भाजपा ची अधोगती

भाजपा ची अधोगती
भारतीय जनता पार्टी ची केन्द्रात, राज्यात आणि अनेक महानगरपालिका मध्ये सत्ता आहे. तरीही पक्षाची ताकद कमी होते आहे असे राहून राहून वाटते.
आज पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा आळस आणि उन्माद एकत्र दिसून येतो.
हे दोन दुर्गुण एकत्र आले की समजावे की पक्षाची ताकद वाढण्याची थांबली.
दुसर्या बाजूला नेतृत्वाचे बघूया.
जुन्या कार्यकर्त्यांच्या काही मर्यादा आहेत, त्यांना समाजात विशेष मान्यता नाही, सत्ता राबवण्यासाठी बाहेरून लोक आयात केले पाहिजेत ही भाजपा नेत्यांची पक्की खात्री झाली आहे.
कार्यकर्ते जाणार कुठे..थोडे नाराज होतील पण जुळवून घेतील ही त्यांची धारणा.
सत्ता खेचून आणण्यासाठी मोदी आहेत ना, त्यामुळे हे नेते आपल्या वैभव विलासी आयुष्यात सध्या मशगुल आहेत.
नेते आणि कार्यकर्ते याच्यातला संवाद मिटत चाललाय.
सुरू आहे फक्त चमचेगिरी.
Quality ची जागा Quantity ने घेतली आहे..
जनतेची कामे करण्या ऐवजीं कामे वाजवण्यात जास्त कल आहे..
मी सारखे सांगत आहे की २०१८ हे कसोटीचे वर्ष आहे.
ही अधोगती वेळीच थांबवली नाही, पक्षाला आलेली मरगळ झटकली नाही, लोकांच्यात जाऊन त्यांच्या समस्या सोडवल्या नाहीत तर पुढची परिक्षा अतिशय कठीण जाईल.
@ दयानंद नेने

Comments