अटलबिहारींच्या आयुष्यात अनेक संघर्ष आले, चढउतार आले, परंतु त्यांनी हार मानली नाही.
हा लेख आधी वाचलाही असेल, पण मा. अटलजींच्या निधनानंतर पुन्हा पोस्ट करत आहे.
.
1953 ची गोष्ट डेहराडून एक्सप्रेसने एक युवक मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर उतरला. जनसंघाचे कार्यकर्ते बक्षीनी नाव विचारताच त्या युवकाने नाव सांगितले मी अटलबिहारी. प्रवासात जेवण वगैरे केले का? असं विचारल्यानंतर हसत हसत वाजपेयी उत्तरले, "मला दिनदयाळ उपाध्याय यांनी दिल्लीहून निघताना काही पराठे आणि हे दहा रूपये वाटखर्चाला दिले होते." बक्षीने लगेच विचारले 30/40 तासाच्या प्रवासात काहीच खाल्ले नाहीस? यावर पुन्हा एकदा हसले. बक्षीच्या सर्वप्रकार लक्षात आला.
सायंकाळी पार्ल्याच्या टिळक विद्यामंदिरात अटलबिहारी वक्ते होते. थोडी विश्रांती घेतल्यानंतर बक्षीनी त्याना तयार व्हायला सांगितले. अटलबिहारींनी झोळीतून कुडता काढला, पण तो काखेत फाटला होता. बक्षीनी विचारले जनसंघाच्या व्यासपीठावरुन तू फाटका कुडता घालून भाषण करणार? मग अटलबिहारींनी दुसरा कुडता काढला तर तो मानेवर फाटला होता. सरतेशेवटी त्यावर उपाय म्हणून अटलबिहारी जाकीट खालून भाषणात रवाना झाले.
मुंबईतील अटलबिहारींच्या पहिल्या भाषणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या भाषा, विचार, आरोह, अवरोह यावर जनता फिदा झाली. दोन दिवसांनी दिनयाळजींची तार बक्षींना मिळाली. अटलबिहारी सुखरुप पोहोचले. तुम्ही वाट खर्चाला दिलेले 10 रुपयेही त्यांनी माझ्याकडे परत केले. एव्हाना बक्षींच्या लक्षात आले की, परतीच्या प्रवासातही त्यांनी काही खाल्ले नाही. सर्वस्वाचा त्याग करुन आयुष्यभर संघटनेला समर्पित झालेला हा कार्यकर्ता, 15 मे 1996 रोजी देशाचा पंतप्रधान झाला. राजकीय जीवनात अतिशय व्यस्त असूनदेखील अटलबिहारींनी आपले संवेदनशील मन जिवंत ठेवलं. कवितेमधून त्यांच्या भावना रसिकांना मिळू लागल्या.
कौरव कौन, कौन पांडव, टेढा सवाल है ।
दोनो ओर शकुनी का फेला, कुट जाल है।
हर पंचायतमे पांचाळी अपमानित है ।
कोई राजा बने, रंक को तो रोना है ।
अटलबिहारींच्या आयुष्यात अनेक संघर्ष आले, चढउतार आले, परंतु त्यांनी हार मानली नाही.
`बात करने को डरेंगे नही,
डरकर बात करेंगे नही’
हे सूत्र त्यांनी आयुष्यभर जपलं.
`हम टुट सकते है लेकीन झुक नही सकते’
हा निर्धार त्यांनी विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी व्यक्त केली.
रोज नवे संकल्प, नवे संघर्ष.
हार नही मानूंगा,
रार नयी ठानूंगा,
काल के कपाल पर, लिखता – मिटाता हूँ,
गीत नया गाता हुँ।
अटलबिहारी कधी कोमल होतात, तर कधी भावविव्हळ होवून जातात. शब्दांचे सौंदर्य, भाषेचा गोडवा आणि गीताची गेयता ही त्यांच्या कवितेची ठळक वैशिष्टय़े आहेत. अटलजींच्या शब्दामागे असीम त्याग आणि तपस्या आहे, मुळात या शब्दामागे कवीचे हळवे मन आहे.
मेरे प्रभू,
मुझे इतनी उँचाई कमी मत देता,
गैरो को गले न लगा सकुंू,
इतनी रुखाई मत देना ।
अटलबिहारींची ही भावना समृध्द विचाराने प्रेरीत आहे. एका अर्थाने तीच त्यांची जिवननिष्ठा आहे. अटलबिहारींनी आपल्या कवितेमधून सत्याचा आणि सत्वाचा शोध घेतला.
अटलजी कवी म्हणून मोठे आहेतच. परंतु निष्कलंक चारित्र्याचा लोकप्रिय नेता म्हणून देशवासियांमध्ये त्यांना आदराचे स्थान आहे. इंडिया टुडे ने स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त घेतलेल्या चाचणीत तुम्हाला सर्वात प्रिय असणाऱ्या 50 वर्षातील नेता कोण? या प्रश्नात अटलजींचं नाव म. गांधींच्या पाठोपाठ आहे. 17 वर्षे पंतप्रधान राहिलेल्या पं. नेहरुंना त्यांनी मागे टाकलं होतं. `जंटलमन’ या वृत्तपत्राने जनतेला तिरस्करणीय वाटणाऱ्या देशातील 10 प्रसिध्द व्यक्तींची जनमताच्या आधारे यादी बनवली. त्यामध्ये सर्वेक्षणात म. गांधी व नेहरुंना लोकांनी फाळणीसंदर्भात जबाबदार धरलं होतं. पण अटलजींबद्दल एकही विरोधी मत नोंदवलं गेलं नाही. जनाधाराचं एवढ निर्मल समर्थन त्यांच्या प्रामाणिक विचारात, समर्पित आयुष्यात आणि शुध्द चारित्र्यात आहे.
अटलजी परराष्ट्रमंत्री असतानाही 4 मे 1977 ची गोष्ट. ग्वालियरला अटलजींची सभा होती. अटलजींच्या दोन छोटय़ा भाच्या सभेत गेल्या होत्या. सभा संपल्यावर त्यांनी अटलजींना विचारलं, घरी जाताना तुमचेबरोबर गाडीतून येवू का? परंतु अटलजी त्या दोन छोटय़ा भाचींना न घेता घरी गेले. अटलजींनी घरी गेल्यावर भाच्यांना जवळ घेत म्हटलं.
"ती गाडी परराष्ट्रमंत्र्यांची होती, हा काका सर्व सर्वस्वी तुमचा आहे."
बावनकशी निःष्कलंक चारित्र्याचा उत्कृष्ट नमुना आणखी वेगळा काय असतो?
अटलजींना भारतरत्न मिळाला हा सौजन्यशील व प्रामाणिक राजकारणाचा गौरव आहे. अटलजी आता थकले आहेत.
हर पचीस दिसम्बर को, जीने की एक नई सिढी चढता हुँ।
नए मोड पर, औरोंसे कम, स्वयंम से जादा लढता हुँ ।।
एक आठवण सदैव मनात घर करुन.

Comments
Post a Comment