जाणत्यांचे फुटलेले फुगे:

जाणत्यांचे फुटलेले फुगे:

१९७८: वसंत दादा पाटील यांच्या शी गद्दारी करून महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. कांग्रेस विरोधी पक्षांना नव नेतृत्व मिळाले.
१९८०: इंदिरा गांधींनी त्यांचे मंत्रिमंडळ बरखास्त केले.
१९८३: कांग्रेस (स) च्या अध्यक्ष पदी निवड.
१९८४: प्रथमच लोकसभेत प्रवेश
१९८५: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कांग्रेस (स) ला केवळ ५३ जागा मिळाल्या. साहेब बारामती हून विजयी. लोकसभेचा राजीनामा. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते.
(लक्षात घ्या. या काळात साहेब सर्व कांग्रेस विरोधी पक्षांच्या गळ्यातले ताईत होते. तरी ते महाराष्ट्रात सर्वोच्च नेते होऊ शकले नाहीत)
१९८७: राजीव गांधींच्या समक्ष माहेरी परत.
(आठवा तो क्षण. छोट्या शा त्या स्टेजवर राजीव गांधी आणि साहेब दोघेच होते. राजीव गांधी यांनी आपल्या भाषणात साहेबांचा उल्लेख सुद्धा केला नव्हता - केवढा मोठा अपमान, पण राज्याच्या हितासाठी तो पचवला).
१९८८: महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री म्हणून कांग्रेस तर्फे नियुक्ती.
१९८९: साहेबांच्या नेतृत्वाचा फुगा फुटला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कांग्रेस ने बहुमत गमावले. केवळ १३७ जागा जिंकली. अपक्षांच्या आधारे साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाले.
( लक्षात घ्या: या निवडणुकीत सुद्धा साहेबांना कांग्रेस ला विजय मिळवून देता आला नाही)
१९९१: साहेब राष्ट्रीय स्तरावर खूप मोठा नेता आहेत हा फुगा फुटला. राजीव गांधींच्या निधनानंतर कांग्रेस नेतृत्व निवडणुकीत नरसिंह राव यांनी दिला धोबीपछाड. साहेब झाले संरक्षण मंत्री.
(आठवा तो काळ. जाणते साहेब १५० खासदार सहज manage करू शकतात अस कोणी सोम्या गोम्या पण म्हणायचा)
१९९३: मुंबई दंगली नंतर नरसिंह राव यांनी पंख पुन्हा छाटले. दिल्ली हून परत गल्लीत रवानगी. पुन्हा मुख्यमंत्री.
१९९५: जाणते राजे यांना पुन्हा अपयश. विधानसभा निवडणुकीत कांग्रेस ला केवळ ८० जागा. महाराष्ट्रात प्रथमच शिवसेना- भाजपाचे युतीचे सरकार.
१९९७: कांग्रेस अध्यक्ष व्हायचे स्वप्न पुन्हा भंगले. यावेळी सीताराम केसरी यांनी दिला धोबीपछाड.
१९९८: सोनिया गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला. कांग्रेस नेतृत्वाची माळ त्यांच्या गळ्यात.
सपना मेरा तुट गया.
१९९९: देशातील वातावरण व प्रादेशिक पक्ष यांचे वाढणारे महत्त्व लक्षात घेऊन साहेबांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी होण्याची आरोळी ठोकून, स्वाभिमान जागा झाल्याचे सांगत कांग्रेस ला रामराम ठोकला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला.
(प्रत्यक्षात गेल्या २५ वर्षातील साहेबांची ही एकमेव धूर्त चाल जी यशस्वी झाली. या चाली मुळे साहेब देशाच्या राजकीय पटलावर relevant राहिले)
१९९९: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर " राज्याच्या हितासाठी" स्वाभिमान बाजूला ठेवून सोनिया कांग्रेस बरोबर सत्ता स्थापन केली.
( येथे ही एक गोष्ट लक्षात घ्या: या आघाडी मध्ये साहेबांचा पक्ष हा सदैव ज्यूनिअर पार्टनर होता)
२००४: आता " देशाच्या हितासाठी" स्वाभिमान कचर्याच्या डब्यात टाकून दिला व केन्द्र व महाराष्ट्र येथे १० वर्षे सत्ता उपभोगली.
२०१४ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल पूर्ण जाहीर होण्या आधीच भाजपा ला पाठिंबा जाहीर केला.
२०१८: पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीच्या वतीने पंतप्रधान उमेदवार म्हणून नाव द्यायला साहेब आपले तयार.. कारण " my heart beats for you".
असा' 'ओवर रेटेड' नेता दुसरा नाही..
@ अचंबित  दयानंद नेने

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034