1991 मध्ये झालेलं सोवियत रशियाचं विघटन आठवत असेल

आपल्या पैकी अनेकांना 1991 मध्ये झालेलं सोवियत रशियाचं विघटन आठवत असेल. सोवियत रशियाच्या विघटनाबरोबरच युरोपातील अनेक देशांतून कम्युनिस्ट किंवा डावी विचारधारा संपुष्टात आली. पूर्व-पश्चिम जर्मनी एकत्र झाले, रुमानियाची विश्वविख्यात जिम्नॅस्ट, नादिया कोमान्सी अमेरिकेत पळून गेली आणि रुमानियामध्ये पण क्रांती झाली. चेक आणि स्लाव ही दोन स्वतंत्र राष्ट्रं निर्माण झाली. 


तर यांच्याबरोबरच युगोस्लाव्हिया या देशाचंही विघटन झालं आणि बोस्निया-हर्झेगोव्हिना, क्रोएशिया, मॅसेडोनिया, मॉन्टेनेग्रो, सर्बिया तसंच स्लोवेनिया ही छोटी-छोटी राष्ट्रं निर्माण झाली. या राष्ट्रं निर्माणाचं काम 1991 ते 1995 पर्यंत चालू होतं यातच बोस्निया मध्ये अक्षरशः घमासान लढाई चालू होती, कित्येक लाख लोक मरण पावले. शेवटी 1995मध्ये डॅटन करारा द्वारे ही लढाई संपुष्टात आली.

इकडे बोस्नियाची लढाई संपली आणि युरोप तसंच हा संपूर्ण प्रदेश स्थिरस्थावर होतो न होतो तोपर्यंत सर्बियाच्या एका प्रांताला स्वातंत्र्याची उबळ आली. सर्बिया आहे ख्रिश्चनबहुल तर हा प्रांत आहे मुस्लिमबहुल. या प्रांताचं नाव आहे "कोसोवो." मुस्लिमबहुल असल्यामुळे आपल्याला सर्बियापासून स्वातंत्र्य हवय ही त्यांची मागणी...(भारतातील काही राज्यांची आठवण झाली ना?)

तर 1999 पासूनचा हा कोसोवोचा सर्बिया बरोबरचा संग्राम 2008 पर्यंत चालला आणि या संग्रामात लाखोंना मुक्ती मिळाली!! 2008 मध्ये कोसोवोने स्वतःला स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं...खरंतर या घोषणेला खुद्द सर्बियानेच मान्यता दिली नाही पण गंमत म्हणजे अमेरिका, ग्रेट ब्रिटन आणि काही युरोपियन देश तसेच क्रोएशिया, अल्बानिया यांनी मात्र मान्यता दिली. त्यांच्यासारखीच मान्यता काही मुस्लिम राष्ट्रांनी ही दिली. आजच्या घडीला संयुक्त राष्ट्रातील 192 देशांपैकी 69 देशांची कोसोवोला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता आहे. उरलेल्या देशात सर्बिया समवेत आपला भारत, स्पेन, रशिया, चीन इत्यादी देश आहेत. BRIC संघाने सुद्धा कोसोवोला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली नाही.

आता तुम्ही म्हणाल, की हा इतका जुना इतिहास आजच का आठवला?

तर काल आपण सगळेच देशवासीय मेरी कोम यांच्या विजयात सामील होतो. नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत सहावे सुवर्णपदक मिळवणारी त्या एकमेव महिला!! तर नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत कोसोवो ही सामील होण्यासाठी आतुर होता. त्यांच्या एका महिला खेळाडूला या स्पर्धेत भाग घ्यायचा होता. पण आपल्या सरकारने या गोष्टीला साफ नकार दिला आणि या खेळाडूला विसा देण्यास असमर्थता व्यक्त केली. अनेक देशांनी आपल्यावर दबाव टाकला, यापुढे कुठल्याही जागतिक किंवा आशियाई स्तरावरील स्पर्धा भारतात घेता येणार नाही अशा धमक्याही आपल्याला मिळाल्या पण आपलं सरकार ढिम्म राहिले. अशा स्पर्धा भारतात नाही घेता आल्या तरी चालतील पण कोसोवोच्या खेळाडूला विसा मिळणार नाही यावर आपलं सरकार ठाम राहिले.

आपण असे का वागलो? अनेकांच्या दृष्टीने, आपण इतकी टोकाची भूमिका का घेतली? तर त्याला पार्श्वभूमी आहे आपल्याच देशातील दोन राज्यांतील चळवळींची!! एक आहे पंजाबमधील खलिस्तानवादी तर दुसरे आहेत जम्मू काश्मीर मधील काश्मीर वेगळे मागणारे काश्मीरी अलगतावादी!!

आपण जसं काश्मीर हा आपला अविभाज्य भाग मानतो तसाच सर्बिया कोसोवोला आपला एक भाग मानतो. आपण जर कोसोवोसारख्या, स्वतःला स्वतंत्र मानणाऱ्या प्रांताला मान्यता दिली, वेगळा देश मानलं तर उद्या आपलेच दोन भाग स्वतःला स्वतंत्र घोषित करतील आणि त्या दोन्ही भागांना मान्यता द्यायला मुस्लिम राष्ट्रे आतुरलेलीच आहेत. चीनतर काश्मीर गिळंकृत करायला अक्षरशः टपलेलाच आहे..

आता तरी समजलं का की आपल्या देशाला एका सक्षम, स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणाऱ्या नेतृत्वाची किती गरज आहे ते?

याच सक्षम नेतृत्वाचं नाव आहे "नरेंद्र मोदी"

इसलिए बोलो "हर हर मोदी, घर घर मोदी"

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034