कामे करण्यात येणार होती .
ज्या कामांच्या निविदा प्रसिध्द झाल्या आहेत, स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे. परंतु कामे मात्र सुरू करण्यात आली नाहीत . ती कामे रद्द करण्यात आली आहेत. ज्या कामांच्या फाईल्स तयार आहेत, निविदा प्रसिध्द झाली आहे परंतु कामाचे कार्यादेश देण्यात आलेले नाहीत ती कामेही रद्द करण्यात आली आहेत . कोणतीही फाईल स्थायी समितीच्या मंजुरीकरिता पाठवण्यात येऊ नये असे सक्त आदेश आपण दिल्याचे समजते.
रस्ते, नाले यांच्यासह विविध विकासकामाच्या निविदा मंजूर करताना ठराविक ठेकेदारालाच काम मिळावे याकरिता रिंग झाली असल्याच्या वास्तविकतेची आपण दखल घेतलीत आणि हे *सर्जिकल स्ट्राईक* केलीत त्याने अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराला नक्कीच लगाम बसेल.
अलर्ट सिटिझन्स फोरम नेहमीच भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आली आहे.
2013 -14 मध्ये आम्ही महापालिकेतील जनपथ आणि बी यू स पी निविदांमधील भ्रष्टाचार उघडकीस आणून त्या रद्द करायला लावल्या होत्या.
आपल्या कार्यात आपल्याला जनते मध्ये जागरूकता निर्माण करण्यासठी जे सहकार्य लागेल ते आम्ही मक्की देऊ.
पुनःश्च आपले अभिनंदन.
आपला,
अलर्ट सिटिझन्स फोरम ऑफ इंडिया साठी,
दयानंद नेने
Comments
Post a Comment