*एक पिढी* - ही पीढ़ी आता ५० ओलांडुन ६० साठीकडे चाललीय
*एक पिढी*
*१९६३/१९६४/१९६५/१९६६/१९६७/ १९६८/१९६९/१९७०/१९७१/१९७२*
ही पीढ़ी आता ५० ओलांडुन ६० साठीकडे चाललीय, 'हया' आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे हि पिढी कायम उंबरठ्यावर राहिली.....
*पेन्सिल / पेन पासून सुरवात करून, ही पीढी आता, स्मार्ट फोन, लँपटॉप, पीसी, उतारवयात सराईतपणे हाताळत आहे*.
ज्या पिढीच्या बालपणी सायकल सुद्धा एक चैन, असलेली, पण आता ह्या उतारवयात सराईतपणे स्कूटर, कार चालवणारी ही पिढी, अवखळ तर कधी गंभीर.... खूप भोगलेली आणि खूप सोसलेली, पण पूर्ण संस्कारित....
*टेप रेकॉर्डर, पॉकेट ट्रान्झिस्स्टर* ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती.
*मार्कशीट* आणि *टिव्ही* च्या येण्यानी यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी.
कुकरच्या रिंग्स, टायर, असल्या गोष्टी घेऊन लहानपणी *गाडी गाडी खेळणं* यात त्यांना काहीही कमीपणा वाटला नव्हता.
*'सळई जमिनीत रूतवत जाणं'* हा काही खेळ असू शकतो का ? पण होता.
*'कैऱ्या तोडणं'* ही यांच्या साठी चोरी नव्हती, आणि
कुठल्याही वेळी कुणाचंही *दार वाजवणं* या मध्ये कसलेही *एथीक्स* तुटत नव्हते.
*मित्राच्या आईने जेवू घालणं* यात कसलाही उपकाराचा भाव आणि *त्याच्या बाबांनी ओरडणं* यात कसलाही असूयेचा अभाव असणारी शेवटची पिढी.
वर्गात किवा शाळेत *स्वतःच्या बहिणीशी सुद्धा कुचमत बोलणारी* ही पिढी.
पण गल्लीत *कुणाच्याही घरात काहीही असलं* तरी वाट्टेल ते काम कसलाही विधिनिषेध न बाळगता करणारी ही पिढी.
*कपील, मोहम्मद अझरुद्दीन , वेंकट, प्रसनाच्या बोलिंग वर आणि पेस, भूपती, स्टेफी ग्राफ, अग्गासी, सॕम्प्रसच्या टेनिस वर तर राज, देव,दिलीप ते राजेश,अमिताभ आणि धर्मेंद्र,जितेंद्र बरोबर नंतर बऱ्याच नवीन कलाकारांवर, अगदी आमिर,सलमान, शाहरुख माधुरी,अनिल वर वाढलेली ही पिढी*
भाड्याने VCR आणुन ४-५ पिकचर पैसे गोळा करून एकत्र पाहणाऱ्या मित्रांची ही पिढी.
*लक्ष्या-अशोक* च्या निर्व्याज विनोदावर हसलेली, *नाना, ओम पुरी, शबाना, स्मिता पाटील, गोविंदा, जग्गू दादा, वर्षा, सोनम, किमी ,सोनाली,* हे कलाकार पाहिलेली पिढी.
कितीही शिकलं तरी *'स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही'* यावर विश्वास असणारी
*'शिक्षकांचा मार खाणं'* यात काहीही गैर नाही फक्त घरी कळू नये कारण *'घरात परत धुतात'* ही भावना जपणारी पिढी.
ज्यांच्या पालकांनी शिक्षकांवर *आवाज चढवला नाही* अशी पिढी.
वर्गात कितीही *धुतलं* तरी दसऱ्याला शिक्षकांना *सोनं देणारी* आणि आज इतक्या वर्षानी सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता *खाली वाकून नमस्कार* करणारी पिढी.
कॉलेज ला सुट्टी असली तर् आठवणीत स्वप्न रंगवनारी पिढी ...
ना मोबाईल ना SMS ना व्हाट्सअप .... भेटण्या साठी आतुरतेने वाट पाहणारी पीढ़ी
पंकज उधासच्या *_'तुने पैसा बहोत कमाया इस पैसेने देस छुडाया'_* या ओळीला डोळे पुसणारी,
::
दिवाळीच्या *पाच दिवसांची कथा* माहित असणारी
लिव्ह इन तर सोडाच, लव मॅरेज म्हणजे फार *मोठं डेरिंग* समजणारी ही पिढी, अहो शाळेत आणि महाविद्यालयात पण मुलींशी बोलणारी मुले ऍडव्हान्स समजली जाणारी पिढी.
पुन्हा डोळे झाकुया ?
दहा, वीस....... ऐंशी, नव्वद...........पुन्हा जुना आठवणीचा सुवर्ण काळ
*गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.....असं न समजणारी सुज्ञ पिढी, कारण आजचे दिवस हेच
उद्याच्या आठवणी असणार असं मानणारी ही पिढी ?*
*धन्य ते जीवन जे खर आपणच जगलोय !!!* 🏻🏻
Comments
Post a Comment