अटलजी हेच पहिले कांग्रेसेतर पंतप्रधान.

" अटलजींसारखा संयत, समतोल विचाराचा नेता भाजपला लाभला म्हणून देशातले पहिले खरेखुरे कांग्रेसेतर सरकार बनले. आधी बनलेली कांग्रेसेतर केंद्रीय सरकारांचे नेतृत्त्व माजी कांग्रेसजनच करीत होते ( मोरारजी, चरणसिंग, व्हि पी सिंग, चंद्रशेखर हे सर्व माजी कांग्रेसजन ) या दृष्टीने अटलजी हेच पहिले कांग्रेसेतर पंतप्रधान.

२००२च्या गुजरात दंगलीनंतर मुख्यमंत्रीना राजधर्माचे पालन करायला अटलजीनी सांगितले होते. पुढे पक्षातील दबावामुळे अटलजींचा सामंजस्याचा सूर क्षीण ठरला .
भाजपमधील एक उदारमतवादी व सर्वमान्य नेता म्हणून अटलजींचेच नाव घ्यावे लागेल.

अटलजी आधीच्या भारतीय जनसंघाचे, नंतरच्या भाजपचे संस्थापक. 

रुढार्थाने सध्याच्या राजकिय नेत्यांमधील असलेल्या अहंकार, मग्रुरी, कपटनीती याचा लवलेश नसलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे अटलजी. 
सर्वाना हवेहवेसे नेते, तरल कविमनाचे संवेदनाशील नेते. कोणतीही अतिरेकी भूमिका न घेता सर्वसमावेशक भूमिका घेणारे सर्वमान्य नेते.
अटलजीचे व्यक्तिमत्त्व म्हणजे अस्सल भारतीय संस्कृतीची उत्कट प्रतिमा. संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत प्रथमच भाषण करणारे ते भारतीय नेते. जनता सरकारमधील यशस्वी परराष्ट्रमंत्री. त्यांच्याच काळात १८ वर्षे बंद असलेले भारत - पाक कसोटी क्रिकेट सामने सुरु झाले, गंगा पाणीवाटप प्रश्न सुटला. पंतप्रधान असताना भिन्न मित्रपक्षांना सांभाळण्याची कला त्याना होती कारण सत्तेप्रती त्यांची असलेली सेवावृत्ती व मुळातच त्यांचा नम्र स्वभाव.
 मेणाहून मऊ असलेले प्रसंगी वज्राहून कठोर होणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व. 
 भिवंडी येथे झालेल्या जातीय दंग्यानंतर त्यांचे शिवाजी पार्कवरील ते ऐतिहासिक भाषण मला ऐकण्याची संधी मिळाली. "आता हिंदू मार खाणार नाहीत" असे त्यानी  निक्षून सांगितले होते. अटलजीची अनेक भाषणे नंतर ऐकली, अनुभवली. भाजपच्या नेत्यांमधे वक्ते कमी (आता ही उणीव नाही  )पण एकटे अटलजी पुरेसे असत. सहजस्फूर्त वक्तृत्त्व, प्रवाही भाषा, हिंदीवरील प्रभुत्त्व व पक्षावरील अचल निष्ठा यामुळे त्यांची भाषणे एक आगळी मेजवानी असे.
या महान नेत्याचे आपल्यातून निघून जाणे खरोखर असह्य आहे. अटलजींना भावपूर्ण श्रध्दांजली🙏🙏🙏🙏
 @ दयानंद नेने

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034